सोमय्यानंतर मनसे आक्रमक, मुंबईतील कोरोना काळातील भ्रष्टाचाराचे पुरावे देणार

किरीट सोमय्या यांच्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदिप देशपांडे यांनी मुंबई महानगर पालिकेला लक्ष केले आहे. मुंबई मनपातील विरप्पन गँगचा घोटाळा सोमवारी बाहेर काढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

सोमय्यानंतर मनसे आक्रमक, मुंबईतील कोरोना काळातील भ्रष्टाचाराचे पुरावे देणार
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 11:05 AM

मुंबई : कोरोना काळात (Corona Pandemic) मुंबई महानगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. कोविड सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरण खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) सातत्याने करत आहे. हा घोटाळा १०० कोटी रुपयांचा असल्याचा आरोप ते करताय. यामुळे ईडीने मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांना चौकशीलाही बोलवले आहे.

किरीट सोमय्या यांच्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदिप देशपांडे यांनी मुंबई महानगर पालिकेला लक्ष केले आहे. मुंबई मनपातील विरप्पन गँगचा घोटाळा सोमवारी बाहेर काढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. येत्या सोमवारी सर्व पुरावे सादर करणार असून विरप्पन गँगमधील लोकांची नावेही जाहीर करणार असल्याचे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

संदिप देशपांडे यांनी सांगितले की, एक व्यक्ती काही कागदपत्रे व पेन ड्राईव्ह शाखेत सोडून गेला. त्या पेन ड्राईव्हमधील डाटा पहिल्यानंतर मला धक्क बसला. त्यात कोरोना काळात विरप्पन गँगने मुंबईची कशी लूट केली आहे याचे पुरावे आहेत. हे पुरावे २३ जानेवारीला माध्यमांना देणार असल्याचे संदिप देशपांडे यांनी सांगितले.

नेमके काय आहे प्रकरण?

कोरोना काळात मुंबईत जम्बो कोविड सेंटर सुरु करण्यात आले होते. त्या कोविड सेंटरचा कॉन्ट्रॅक्ट विविध कंपन्यांना दिला होता. यामध्ये लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला. कोणताही अनुभव नसताना वैद्यकीय सेवा आणि उपकरणे पुरवण्याचे कंत्राट या कंपनीला दिल्याचा आरोप आहे. कंपनीने कंत्राट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र बीएमसीकडे सादर केल्याचा आरोप आहे.

कंपनीत कोण आहेत भागीदार

लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसे ही कंपनी संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर आणि त्यांच्या भागीदाराच्या नावावर आहे. कंपनीची स्थापना जून २०२० झाली होती. त्यात डॉक्टर हेमंत गुप्ता, सुजीत पाटकर, संजय शाह, राजू साळुंखे हे भागीदार दाखवले आहेत. यासंदर्भात मुंबई मनपाला दिलेला भागिदारी करार खोटा असल्याचा आरोप होत आहे. या कंपनीकडे पुरेसे कर्मचारी वर्ग नाही. तसेच कंपनीने ज्युनिअर, इंटर्न डॉक्टर नेमले होते. यामुळे करारातील अटी व शर्तींचा भंग झाला होता.

पुणे महानगर प्राधिकरणाने कंपनीला टर्मिनेट करुन त्यांची २५ लाखांची रक्कम जप्त केली होती. त्यानंतर या कंपनीला कुठल्याही प्रकारचे कंत्राट न देण्याचे आदेश काढले होते. परंतु मुंबई महापालिकेने या कंपनीला कंत्राट दिले अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे या सगळ्या कोविड सेंटर कंत्राटामध्ये १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं आरोप केला आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.