मंत्री राजेंद्र शिंगणे यांची मेडिकलवर धाड, ‘रेमडेसिवीर’चा काळाबाजार रोखण्यासाठी धडक

राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी आज (10 जुलै) भायखळा येथील मेडिकल दुकानावर धाड टाकली (Minister Rajendra Shingane raid on medical).

मंत्री राजेंद्र शिंगणे यांची मेडिकलवर धाड, 'रेमडेसिवीर'चा काळाबाजार रोखण्यासाठी धडक


मुंबई : राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी आज (10 जुलै) भायखळा येथील मेडिकल दुकानावर धाड टाकली (Minister Rajendra Shingane raid on medical). त्यांच्याकडे कोरोना उपचारात प्रभावी औषध ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी भायखळ्यात मेडिकलमध्ये जाऊन औषधांची पाहणी केली (Minister Rajendra Shingane raid on medical).

“रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबजार होत असल्याच्या तक्रारी गेल्या दोन दिवसांपासून अन्न आणि औषध प्रशासनाकडे येत होत्या. काही वृत्तपत्रांमध्येही तक्रारी छापून आल्या होत्या. तर काहींनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यालयात प्रत्यक्ष फोन करुन तक्रारी केल्या. त्याअनुषंगाने कालपासूनच मुंबई महापालिकेत, रुग्णालयांमध्ये आणि बाजारात हे औषध किती उपलब्ध आहे, याचा आढावा घेतला जात आहे”, अशी माहिती राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज! 

“रेमडेसिवीर इंजेक्शनची खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार मेडिकल दुकानदारांनी रुग्णाचं आधारकार्ड, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आणि फोन नंबर या सर्व गोष्टींची नोंद करुन औषध देणं जरुरीचं आहे. या नियमावलीनुसार मेडिकलचे मालक औषधांची विक्री करतात का, ते तपासलं जात आहे”, असं मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं.

“आज सकाळपासून मुंबईतील विविध मेडिकलमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा स्टॉक किती आहे. त्यांनी किती रुपयांना इंजेक्शन खरेदी केले. याबाबत माहिती घेतली जात आहे”, असं मंत्री राजेंद्र शिंगणे म्हणाले.

हेही वाचा : पुणे जिल्हा पुन्हा लॉकडाऊन, अजित पवारांची घोषणा

“मोडिकल्समध्ये सध्या रेमेडिसीवर इंजेक्शनचा स्टॉक कमी आहे, ही वस्तुस्थिती आहे. औषध पुरवणाऱ्या कंपन्यांनी दोन दिवसात पूर्ण औषध पुरवण्याचं आश्वासन दिलं आहे. औषध छापील किंमतीतच विकलं गेलं पाहिजे. काळाबाजारा व्हायला नको. याबाबत मी आणि गृहविभाग मिळून योग्य ती कारवाई करु”, असं राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मंत्री राजेंद्र शिंगणे यांची आज दुपारी एक वाजता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

रेमडेसीवीर इंजेक्शन तुटवडा असल्याने हे औषध ज्यादा दराने विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारीअन्न आणि औषध प्रशासनाकडे आल्या आहेत. रेमडेसीवीर औषधांचा काळाबाजार फक्त मुंबईतच नाही तर देशभरात होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे केंद्रीय औषध नियंत्रक विभागाने सर्व राज्यांच्या औषध प्रशासनाला याविरोधात कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा : Corona in India | देशात कोरोना रुग्णसंख्येत सर्वात मोठी वाढ, कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 लाखाच्या दिशेने

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI