MMRDA चा दणका, 10 मोनो रेल्वेसाठी आलेल्या चिनी कंपन्यांच्या निविदा रद्द

BSNL, रेल्वे अशा बड्या विभागानंतर आता राज्य सरकारच्या अखत्यारितील एएमआरडीएने तसंच पाऊल उचललं आहे. MMRDA cancels China co. bidding process Monorail Trains

MMRDA चा दणका, 10 मोनो रेल्वेसाठी आलेल्या चिनी कंपन्यांच्या निविदा रद्द
Follow us
| Updated on: Jun 19, 2020 | 2:13 PM

मुंबई : भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. BSNL, रेल्वे अशा बड्या विभागानंतर आता राज्य सरकारच्या अखत्यारितील एएमआरडीएने तसंच पाऊल उचललं आहे. MMRDA ने 10 मोनो रेल्वे तयार करण्यासाठी चायनीज कंपन्यांकडून मागवण्यात आलेल्या निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. (MMRDA cancels China co. bidding process Monorail Trains)

MMRDA ने मोनो रेल्वेसाठी निविदा मागवल्या होत्या. त्यासाठी दोन कंपन्यांनी या निविद्या पाठवल्या होत्या. मात्र त्यांच्याकडून सातत्याने नियम-अटी आणि पात्रतेच्या निकषांबाबत पुनर्विचार करण्याची मागणी MMRDA कडे होत होती. मात्र सध्यपरिस्थितीत या कंपन्यांची निविदा प्रक्रिया रद्द करुन भारतीय कंपन्यांना देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

एमएमआरडीएच्या मते, “भारत सरकारने मेक इन इंडिया योजनांना प्रोत्साहन देण्यासाठी, विविध धोरणं जाहीर केली आहेत. त्यानसुार विकास आणि दीर्घकालीन समर्थनासाठी भारतीय कंपनीचा शोध घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे लक्षात घेता सध्याची निविदा रद्द करुन तातडीने नवी प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. भारतीय कंपन्यांचा सहभाग सक्षम करण्यासाठी अशा प्रकारच्या प्रकल्पांवर मागील दहा वर्षांपासून पात्रता निकषांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे”

आता अशा प्रकल्पांसाठी भारतीय कंपन्या भेल (BHEL), बीईएमएल (BEML) इत्यादी भारतीय उत्पादकांशी संवाद सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.

BSNL चा झटका लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यात (Boycott Chinese Equipment) संघर्षानंतर आता देशभरात चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे. तसेच, सरकारने दूरसंचार कंपनी बीएसएनलला चिनी उपकरणांचा वापर कमी करण्याचे आदेश दिले (Boycott Chinese Equipment) आहेत.

दूरसंचार मंत्रालयाने BSNL ला चिनी कंपन्यांची उपयुक्तता कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. या व्यतिरिक्त, दूरसंचार मंत्रालयाने खासगी कंपन्यांना नव्याने विचार करुन याबाबत ठाम निर्णय घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

रेल्वेचा दणका

गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारतीय रेल्वे मंत्रालयाने चीनच्या कंपनीचे 400 कोटीपेक्षा जास्त रुपयांचे कंत्राट रद्द केले आहे.

भारतीय रेल्वेने चिनी कंपनी बीजिंग नॅशनल रेल्वे रिसर्च अँड डिजाईन इन्स्टिट्यूट ऑफ सिग्नल अँड कम्युनिकेश लि. (Beijing National Railway Research and Design Institute of Signal and Communication Group) या कंपनीला दिलेलं कंत्राट रद्द केलं आहे. या कंपनीला कानपूर-दीन दयाल उपाध्याय सेक्शन तयार करण्यासाठी कंत्राट देण्यात आलं होतं. इथे 417 किमी लांबीचा कॉरिडोअर करण्यात आला आहे.

रेल्वेने चिनी कंपनीला जून 2016 मध्ये हे कंत्राट दिलं होतं. 471 कोटीचं हे कंत्राट होतं. मात्र चार वर्षात केवळ 20 टक्केच काम झालं आहे. कंपनीने करारानुसार काम न करता ते रखडवल्याचं कारण देऊन ते रद्द करण्यात आलं.

(MMRDA cancels China co. bidding process Monorail Trains)

संबंधित बातम्या 

Boycott Chinese Equipment : चीनला आर्थिक झटका देण्याची तयारी, BSNL चिनी उपकरणांचा वापर बंद करण्याची चिन्हं

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.