AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 35 लाखांची दंडवसुली

नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याकरिता विभाग कार्यालय स्तरावर विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. social distancing rules

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 35 लाखांची दंडवसुली
bmc
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Oct 13, 2020 | 1:56 PM
Share

मुंबई: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने आखून दिलेल्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांकडून मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत 35 लाखांचा दंड वसूल केला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अतिशय गरजेच्या अशा सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याकरिता विभाग कार्यालय स्तरावर विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत नियम मोडणाऱ्या नागरिकांना गुलाबाचे फुल देऊन त्यांचे प्रबोधनही करण्यात येत आहे. (BMC Fines people not following social distancing rules)

त्यासोबतच या नागरिकांना समज मिळावी म्हणून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या कारवाईतून आत्तापर्यंत 35 लाख 50 हजार 950 रूपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 26 व्यक्तींकडून रू. 26 हजार आणि मास्क न लावणाऱ्या 3424 व्यक्तींकडून वसूल करण्यात आलेल्या 16,48,650 रुपयांचा समावेश आहे.

यामध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या व्यक्तीकडून रू. 1 हजार, मास्क न लावणा-या व्यक्तीकडून रू. 500/-, सुरक्षित अंतर न पाळणा-या व्यक्तीकडून रू. 200/- व सुरक्षित अंतराचे नियम मोडणा-या व्यापारी/दुकानदार यांचेकडून रू. 2 हजार अशाप्रकारे दंड वसूल करण्यात येत आहे. सुरक्षित अंतर न पाळणा-या 2242 व्यक्ती / व्यापारी, दुकानदार यांचेकडून रू. 18 लक्ष 76 हजार 300, अशाप्रकारे एकूण 35 लाख 50 हजार 950 रूपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.

लॉकडाऊननंतर ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार टप्प्याटप्प्याने विविध गोष्टींना सुरूवात करण्यात आली आहे. तथापि ही सवलत दिली जात असताना कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर, सतत हात धुणे आणि सुरक्षित अंतर राखणे या तीन महत्वाच्या सुरक्षा नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. तशा प्रकारच्या सूचना, जनजागृती विविध माध्यमातून सातत्याने केली जात आहे.

‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत देनंदिन व्यवहार टप्प्याटप्प्याने खुले केल्यानंतर कोव्हीच्या विषाणूला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी मास्क, सुरक्षित अंतर, वारंवार हात धुणे हीच प्रतिबंधात्मक ढाल आहे हे लक्षात घेऊन नागरिकांनी अधिक गांभीर्याने सुरक्षेच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यांचे पालन न करण्याची बेफिकिरी दाखविणे वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे काळात नागरिकांनी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे आणि महानगरपालिकेला दंडात्मक कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नये, अशी सूचना महापालिकेकडून करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

Corona | पुण्याचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांवर, मुंबईसह महाराष्ट्रालाही मागे टाकलं

(BMC Fines people not following social distancing rules)

Follow Us
दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या....
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांचा समावेश? व्हिडिओ बघाच 
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती..
Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील जुन्या घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती; पुढील सुनावणी कधी?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
Manoj Jarange : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; निकालानंतर...
Mahesh BaldI : भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; मात्र निकालानंतर...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय काय?
Maharashtra Drought : आधी पाणी, मग सुशोभीकरण; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्ष..
Shivsena : BJP : शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्षबदलाने पालघरच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना....
Eknath Shinde : हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; पंढरपुरातून रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना
शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन...
Pune : बाळासाहेबांचा अवमान सहन करणार नाही...; शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन
शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
GTA 6 Launch : तब्बल 13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ