AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विलिनीकरण तर राहिलं, पण एसटीचे पगार होत नाहीत, त्यामागचे खरे व्हिलन कोण?

एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येवरुन ज्या अनेक नेत्यांसहीत पडळकरांनी रान उठवलं होतं. त्याच पडळकरांच्या सांगलीत काल एसटी ड्रायव्हरनं आत्महत्या केली.

विलिनीकरण तर राहिलं, पण एसटीचे पगार होत नाहीत, त्यामागचे खरे व्हिलन कोण?
| Updated on: Feb 16, 2023 | 11:59 PM
Share

मुंबई : एसटीच्या रखडलेल्या पगाराचे पैसे अखेर मंजूर झाले आहेत. मात्र त्याच विंवचनेतून काल सांगलीत एका एसटी चालकानं आत्महत्या केल्याचा आरोप होऊ लागलाय. यावरुन विरोधक सरकारकडे बोट दाखवतायत., तसं गुणरत्न सदावर्ते यांनीआत्महत्येसाठी अधिकाऱ्यांना जबाबदार धरलंय. एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येवरुन ज्या अनेक नेत्यांसहीत पडळकरांनी रान उठवलं होतं. त्याच पडळकरांच्या सांगलीत काल एसटी ड्रायव्हरनं आत्महत्या केली.

आत्महत्येमागे आर्थिक अडचणी, अनियमित पगार आणि परिस्थितीचं कारण सांगितलं जातंय. मात्र आज गोपीचंद पडळकरांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यावर प्रतिक्रिया देण्यास स्पष्टपणे नकार दिलाय.

रखडलेल्या पगाराबद्दल काल राज्यातून अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर सरकारनं कोर्टात दिलेल्या हमीनुसार साडे तीन कोटी रुपये महामंडळाला दिले आहेत. त्यामुळे लवकरच एसटी कर्मचाऱ्यांना पगार होण्याची आशा आहे.

मात्र ऐतिहासिक संपानंतरही एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या थांबत नाहीयत. संपावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांना सरकारला जबाबदार धरणारे वकील सदावर्ते काल सांगलीत झालेल्या एसटी कर्मचाऱ्याच्या हत्येमागे आता अधिकाऱ्यांना दोषी ठरवतयात.

सरकारनं साडे तीनशे कोटी दिले असले तरी सहा महिन्यांचा बॅकलॉग भरण्यासाठी एक हजार कोटी गरज असल्याची मागणी होतेय. एसटी संपादरम्यान सरकारकडून महामंडळाला पगारापोटी दरमहा साडे तीनशे कोटी देण्याची हमी कोर्टात देण्यात आली होती. मात्र मागच्या दोन ते तीन महिन्यांपासून फक्त शंभर कोटी मिळत असल्याचा आरोप होतोय. त्यात सरकारच्या अधिकाऱ्यांनी 7 तारखेच्या बैठकीत दिलेल्या सूचनांनी खळबळ माजलीय.

महाराष्ट्र एसटी महामंडळानं यापुढे शासनावर अवलंबून न राहता स्वतःचं उत्पन्न वाढवून स्वयंपूर्ण होण्याकडे प्रयत्न करावेत. मात्र एसटी कोणत्याच सरकारच्या काळात नफ्यात राहिली नाही. एसटीचं ऑडिट काय सांगतंय ते पाहूयात.

ऑक्टोबर महिन्यात एसटीचं उत्पन्न होतं 659 कोटी, याच महिन्यात पगार आणि इतर एकूण खर्च 861 कोटी., म्हणजे तोटा झाला 351 कोटी नोव्हेंबरचं उत्पन्न 617 कोटी, खर्च 847 कोटी, तोटा 402 कोटी डिसेंबरचं उतप्न्न 648 कोटी, खर्च 854 कोटी, तोटा झाला 429 कोटी.

भ्रष्टाचाराच्या दलदलीतून एसटी बाहेर निघाल्यास एसटी नफ्यात येऊन वेळेत पगार होऊ शकतात, असं म्हणणारे तत्कालीन विरोधक आता सत्ताधारी होऊनही पुन्हा भ्रष्टाचाराचंच कारण देत पैशांची अडचण सांगू लागले आहेत.

दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.