MMRDA महानगर आयुक्त आर. ए. राजीवना मुदतवाढ नाकारली, म्हैसकर आणि श्रीनिवास शर्यतीत

या पदाचा अतिरिक्त कारभार तूर्तास अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. (MMRDA Metropolitan Commissioner R A Rajeev )

MMRDA महानगर आयुक्त आर. ए. राजीवना मुदतवाढ नाकारली, म्हैसकर आणि श्रीनिवास शर्यतीत
Milind Mhaiskar, Sonia Sethi, SRV Srinivas

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) महानगर आयुक्त आर. ए. राजीव (R A Rajeev) यांना मुदतवाढ नाकारण्यात आली. त्यामुळे ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. वरिष्ठ आयएएस अधिकारी मिलिंद म्हैसकर (Milind Mhaiskar) आणि एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्यात चुरस असल्याचं बोललं जातं. या पदाचा अतिरिक्त कारभार तूर्तास अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. (MMRDA Metropolitan Commissioner R A Rajeev extension denied IAS officer Milind Mhaiskar SVR Srinivas in race)

निवृत्तीनंतर अधिकाऱ्यांना मुदतवाढ किंवा महत्वाच्या पदावर पुनर्नियुक्ती केल्याने सेवेतील अधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याबदद्ल आयएएस अधिकारी आणि महाविकास आघाडीतील पक्षांनी याआधीही नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांना मुदतवाढ नाकारण्यात आली.

कोण आहेत आर. ए. राजीव?

आर. ए. राजीव हे 1987 च्या बॅचचे आयएएस अधिकारी
मे 2018 मध्ये एमएमआरडीएचे महानगर आयुक्त म्हणून नियुक्ती
मुंबई मेट्रोसह एमएमआरडीएच्या अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर काम
मार्च 2021 मध्ये निवृत्तीनंतर तीन महिन्यांची मुदतवाढ

सोनिया सेठी यांच्याकडे अतिरिक्त कारभार

एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांची मुदत सोमवारी संपली. आर. ए. राजीव हे 28 फेब्रुवारीला निवृत्त झाले होते. त्यांनी एमएमआरडीएकडून सुरु असलेल्या अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर काम केले आहे. मुंबई परिसरात उभारण्यात येणाऱ्या 337 किमी मेट्रो मार्गाचे काम त्यांच्या नेतृत्वात सुरु होते. हे प्रकल्प सुरळीत सुरु राहण्यासाठी ठाकरे सरकारने त्यांना तीन महिने मुदतवाढ दिली होती. या पदाचा अतिरिक्त कारभार तूर्तास अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

कोण आहेत सोनिया सेठी?

सोनिया सेठी या भारतीय प्रशासकीय सेवेतील 1994 च्या बॅचच्या अधिकारी आहेत. सोनिया सेठी यांनी सिडकोच्या सहआयुक्त, एमएसआरडीसी आयुक्त आणि वाहतूक आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. दरम्यान, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) महानगर आयुक्त म्हणून मिलिंद म्हैसकर आणि एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्यात या पदासाठी चुरस असल्याचं बोललं जातं.

कोण आहेत मिलिंद म्हैसकर?

मिलिंद म्हैसकर हे 1992 च्या बॅचचे अधिकारी
‘म्हाडा’चे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून अनुभव
महसूल आणि वन विभागात प्रधान सचिव (वन) म्हणूनही काम

याआधी राधेश्याम मोपलवार यांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळात मुदतवाढ देण्यात आली होती. आतापर्यंत तीनदा मुदतवाढ देण्यात आलेल्या मोपलवार यांचीही मुदत संपली आहे. तर निवृत्तीनंतर माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांची मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यावरुन महाविकास आघाडीतील पक्षांनीच नाराजी व्यक्त केली होती.

संबंधित बातम्या :

IAS Transfer | मिलिंद म्हैसकर यांच्यासह राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली

(MMRDA Metropolitan Commissioner R A Rajeev extension denied IAS officer Milind Mhaiskar SVR Srinivas in race)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI