Eknath Shinde: मी केवळ नामधारी राज्यमंत्री होतो, एकनाथ शिंदे गटाकडून एका मागो माग एका आमदाराचे व्हिडीओ, आरोपांच्या फैरी

आपण कोणती कामं हे सांगताना या अडीच वर्षात राज्यमंत्र्यांना कोणतेही अधिकार मिळाले नाहीतच पण पणनसारख्या राज्यमंत्र्यांच्या अधिकारांचं वाटपण झालं नाही असंही त्यांनी सांगितले.

Eknath Shinde: मी केवळ नामधारी राज्यमंत्री होतो, एकनाथ शिंदे गटाकडून एका मागो माग एका आमदाराचे व्हिडीओ, आरोपांच्या फैरी
महादेव कांबळे

|

Jun 27, 2022 | 7:28 PM

मुंबईः विधान परिषदेच्या निकालानंतर (Vidhan Parishad Result 2022) राज्यातील बदलेले राजकारण आणि बदलत्या राजकीय समीकरणांना आता वेगळे वळण लागले आहे. बंडखोर 16 आमदारांच्या (Rebel 16 MLA) न्यायालयाच्या निकालानंतर बंडखोरांना आता आणखी बळ मिळाले आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे गटातील आमदारांचे एका मागो एक आता व्हिडीओ आले आहे. त्या व्हिडीओतून मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्यावर आता आरोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. शिंदे गटातील पाटण विधानसभेतील आमदार आणि राज्यमंत्री शंभूराजे देसाई (Minister Shambhuraje Desai) यांनीही आता थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप करत मी केवळ नामधारी राज्यमंत्री होतो असं जाहीरपणे सांगणारा व्हिडीओ आता आला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by tv9 marathi (@tv9marathilive)

महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले शंभूराजे देसाई यांच्याकडे पाच खात्यांचा कार्यभार होता. पाच खात्यांच्या कारभाराविषयी सांगताना त्यांनी आपल्याला कोणते अधिकार होते.

कोणतेही अधिकार मिळाले नाहीतच

आपण कोणती कामं हे सांगताना या अडीच वर्षात राज्यमंत्र्यांना कोणतेही अधिकार मिळाले नाहीतच पण पणनसारख्या राज्यमंत्र्यांच्या अधिकारांचं वाटपण झालं नाही असंही त्यांनी सांगितले.

राज्यमंत्री म्हणून किती अधिकार दिले?

शंभूराजे देसाई यांच्या पाच खात्यांचा कार्यभार असला तरी आपल्याला कोणते आणि काय अधिकार होते हे सागंताना त्यांनी ठाकरे सरकारने आपल्याला किती राज्यमंत्री म्हणून किती अधिकार दिले असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

शिफारस केलेली काम

राज्यमंत्री म्हणून काम करताना आपण फक्त आमदार, पदाधिकाऱ्यांची आणि शिफारस केलेली काम करून देणं एवढचं काम राज्यमंत्री म्हणून करता आल्याचेही त्यांनी सांगितले.

 नामधारी राज्यमंत्री होतो

आपण फक्त नामधारी राज्यमंत्री होतो हे सांगताना त्यांनी विधानसभेचं कामकाज हाताळणं एवढच काम करत असताना त्या काळात राज्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांचे वाटपपण झाले नाही अशी जाहीर टीकाही त्यांनी केली.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें