धनंजय मुंडे राजीनामा देणार? शरद पवारांकडे देऊ केला?

| Updated on: Jan 14, 2021 | 3:31 PM

धनंजय मुंडे हे जनता दरबाराला हजर राहिले. त्यावेळी धनंजय मुंडेंनी आपली प्रतिक्रिया दिली. (Dhananjay Munde Comment On Sharad Pawar Reaction)

धनंजय मुंडे राजीनामा देणार? शरद पवारांकडे देऊ केला?
Follow us on

मुंबई : “मी शरद पवारसाहेबांना सगळं सांगितलं आहे. पक्ष आणि पवारसाहेब जो निर्णय घेतील, तो मान्य असेल,” असं सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर असल्याचं म्हटलं. तसंच पक्ष योग्य निर्णय घेईल असं म्हणत शरद पवारांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्याचदरम्यान धनंजय मुंडे हे जनता दरबाराला हजर राहिले. त्यावेळी धनंजय मुंडेंनी आपली प्रतिक्रिया दिली. (Dhananjay Munde Comment On Sharad Pawar Reaction)

धनंजय मुंडे म्हणाले, “मी माझी भूमिका मांडली आहे. वरिष्ठांशी माझी चर्चा झाली आहे. आता पक्ष आणि पवारसाहेब यावर निर्णय घेतील.” एका ओळीत प्रतिक्रिया देऊन, धनंजय मुंडे हे जनता दरबारासाठी कार्यालयात निघून गेले. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे गंभीर आरोप झाल्याने, विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुंडेंकडे राजीनाम्याची मागणी केली आहे.

याबाबत शरद पवार यांनीही पक्षप्रमुख म्हणून रोखठोक आणि ठाम भूमिका मांडली. “माझ्या मते धनंजय मुंडेंवरील आरोपाचं स्वरुप गंभीर आहे, साहजिकच याबाबत पक्ष म्हणून विचारविनिमय करावा लागेल. यासाठी पक्षाचे प्रमुख सहकारी आहेत, त्यांच्याशी अद्याप बोलणं झालेलं नाही. पक्ष म्हणून, पक्षप्रमुख म्हणून जे काही निर्णय घ्यावे लागतील, काळजी घ्यावी लागेल ते तातडीने निर्णय घेऊ”, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

धनंजय मुंडे काल मला स्वत: भेटले. मला भेटून एकंदर त्यांच्या आरोपाच्या स्थितीची सविस्तर माहिती मला दिली. त्यानुसार त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते. त्यानंतर काही तक्रारी झाल्या. त्याबाबत चौकशी सुरु झालेली असेल. हे प्रकरण असं होईल, व्यक्तीगत हल्ले होतील, असा अंदाज त्यांना असावा, त्यामुळे त्यांनी हायकोर्टात यापूर्वीच जाऊन आपली भूमिका मांडली आणि कोर्टाचा एक प्रकारचा आदेश होता, त्यावर भाष्य करण्यात अर्थ नाही, असं शरद पवार म्हणाले.

तिसरा मुद्दा धनंजय मुंडेंवरचा आरोप आणि स्वरुप – माझ्या मते त्या आरोपाचं स्वरुप गंभीर आहे, साहजिकच याबाबत पक्ष म्हणून विचारविनिमय करावा लागेल. यासाठी पक्षाचे प्रमुख सहकारी आहेत, त्यांच्याशी अद्याप बोलणं झालेलं नाही. पक्ष म्हणून, पक्षप्रमुख म्हणून जे काही निर्णय घ्यावे लागतील, काळजी घ्यावी लागेल ते तातडीने निर्णय घेऊ, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

मला आधी माझा निर्णय घेऊ द्या, नंतर मुख्यमंत्र्यांचं बघू. आम्हाला आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करुन पुढची भूमिका काय असावी, याचा विचाराने निर्णय होईल. त्यासाठी आम्ही आमचा निर्णय घेऊ, त्यासाठी आम्हाला मुख्यमंत्र्यांची वाट पाहावी लागणार नाही. आम्हाला पक्षप्रमुख म्हणून निर्णय घ्यावे लागतील. त्यामध्ये कुणावर अन्यायही होणार नाही हे पाहावे लागेल, असंही शरद पवार म्हणाले. (Dhananjay Munde Comment On Sharad Pawar Reaction)

संबंधित बातम्या : 

Sharad Pawar | शरद पवारांची 5 मोठी विधाने, धनंजय मुंडेंना थेट इशारा

Sharad Pawar on Munde | पक्ष म्हणून काळजी घ्यावी लागेल, तातडीने निर्णय घेऊ : शरद पवार