थेट राज ठकरे यांच्यावर बोलल्यानं मनसे नेते छगन भुजबळ यांच्यावर तुटून पडले

राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून चूक केली, अशी कोणती मागणी बाळासाहेबांकडे केली होती ? असा सवाल करत भुजबळांनी टीका केली. त्यावरुन मनसेचे प्रकाश महाजन आणि संदीप देशपांडे भुजबळांवर तुटून पडले..

थेट राज ठकरे यांच्यावर बोलल्यानं मनसे नेते छगन भुजबळ यांच्यावर तुटून पडले
Follow us
| Updated on: Jun 15, 2024 | 9:15 PM

अशी कोणती मागणी होती की, राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंना सोडलं. राज ठाकरेंनी शिवसेना सोडून चूक केली, अशी टीका भुजबळांनी TV9च्या मुलाखतीतून केली आणि जुन्या जखमांवरची खपली काढण्याचा प्रयत्न केला. भुजबळ थेट मनसे अध्यक्षांवरच बोलल्यानं प्रकाश महाजन आणि संदीप देशपांडे भुजबळांवर तुटून पडले. आता भुजबळ बाळासाहेब आणि राज ठाकरेंवर का बोलले. त्याचं कारण म्हणजे लोकसभेच्या महायुतीच्या प्रचारात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसह भुजबळांवर केलेली टीका.

  • बाळासाहेबांच्या अटकेचे आदेश तत्कालीन आघाडी सरकारचे गृहमंत्री छगन भुजबळांनी का दिले होते. तेही पाहुयात
  • बाळासाहेबांसोबतच्या मतभेदानंतर 1991मध्ये भुजबळ शिवसेनेच्या 18 आमदारांसोबत बाहेर पडले.
  • त्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी भुजबळांच्या बंगल्यावर हल्ला केला. ज्यातून भुजबळ थोडक्यात बचावले.
  • 2000 साली आघाडी सरकारमध्ये भुजबळ गृहमंत्री झाले आणि त्यांनी 1992 च्या मुंबई दंगलीची फाईल काढली.
  • 1992-93च्या दंगलीत सामना वृत्तपत्रात प्रक्षोभक संपादकीय लिहिल्याचा आरोप बाळासाहेबांवर होता.
  • दंगलीची फाईल ओपन करुन तत्कालीन गृहमंत्री भुजबळांनी 25 जुलै 2000 रोजी बाळासाहेबांच्या अटकेचे आदेश दिले.
  • भुजबळांच्या आदेशानंतर 500 पोलिसांचा ताफा मातोश्रीवर आला आणि पोलिसांनी बाळासाहेबांना दादरच्या महापौर बंगल्यावर आणलं.
  • दादरच्या महापौर बंगल्यात पोलिसांनी बाळासाहेबांच्या रितसर अटकेची कारवाई पूर्ण केली. त्यानंतर बाळासाहेबांना भोईवाडा न्यायालयात आणलं, मात्र न्यायाधीशांनी गुन्ह्याच्या तपासाची मुदत संपल्याचं सांगून खटलाच कायमचा बंद केला आणि बाळासाहेबांची सुटका झाली.

आता राजकीय टीका टिप्पणीतून 24 वर्षांनंतर पुन्हा शिवसेना प्रमुखांच्या अटकेचा वाद वर आलाय. दुसरीकडे TV9च्या मुलाखतीतून भुजबळांनी, नाशिकच्या जागेवरुनही गौस्यस्फोट केला. दिल्लीत अमित शाहांनी तिकीट निश्चित केल्यानंतर फडणवीस आणि बावनकुळेंनीही मला लढण्यास सांगितलं. मात्र तरीही तिकीट जाहीर झालं नाही असं सांगतानाच, भुजबळांनी मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांवर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. त्यावरुन दादांचे मंत्री मुश्रिफांनी नाशिकची जागा शिंदे गटाची असल्यानं त्यांनी सोडली नसल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांकडेच बोट दाखवलं.

आधी नाशिक लोकसभा आणि त्यानंतर राज्यसभेच्या जागेवरही सुनेत्रा पवारांनाच अजित पवारांनी संधी दिली. तिथंही पत्ता कट झाल्यानं भुजबळ जाहीरपणे ह्युमिलेट अर्थात अपमान झाल्याचं सांगत आहेत.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.