मुंबईत लिफ्टमध्ये अडकलेल्या तिघांची तीन तासांनी सुटका, लिफ्ट टेक्निशियनचा मात्र मृत्यू

मुलुंडमध्ये एका इमारतीच्या लिफ्टमध्ये तीन जण अडकल्याची दुर्घटना समोर आली (Mulund lift stuck mechanic dies) आहे.

मुंबईत लिफ्टमध्ये अडकलेल्या तिघांची तीन तासांनी सुटका, लिफ्ट टेक्निशियनचा मात्र मृत्यू

मुंबई : मुलुंडमध्ये एका इमारतीच्या लिफ्टमध्ये तीन जण अडकल्याची दुर्घटना समोर आली (Mulund lift stuck mechanic dies) आहे. लिफ्टमध्ये अडकलेल्या तिघांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली आहे. मात्र या दुर्घटनेत लिफ्ट टेक्निशियनचा मृत्यू झाला आहे. संजय यादव असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.

मुलुंड पूर्वेकडील रिचा टॉवर या इमारतीत सकाळी 11 च्या सुमारास लिफ्टच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. त्यावेळी इमारतीचे दोन रहिवासी आणि लिफ्टचा एक टेक्निशियन 13 माळ्यावर लिफ्टच्या दुरुस्तीचे काम करत होता. तर एक कर्मचारी हा लिफ्टच्या वरच्या भागात काम करत होता. मात्र हे काम सुरु असताना अचानक लिफ्ट सुरु झाली. त्यामुळे लिफ्टवरील कर्मचारी हा लिफ्ट आणि भिंतीच्या पॅसेजमध्ये अडकला.

मुंबई मिररने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 10.30 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर लिफ्टमध्ये अडकलेल्या तिघांना सुखरुप बाहेर काढले. मात्र लिफ्टच्या वरच्या भागात अडकलेल्या संजय यादव या लिफ्ट टेक्निशियनचा लिफ्ट आणि भिंतीच्यामध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह यावेळी बाहेर काढला.

दरम्यान लिफ्टच्या दुरावस्थेसंदर्भात वेळोवेळी स्थानिक नागरिकांनी विकासकाकडे तक्रार केली होती. पण तरी देखील विकासकाने याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता ही घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला (Mulund lift stuck mechanic dies) आहे.

Published On - 3:59 pm, Thu, 6 February 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI