Video : डेंजर! एसी लोकल निघाली, दरवाजे उघडेच, प्रवाशांचा जीव टांगणीला

आधी एसी लोकलचे दरवाजे उघडले नसल्याची बाब समोर आली होती, आता बंद होत नसल्याचा व्हिडीओही समोर!

Video : डेंजर! एसी लोकल निघाली, दरवाजे उघडेच, प्रवाशांचा जीव टांगणीला
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 28, 2022 | 9:47 AM

काम्या भट्टाचार्या, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, मुंबई : मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर (Mumbai Western Railway Local) एसी लोकलला (Mumbai AC Local News) प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. एसी लोकलची गर्दीही सर्वसामान्य लोकलप्रमाणे वाढू लागलीय. अशातच आता एसी लोकलचे दरवाजे बंद न होता, लोकल दरवाजे उघडे ठेवून धावली असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल (AC local Viral Video) झालाय. दरवाजे उघडे राहिल्यानं लोकल प्रवाशांमध्येही गोंधळ उडाला होता. अंधेरी-विरार दरम्यान धावणाऱ्या एसी लोकल प्रवासात ही घडना घडल्याचं सांगितलं जातंय.

पाहा व्हिडीओ :

अंधेरी-विरार दरम्यान, एसी लोकलच्या डब्यातील गर्दीमुळे दरवाजाचं गॅसकीट निसटलं. गॅसकीट निसटल्यानं दरवाजा बंद होण्यात तांत्रिक अडचणी येऊ लागल्या. अखेर एसी लोकलचे दरवाजे उघडे ठेवूनच प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर ओढावली.

हे सुद्धा वाचा

याच लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने सदर घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केलाय. या व्हिडीओने एसी लोकलच्या बांधणीवर सवाल उपस्थित केलेत.

याआधी मध्य रेल्वे मार्गावरील काही एसी लोकलचे दरवाजे रेल्वे स्थानकात उघडले नसल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. त्यामुळे रेल्वे स्थानका उतरण्यासाठी पुढे सरसावलेल्या प्रवाशांचा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं होतं.

एकीकडे दरवाजे उघडायला विसरन जाणारे मोटरमन आता एसी लोकलचे दरवाजे बंद करायलाही विसरले की काय? असा प्रश्न काही प्रवाशांना पडला होता. एसी लोकलचं भरमसाठ भाडं देऊनही सर्वसामान्य लोकलप्रमाणे प्रवास करावा लागल्यानं काही प्रवाशांना नाराजीही व्यक्त केली.

नुकताच एसी लोकलमधील आणखी एक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाला होता. लोकलच्या डब्यात सामान ठेवण्यासाठी असलेला स्टॅन्ड थेट खाली पडल्याचं व्हायरल पोस्टमध्ये दिसून आलेलं. ही बाब ताजी असतानाच आता दरवाजे उघडे राहिलेल्या एसी लोकलचा व्हिडीओनेही चर्चांना उधाण आलंय.

मुंबईच्या वेस्टर्न रेल्वे मार्गावर सध्या 48 एसी लोकल धावतात. त्यात आणखी 31 एसी लोकल्सची भर पडणार असल्याची घोषणा लवकरच करण्यात आली होती. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता एसी लोकलच्या फेऱ्या वाढवून 79 पर्यंत करण्यात येणार असल्याची माहितीही नुकतीच समोर आली होती.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.