AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरेंच्या ‘या’ विश्वासू नेत्याकडून शिंदे सरकारच्या निर्णयाचं कौतुक, चर्चेला उधाण

शिंदे सरकारने घेतलेल्या एका निर्णयाचं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या मर्जीतल्या आणि विश्वासू नेत्याने कौतुक केलं आहे. राजकीय वर्तुळात या कौतुकाची जोरदार चर्चा आहे.

ठाकरेंच्या 'या' विश्वासू नेत्याकडून शिंदे सरकारच्या निर्णयाचं कौतुक, चर्चेला उधाण
| Updated on: Feb 08, 2023 | 7:55 PM
Share

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेमध्ये दोन गट पडले आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये आता चिन्हासाठीची लढाई न्यायालयात गेली आहे. ठाकरे गटाला खिंडार पाडण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न केले जात असून मोठे-मोठे नेते गळाला लावण्यासाठी फोडाफोडीचं राजकारण केलं जात आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवत शिंदे गट तयारीला लागला आहे. दोन्ही गटामधील संघर्ष महाराष्ट्राची जनता डोळ्याने पाहत आहे. मात्र अशातच शिंदे सरकारने घेतलेल्या एका निर्णयाचं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या मर्जीतल्या आणि विश्वासू नेत्याने कौतुक केलं आहे. राजकीय वर्तुळात या कौतुकाची जोरदार चर्चा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Awar) जाहीर झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली होती. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह रेवदंडा येथे जाऊन आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सर्व क्षेत्रातील दिग्गज शुभेच्छा देत असल्याचं दिसत आहे.

ठाकरे गटातील उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनीही त्यांचं अभिनंदन केलं आहे. यासंदर्भात नार्वेकर यांनी ट्विट केलं आहे. उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक म्हणून नार्वेकरांनी काम पाहिलं आहे. मात्र नार्वेकर यांनी अभिनंदन केल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे. शिंदे गटामध्ये जेव्हा ठाकरे गटातील नेते आणि कार्यकर्ते प्रवेश करत होते. त्यावेळी नार्वेकर यांच्या नावाचीही जोरदार चर्चा होती.

दरम्यान, गेल्या 30 वर्षाहून अधिक काळापासून पद्मश्री डॉ.दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी हे अंधश्रद्धा, बालमनावर संस्कार यावर मोठे कार्य केले आहे. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यामुळे देशभरात त्यांच्या कार्याची ओळख आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी त्यांचे वडील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचे कार्य पुढे सुरू ठेवले आहे.

इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....