AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लालपरीची समृद्धी वारी लयभारी ! नागपूर ते शिर्डी सवा चार तासांची बचत

रविवार दि. 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील सर्वात जास्त लांबीच्या (701 कि.मी. ) समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. हा मार्ग नागरिकांच्या प्रवासासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

लालपरीची समृद्धी वारी लयभारी ! नागपूर ते शिर्डी सवा चार तासांची बचत
sleepercumseating1Image Credit source: sleepercumseating1
| Updated on: Dec 14, 2022 | 5:52 PM
Share
मुंबई : नागरिकांना जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळाने उद्यापासून नव्या समृद्धीमार्गावरून नागपूर ते शिर्डी बस सेवा सुरू केली आहे. या मार्गाने स्लिपर (Sleeper) कम आसनी ( push-back ) बसद्वारे नागपूर ते शिर्डी या अंतरात सवा चार तासांची बचत होणार आहे.
एसटी प्रवाशांना जलद व आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणेसाठी महामंडळाने उद्यापासून ( दि.15 डिसेंबर ) नव्या समृद्धीमार्गावरून नागपूर ते शिर्डी  शयनयान कम आसनी बससेवा सुरू केली आहे. या बसमध्ये प्रवाशांना  2X1 पध्दतीची 30 आसने ( पुशबॅक पध्दतीची ) बसण्यासाठी उपलब्ध असून 15 शयन आसने (Sleeper) असल्याने प्रवाशांचा प्रवास अत्यंत आरामदायी होणार आहे.
या बसेस नागपूर व शिर्डी या दोन्ही ठिकाणाहून रोज रात्री 09.00 वाजता सुटतील व पहाटे 05.30 वाजता गंतव्य ठिकाणी पोहोचतील. या बससेवेमुळे प्रवाशांच्या सध्याच्या प्रवास अंतरात 102.5 कि.मी.आणि वेळेमध्ये 4.15 तासांची बचत होणार आहे. या बससेवेसाठी प्रति प्रौढ व्यक्ति रु.1300/- आणि  मुलांसाठी रू.670/- इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे. तसेच 75 वर्षावरील ज्येष्ठांना 100 % मोफत तर 65 ते 75 दरम्यानच्या ज्येष्ठांना 50 % सवलत असणार आहे.
 नागपूर ते औरंगाबाद ( मार्गे जालना ) या मार्गावरही समृध्दी महामार्गाव्दारे शयन आसनी बससेवा सूरू करण्यात येत आहे. यासाठी  नागपूर व औरंगाबाद या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री 10.00 वाजता बसेस सुटतील आणि   जालना मार्गे पहाटे 05.30  वाजता पोहोचतील.
 या बससेवेमुळे प्रवाशांच्या प्रवास अंतरात 50.9 कि.मी. व प्रवास वेळेमध्ये 4.40 तासांची बचत होणार आहे. या बससेवेमुळे नागपूर ते औरंगाबाद या प्रवासासाठी प्रति व्यक्ति रु. 1100/-  मुलांसाठी रु.575 /- इतके प्रवासभाडे आकारण्यात येणार आहे. नागपूर ते जालना या प्रवासासाठी प्रति व्यक्ति रु.945 /- आणि मुलांसाठी रु.505 /- इतके प्रवासभाडे आकारण्यात येणार आहे. प्रवाशांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.