AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत कोरोना रोखण्यासाठी ‘मिशन टेस्टिंग’ सुरु, ‘या’ ठिकाणी होणार चाचण्या

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठल्यानंतर महापालिका प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.  (Mumbai Corona Antigen test list of places)

मुंबईत कोरोना रोखण्यासाठी 'मिशन टेस्टिंग' सुरु, 'या' ठिकाणी होणार चाचण्या
कोरोनाची लक्षणे असूनही रिपोर्ट निगेटिव्ह, जाणून घ्या काय आहेत कारणे?
| Updated on: Mar 22, 2021 | 3:52 PM
Share

मुंबई : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत पुन्हा रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबईतील कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी पालिकेकडून मिशन टेस्टिंग सुरु करण्यात आलं आहे. मुंबईतील मॉल्स, रेल्वे स्थानक, बस स्थानकांसह इतर ठिकाणी अँटिजेन चाचण्या केल्या जात आहेत. मुंबईत कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठल्यानंतर महापालिका प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.  (Mumbai Corona Antigen test list of places)

मुंबईतील मॉल्स, रेल्वे स्थानक, बस स्थानक, गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा याठिकाणी कोरोनाच्या अँटिजेन टेस्ट केली जात आहे. या सर्व ठिकाणी दररोज 50 हजार चाचण्या करण्याचे लक्ष्य आहे. या चाचण्यांना नकार देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

मुंबईतील 27 मॉलमध्ये चाचण्या

मुंबईतील प्रसिद्ध 27 प्रमुख मॉलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची अँटिजेन चाचणी केली जाणार आहे. ही चाचणी निगेटीव्ह आल्यानंतरच मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. प्रत्येक मॉल मध्ये दिवसाला किमान 400 टेस्ट केली जाणार आहे. मुंबईतील पॅलेडियम, फिनिक्स, रुणवाल, इन्फिनीटी, इनॉर्बिट यांसारख्या मोठ्या मॉलमध्ये या चाचण्या होणार आहे. या सर्व मॉलमध्ये प्रवेशासाठी अँटिजेन चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे आपोआप गर्दीला आळा बसेल.

गर्दीच्या ठिकाणी अँटीजेन टेस्ट

त्याशिवाय प्रत्येक वॉर्डमधील गर्दीच्या ठिकाणी दररोज 1 हजार टेस्टचे टार्गेट देण्यात आले आहे. यात मुंबईतील गर्दीच्या ठिकाणांचा समावेश आहे. मुंबईतील रेस्टॉरंटस्, खाऊ गल्ली, फेरीवाले, बाजारपेठा, पर्यटनस्थळे, समुद्रकिनारे-चौपाट्या, वेगवेगळी सरकारी कार्यालये या ठिकाणी चाचण्या केल्या जाणार आहे.

मुंबईतील मुख्य रेल्वे स्थानकांवर चाचण्या 

यात मुंबईतील लांब पल्ल्याच्या, बाहेरगावाहून येणाऱ्या 9 मुख्य रेल्वे स्थानकांवर चाचण्या केल्या जाणार आहे. मुंबईतील वांद्रे, दादर, बॉम्बे सेंट्रल, सीएसएमटी, कुर्ला, अंधेरी, बोरिवली इत्यादी स्थानकांवर ही चाचणी केली जाणार आहे.

या ठिकाणी दर दिवसाला प्रत्येकी किमान 1 हजार प्रवाशांच्या चाचण्या होणार आहे. विशेषत: विदर्भातून, गोवा, गुजरात, केरळ, दिल्ली येणाऱ्या प्रवाशांवर प्रशासनाचं विशेष लक्ष असेल. (Mumbai Corona Antigen test list of places)

बस स्थानकांवरही अँटीजेन चाचणी

तसेच मुंबईतील मुख्य बस स्थानकांवरही अँटीजेन चाचणी केली जाणार आहे. मुंबईतील परळ, मुंबई सेंट्रल, बोरिवली, कुर्ला-नेहरु नगर येथे दररोज एक हजार प्रवाशांच्या चाचण्या होणार आहे. मुंबईत दर दिवसाला 50 हजार टेस्ट करण्याचं प्रशासनाचं लक्ष आहे.

मुंबईत अँटीजेन चाचणी होणाऱ्या ठिकाणांची यादी

मॉल्स रेल्वे स्थानक बस स्टॉप गर्दीची ठिकाणं
पॅलेडियम वांद्रे परळ रेस्टॉरंटस्
फिनिक्स दादर मुंबई सेंट्रल खाऊ गल्ली
रुणवाल मुंबई सेंट्रल कुर्ला फेरीवाले
इन्फिनीटी सीएसएमटी बोरिवली बाजारपेठा
इनॉर्बिट कुर्ला पर्यटनस्थळे
अंधेरी समुद्रकिनारे
बोरिवली सरकारी कार्यालये

महत्त्वाच्या शहरांसह अनेक भागांमध्ये कोरोना वाढला

राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या महत्त्वाच्या शहरांसह अनेक शहरांमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला आहे. विशेष म्हणजे हा कोरोना आता गाव-खेड्यातही थैमान घालायला लागलाय. प्रत्येक शहरांमध्ये कोरोनाबाधितांचा वाढता आकडा हा चक्रावून सोडणारा आहे. पुण्यात आज दिवसभरात तब्बल 2900 रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत 3775 रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर नागपुरात 3614 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.

मुंबईत किती रुग्ण सक्रीय?

राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचा उद्रेक सुरु आहे. मुंबईत दिवसभरात 3775 रुग्ण आढळले आहेत. तर 1647 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत सथध्या 23 हजार 448 रुग्णांवर उपचार सुरु आहे. (Mumbai Corona Antigen test list of places)

संबंधित बातम्या : 

महाराष्ट्र पोलिसांकडून अण्णा नाईकांची भीती, मास्कच्या आवाहनासाठी भन्नाट ट्विट

Pune Corona | पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा सुरु करणार, महापौरांची माहिती

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.