अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टच्या ऑफिसवर मनसेची कूच; ‘मराठी’साठी खळ्ळखट्याकचा दिला इशारा

अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टच्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करा, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करु, असा इशारा मनसेने दिला.

अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टच्या ऑफिसवर मनसेची कूच; 'मराठी'साठी खळ्ळखट्याकचा दिला इशारा
या व्यवसायातून ई-कॉमर्स कंपनीतून तुम्हाला दिवसाला 5 हजार रुपये कमावण्याची संधी आहे.

मुंबई : अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा (MNS Amazon And Flipkart Office), या मागणीसाठी आज मनसेने या कंपन्यांच्या ऑफिसला धडक दिली.. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग कंपनीच्या मुंबईतील बीकेसीमधील ऑफिसमध्ये जाऊन मनसेने आंदोलनाचा इशारा दिला (MNS Amazon And Flipkart Office).

अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करा, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करु, असा इशारा मनसेने दिला आहे. यावेळी मनसे नेता अखिल चित्रे यांनी स्टाफला खडे बोलही सुनावले.

त्याशिवाय, जर सात दिवसांत मराठी भाषेचा पर्याय न ठेवल्यास स्टाफला लाथ मारुन बाहेर काढण्याची धमकी ही यावेळी मनसेने दिली.

फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनचा महासेल

उद्यापासून म्हणजे 16 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवर फेस्टिव्ह सेल सुरु होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक प्रॉडक्ट्सवर मोठी सूट दिली जाणार आहे. त्याशिवाय दोन्ही कंपन्यांनी वेगवेगळ्या डिल्स रिव्हील करण्यास सुरुवात केली आहे. अ‍ॅमेझॉन 16 ऑक्टोबरपासून प्राईम मेंबर्ससाठी तर 17 ऑक्टोबरपासून नॉन प्राईम मेंबर्ससाठी महिन्याभराच्या फेस्टिव्ह सेलचं आयोजन केलं आहे.

MNS Amazon And Flipkart Office

संबंधित बातम्या :

PHOTO : मनसेकडून थाटामाटात कार्यालयाचे उद्धाटन, सोशल डिस्टन्सिंगसह मास्कच्या नियमाला हरताळ