AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अन् मातोश्रींच्या डोळ्यात तरळले अश्रू, मंत्री शंभूराज देसाईं यांनाही आवरला नाही हुंदका, ‘मेघदूत’ आठवणींच्या आसवात चिंब भिजला

Shambhuraj Desai : एकनाथ शिंदेंचे पॉवरफुल शिलेदार शंभूराज देसाई यांना हुंदका काही आवरला नाही. त्यांच्या घरातच राजकारणाचा वारसा आहे. आज त्यांच्यातील हळवा मुलगाही समोर आला. त्यांच्या आईंच्या डोळ्यातून अश्रू तरळले. यावेळी सर्व जण भावूक झालेले दिसले.

अन् मातोश्रींच्या डोळ्यात तरळले अश्रू, मंत्री शंभूराज देसाईं यांनाही आवरला नाही हुंदका, 'मेघदूत' आठवणींच्या आसवात चिंब भिजला
मेघदूत आसवांनी चिंब भिजला
| Updated on: Aug 03, 2025 | 2:10 PM
Share

एकनाथ शिंदे यांचे पॉवरफुल शिलेदार शंभूराज देसाई यांना आज हुंदका आवरला नाही. त्यांची आई विजयादेवी देसाई यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि देसाई यांनी रोखून धरलेला अश्रूंचा बांध मोकळा केला. मेघदूत बंगल्याच्या गृहप्रवेशावेळी मंत्री शंभूराज देसाईं आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाले. मेघदूत बंगल्यावर शंभूराज देसाई यांचं बालपण गेलं आहे. आजोबा बाळासाहेब देसाई यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना मेघदूत बंगला मिळाला होता. त्या आठवणींना आज रुंजी घातली आणि मायलेकांना गलबलून आलं. यावेळी ‘मेघदूत’ आठवणींच्या आसवात चिंब भिजला

त्या आठवणींचा पट डोळ्यासमोर

आज मेघदूत बंगल्यात मंत्री शंभूराज देसाई यांनी कुटुंबासह प्रवेश केला. या दरम्यान मंत्री शंभूराज देसाई यांचा जन्म झाला होता. त्यावेळी पहिली पाच वर्ष शंभूराज देसाई यांनी बालपण घालवलं होतं. त्यानंतर आज तब्बल ५५ वर्षानंतर शंभूराज देसाई आपल्या मातोश्रीसह गृहप्रवेशा दरम्यान आले असताना त्यांचे डोळे पानावले. तर संपूर्ण देसाई कुटुंब भावूक झाले.

तो आता कलेक्टरपेक्षा मोठा झाला

मंत्री शंभूराज देसाई यांच्या मातोश्री विजयादेवी शिवाजीराव देसाई यांनी यावेळी भावनांना वाट मोकळी करून दिली. मंत्री शंभूराज देसाई याचा जन्म या बंगल्यातला आहे. मला त्याला कलेकटर करायचं होतं. मात्र तो आज कलेक्टरपेक्षा मोठा झाला. आमदार झाला, मंत्री झाला. आम्हाला पावनगड बंगला मिळाला होता. पण मी विचारयचे मेघदूत बंगला मिळेल का आईची इच्छा त्याने पूर्ण केली. आज त्यांचे वडील असते तर आनंद झाला असता. या बंगल्याशी संबंधीत अनेक आठवणी आहेत. घरात प्रवेश करताना पहिली आठवण बाळासाहेब आणि ताईसाहेबांची आली. आमच्यावेळी हा बंगला ब्रिटिश कालिन होता, अशी आठवण शंभूराज देसाई यांच्या आईने सांगितली.

अन् तो चॉकलेटचा किस्सा

यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी पण मोठी आठवण सांगितली. ते म्हणाले की, आईने सांगितल्यानंतर, क्लासलिडर होण्यासाठी मी शाळेत मुलांना चॉकलेट वाटायचो. तिने ते व्यवस्थित लक्षात ठेवलं. देसाई घराण्याचं नाव टिकवण्यासाठी पराभव समोर दिसत असताना आई राजकारणात उतरल्या, पराभव झाला. मात्र एक शब्द तिने काढला नाही. ज्या पाटणकरांनी माझा आईचा पराभव केला त्यांचा मी पराभव केला याचं समाधान आहे. ते पाटणकर आता जरी टीका करत असले तरी माझ्या वरिष्ठांनी मला श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला दिला आहे, असे सांगायला मंत्री महोदय विसरले नाहीत.

मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार

आज नवीन शासकीय निवासस्थान मेघदूत हा बंगला मुख्यमंत्र्यांनी दिला. त्यांचे आभार मानतो. आज माझ्या आईचा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने गृहप्रवेश केला. लहानपणापासून या बंगल्याशी अनेक आठवणी आहेत. मेघदूत बंगला मिळावा यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली होती. मी एकदाच सांगितलं दुसर्यांदा सांगावं लागलं नाही. गृहप्रवेशावेळी आईला भरून आलं, लग्नानंतर याच घरात त्यांनी प्रवेश केला. आम्ही सर्वच भावूक झालो, अस शंभूराज देसाई म्हणाले.

लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्रात मोठं केलं. तसचं कार्य माझा हातून घडावं या माझा भावना आहेत. आई वडिल दोघांची इच्छा होती की मी स्पर्धा परीक्षा दयावी. आई म्हणायची तू कलेक्टर हो. अकस्मिक माझ्या वडीलांचे निधन झाले आणि सर्व जबाबदारी माझ्यावर आली. मतदार संघातील दिग्गज नेत्यांनी आईंना विनंती करून मला राजकारणात पाठवण्यास सांगितलं. २० वर्षांचा असताना १९९६ झाली मी बिनविरोध सहकारी कारखान्याचा चेअइरमन झालो, अशा आठवणी मंत्री देसाई यांनी जागवल्या.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.