मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

  • Updated On - 4:58 pm, Fri, 5 July 19 Edited By:
मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक
लोकल ट्रेन

मुंबई : रविवारी सकाळी 11.15 ते दुपारी 3.45 पर्यंत मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्ये रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा जलद मार्गावर हा मेगाब्लॉक आहे. तसेच मध्य रेल्वेवर कल्याणहून सकाळी 10.37 ते दुपारी 3.06 पर्यंत जलद लोकल दिवा आणि परळ स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर आणि परळनंतर जलद मार्गावर चालवल्या जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन सुटणाऱ्या लोकल सकाळी 10.05 ते दुपारी 3.22 पर्यंत जलद, अर्धजलद लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकात थांबणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येजा करणाऱ्या लोकल, मेल, सकाळी 11 ते संध्याकाळी 6 पर्यंत सुमारे 20 मिनाटे उशिराने धावतील.

या मेगाब्लॉकमध्ये काही गाड्यांच्या वेळेतही बदल करण्यात आले आहे. रविवारी रत्नागिरी ते दादर पॅसेंजर ही दादरला न येता दिवा येथूनच पुन्हा रत्नागिरीला रवाना होणार आहे. यासाठी रेल्वेकडून दादरहून दुपारी 3.40 वा. विशेष लोकलची व्यवस्था करण्यात आली आहे.

पनवेल ते अंधेरी सेवाही बंद करण्यात आली असून पनवेल-नेरुळ आणि नेरुळ, बेलापूर-खारकोपर मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक असणार आहे. या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल, बेलापूरपर्यंत सकाळी 11.06 ते दुपारी 4.01 आणि नेरळहून सकाळी 11.01 ते दुपारी 4.06 पर्यंत पनवेल,बेलापूर लोकल सेवा बंद राहणार आहेत.

ठाणे-पनवेल लोकल सेवाही बंद राहणार आहे. ठाण्याहून पनवेलकडे जाणाऱ्या लोकल सकाळी 11.14 ते दुपारी 3.20 आणि पनवेलवरुन ठाण्याकडे जाणाऱ्या लोकल सकाळी 10.12 आणि दुपारी 3.53 पर्यंत बंद राहतील. ठाणे ते वाशी सेवा सुरळीत चालू राहिल. बेलापूर-सीवूड-खारकोपर मार्गावर बेलापूर, नेरुळ सकाळी 11.02 ते दुपारी 4.15 आणि खारकोपरवरुन सुटणाऱ्या लोकल सकाळी 11.30 ते दुपारी 4.45 पर्यंत बंद राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिंनस ते नेरुळ विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत.

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI