Sandeep Deshmpande: मिसिंग लिंकवर दरड कोसळली… त्याला नेहरूच जबाबदार! संदीप देशपांडे यांचा फडणवीस सरकारला डिवचले

Missing Link Mumbai Pune Expressway Landslide: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकवर सोमवारी दरड कोसळली होती. त्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी फडणवीस सरकारला खोचक टोला लगावला. आता एक्सप्रेसवेवरील वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती समोर येत आहे.

Sandeep Deshmpande: मिसिंग लिंकवर दरड कोसळली... त्याला नेहरूच जबाबदार! संदीप देशपांडे यांचा फडणवीस सरकारला डिवचले
संदीप देशपांडे
| Updated on: Jul 07, 2026 | 10:13 AM

Sandeep Deshpande criticism: महायुती सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्पांपैकी एक मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकचा मोठा गाजावाजा झाला. सोमवारी दरड कोसळल्याने हा वाहतूक ठप्प पडली होती. तर उद्धघाटनाच्या अवघ्या काही दिवसातच या रस्त्यावर खड्डे पडल्याचे समोर आले होते. दरड कोसळल्याने 100 टन माती रस्त्यावर आली. याप्रकल्पाच्या गुणवत्तेवर विरोधकांनी सवाल केला. अभियांत्रिकीकरणाचा चमत्कार इतक्या लवकरच झोकाळल्याची टीका विरोधकांनी केली. तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकवरील या घडामोडींवरून फडणवीस सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

त्याला नेहरूच जबाबदार

संदीप देशपांडे यांनी मिसिंक लिंकवर दरड कोसळल्याप्रकरणात फडणवीस सरकारला डिवचले. ही दरड कोसळण्यासाठी नेहरूच जबाबदार असल्याचा खोचक टोला त्यांनी महायुती सरकारला लगावला. त्यांची सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल झाली आहे. “मिसिंग लिंकवर दरड कोसळली, त्याला नेहरूंच जबाबदार आहेत आणि तरीसुद्धा ज्यांना सरकारवर टीका करायची आहे, त्यांनी पाकिस्तानला निघून जावे.” अशी पोस्ट त्यांनी एक्सवर केली आहे. देशाचा विकास न झाल्याप्रकरणी अनेकदा भाजप नेते, मंत्री नेहरूंना त्यासाठी जबाबदार धरतात. त्यांच्यावर प्रत्येक गोष्टीचं खापर फोडतात. नेमका तोच धागा पकडत आता भाजप काळात ज्या घटना घडल्या आहेत, त्यालाही नेहरूच जबाबदार असल्याचा सणसणीत टोला देशपांडे यांनी लगावला आहे.

मिसिंग लिंकच्या टर्मिनल-2 टनलजवळ कोसळली दरड

पुणे आणि लोणावळा परिसरात 5 जुलै रोजी मुसळधार पाऊस झाला. त्याचा फटका पुणे-मुंबई एक्सप्रेसवेलही बसला. काही दिवसांपूर्वीच मिसिंग लिंकचे थाटात उद्धघाटन झाले होते. तर सोमवारी टर्मिनल-2 टनलजवळ दरड कोसळल्याने मिसिंग लिंकवरील वाहतूक बंद झाली होती. मिसिंग लिंकची कमानही खाली कोसळली होती. घटनेनंतर या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. सोमवारी रात्री 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट करत मिसिंग लिंकवरील ढिगारा हटवल्याचा व्हिडिओ ट्विट केला होता. या भागात पूर्वी कधीच दरड कोसळण्याची घटना घडली नव्हती. पण मुसळधार पावसामुळे या भागात दरड कोसळल्याचे म्हटले जात होते. तर विरोधकांनी मिसिंग लिंकच्या कामाच्या दर्जावरच अचूक बोट ठेवले होते. या वादात आता संदीप देशपांडे यांनी उडी घेत सरकारला चांगलाच चिमटा काढला आहे.

Follow Us