मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे या निवडणुकीत उमेदवार देणार की नाही? या विषयी तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. असं असतानाच राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिलं आहे. या पत्रातून राज ठाकरे यांनी कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. तसेच राज ठाकरे यांनी अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीची आठवणही महाविकास आघाडीला करून दिली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा सल्ला महाविकास आघाडी मानणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.