Sharad Pawar | शरद पवारांची 5 मोठी विधाने, धनंजय मुंडेंना थेट इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसला एक पक्ष म्हणून धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचा गांभीर्याने विचार करावा लागेल.

Sharad Pawar | शरद पवारांची 5 मोठी विधाने, धनंजय मुंडेंना थेट इशारा
Follow us
| Updated on: Jan 14, 2021 | 2:51 PM

मुंबई : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी आज पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्यावरील आरोपांसंदर्भात सविस्तरपणे भाष्य केले (NCP President Sharad Pawar).

राष्ट्रवादी काँग्रेसला एक पक्ष म्हणून धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचा गांभीर्याने विचार करावा लागेल. याप्रकरणात कोर्ट आणि पोलीस काय कारवाई करायची ती करतील. पण पक्ष धनंजय मुंडे यांच्याबाबत लवकरच निर्णय घेईल, असे शरद पवार  म्हणाले. तसेच, त्यांनी मंत्री नवाब मलिक यांची ठामपणे पाठराखण केली. नवाब मलिक हे राज्यातील महत्त्वाच्या मंत्र्यांपैकी एक आहेत. त्यांच्यावर कोणतेही वैयक्तिक स्वरुपाचे आरोप नाहीत. त्यांच्या नातेवाईकावर आरोप झाले आहेत. त्या नातेवाईकाला संबंधित यंत्रणेने (NCB) अटक केली आहे, असं शरद पवार म्हणाले.

धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्या संबंधीत शरद पवारांची 5 मोठी विधाने –

नवाब मलिकांवर वैयक्तिक आरोप नाही : शरद पवार

“नवाब मलिकांचा आरोपाबाबत झालं तर त्यांच्यावर व्यक्तिगत आरोप नाही. त्यांच्या नातेवाईकावर झाला. याबाबत संबंधित यंत्रणेने अटक केलं आहे. त्यामुळे त्या यंत्रणेने पूर्ण सहकार्य केलं आहे. तपास यंत्रणा त्या पद्धतीने काम करेल अशी अपेक्षा आहे. त्यांना पूर्ण सहकार्य संबंधितांकडून केलं जाईल याची काळजी घेतली जाईल. नवाब मलिकांवर वैयक्तिक आरोप नाही. ते अनेक वर्षापासून महाराष्ट्रासाठी काम करतात. विधीमंडळात ते काम करतात. त्यांच्यावर आजपर्यंत आरोप झालेला नाही.”

धनंजय मुंडे मला स्वत: भेटले, आरोपाच्या स्थितीची सविस्तर माहिती दिली : शरद पवार

“धनंजय मुंडे काल मला स्वत: भेटले. मला भेटून एकंदर त्यांच्या आरोपाची स्थितीची सविस्तर माहिती मला दिली. त्यानुसार त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते. त्यानंतर काही तक्रारी झाल्या. त्याबाबत चौकशी सुरु झालेली असेल. हे प्रकरण असं होईल, व्यक्तीगत हल्ले होतील असा अंदाज त्यांना असावा, त्यामुळे त्यांनी हायकोर्टात यापूर्वीच जाऊन आपली भूमिका मांडली आणि कोर्टाचा एकप्रकारचा एक आदेश होता त्यावर भाष्य करण्यात अर्थ नाही”

पाहा आखाडा, दररोज दु. 4 वा टीव्ही 9 मराठीवर

धनंजय मुंडेंवरील आरोपाचं स्वरुप गंभीर : शरद पवार

“माझ्यामते त्यांच्यावरचा आरोप आणि त्या आरोपाचं स्वरुप गंभीर आहे. साहजिकच याबाबत पक्ष म्हणून विचारविनिमय करावा लागेल. यासाठी पक्षाचे प्रमुख सहकारी आहेत, त्यांच्याशी अद्याप बोलणं झालेलं नाही.”

पक्ष म्हणून, पक्षप्रमुख म्हणून तातडीने निर्णय घेऊ : शरद पवार

“पक्ष म्हणून, पक्षप्रमुख जे काही निर्णय घ्यावे लागतील, काळजी घ्यावी लागेल ते तातडीने निर्णय घेऊ” (NCP President Sharad Pawar)

आम्ही आमचा निर्णय घेऊ, त्यासाठी मुख्यमंत्र्यांची वाट पाहावी लागणार नाही : शरद पवार

“मला आधी माझा निर्णय घेऊ द्या, नंतर मुख्यमंत्र्यांचं बघू. आम्हाला आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करुन पुढची भूमिका काय असावी याचा निर्णय होईल. त्यासाठी आम्ही आमचा निर्णय घेऊ, त्यासाठी आम्हाला मुख्यमंत्र्यांची वाट पाहावी लागणार नाही. आम्हाला पक्षप्रमुख म्हणून निर्णय घ्यावी लागेल. त्यामध्ये कुणावर अन्यायही होणार नाही हे पाहावे लागेल”

पाहा शरद पवार काय म्हणाले?

NCP President Sharad Pawar

संबंधित बातम्या :

राजकारण्यांनी भान ठेवावं, धनंजय मुंडे प्रकरणात संजय राऊतांचं भाष्य

धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला का? शरद पवार म्हणतात

मोठी बातमी: धनंजय मुंडेंना चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावणार?

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.