लाडकी बहीण योजना अन् सरकारच्या कामाचा लेखाजोखा; अजित पवारांनी मांडलं ‘रिपोर्टकार्ड’

Ajit Pawar on Vidhansabha Election 2024 : महायुतीची पत्रकार परिषद सुरु आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार या पत्रकार परिषदेत युतीची भूमिका मांडत आहेत. विधानसभा निवडणुकीबाबत अजित पवार काय म्हणाले? वाचा सविस्तर...

लाडकी बहीण योजना अन् सरकारच्या कामाचा लेखाजोखा; अजित पवारांनी मांडलं रिपोर्टकार्ड
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार
Image Credit source: ANI
| Updated on: Oct 16, 2024 | 12:08 PM

महाराष्ट्राची विधानसभा निवडणुकीची घोषणा काल झाली आहे. त्यानंतर आज महायुतीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा राज्यासमोर मांडलं आहे. अजित पवार यांनी ‘रिपोर्टकार्ड’ मांडलं. मेजर गोष्टी रिपोर्टकार्डमध्ये आहे. क्रीडा, सांस्कृतिक विकास, ग्रामिण विकास आणि रोजगार या सर्व गोष्टी आम्ही समाविष्ट केल्या आहेत. दोन अडीच वर्षाच्या कामगिरीचा अहवाल आम्ही देत आहोत. महाराष्ट्रातील जनतेच्या आयुष्यात आणलेल्या बदलाचा हा अहवाल. शेतकरी, महिला, कष्टकरी या सर्वांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी मेहनत घेतली. त्याचा लेखाजोखा आम्ही मांडत आहोत. आम्ही चांद्यापासून बांद्यापर्यंत या गोष्टी पोहोचवण्याचं काम करत आहोत. आम्ही जनतेचं जीवन बदलण्याचा प्रयत्न केला, असं अजित पवार म्हणालेत.

अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा

आमचे विरोधक गडबडलेले आहेत. घाबरलेले नाही म्हणणार, लाडकी बहीण योजनेमुळे ते गडबडले. ही योजना लागू होणार नाही असं म्हणायचे. फॉर्म रिजेक्ट होतील असं म्हणणार नाही. अडीच कोटी दिले आम्ही. महिलांच्या आयुष्यातील सकारात्मक बदल त्यांच्या पचनी पडत नाही. त्यामुळे ही योजना निवडणुकीपर्यंत असेल असं सांगितलं जात आहे. पण सीएम आणि डीसीएमच्या साक्षीने सांगतो, आम्ही पैशाची तरतूद केली आहे. ही योजना तात्पुरता नाही, असा शब्द अजित पवार यांनी जनतेला दिला.

निवडणुका येतील जातील. दर पाच वर्षाने ते होते. पण तुमचे पैसे ठरले आहेत. ते कोणी काढून घेणार नाही. या योजनेतील पैशात वाढ करण्याचं सुतोवाच सीएमने केलं आहे. आम्ही योग्य मांडणी करून ही योजना लागू करत आहे, असंही अजित पवार म्हणालेत.

लाडकी बहीण योजनेवर अजित पवार काय म्हणाले?

सुशील कुमार शिंदे यांनी वीज बिल माफ केलं. नंतर पुन्हा सुरू केलं. आम्ही अशा गोष्टी करणार नाही. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. आम्ही राज्यातील जनतेला तसा विश्वास देतो. आमच्या बऱ्याच योजना आहेत. महायुती सरकार काम करणारं आहे. आमच्या कामाच्या जोरावर आम्ही रिपोर्ट कार्ड देत आहोत, असं अजित पवार म्हणालेत.