‘त्या’ उपाधीवरून मुख्यमंत्री शिंदेंवर टीका करणं ठाकरे गटाला नडणार?; थेट गुन्हा दाखल

Shisvena Uddhav Thackeray Group : 'त्या' उपाधीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणं, ठाकरे गटाला महागात पडण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाच्या नेत्याच्या विरोधात थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या या नेत्या विरोधात कोणती कलमं लावण्यात आली आहेत? वाचा...

'त्या' उपाधीवरून मुख्यमंत्री शिंदेंवर टीका करणं ठाकरे गटाला नडणार?; थेट गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Nov 29, 2023 | 8:30 AM

निवृत्ती बाबर, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 29 नोव्हेंबर 2023 : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणं ठाकरे गटाला महागात पडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जाहीर सभेतून टीका केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे माजी विभागप्रमुख दत्ता दळवी यांनी शिंदेंवर टीका केल्या प्रकरणी भांडुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटातर्फे रविवारी भांडुपमध्ये ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. तिथे त्यांनी ही टीका केली.

प्रकरण काय आहे?

भांडुपच्या या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या ‘हिंदुह्रदयसम्राट’ या उपमेवरून दत्ता दळवी यांनी टीका केली. शिवीगाळही केली. सार्वजनिक सभेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अश्लील शिवीगाळ आणि अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी भांडुप पोलिस अधिक तपास करत आहेत.

कोणत्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल?

शिवसेना शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पालांडे यांच्या त्या तक्रारीनुसार भांडुप पोलिसांनी माजी महापौर दत्ता दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कलम १५३(अ),१५३ (ब),१५३(अ)(१)सी, २९४, ५०४,५०५(१)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बॅनरवर ‘हिंदुहृदयसम्राट’ उल्लेख

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. अशात निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले होते. भाजप उमेदवाराच्या प्रचाराच्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘हिंदुहृदयसम्राट’ असा उल्लेख करण्यात आला. हवामहल मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार बालमुकुंदाचार्य महाराज यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे गेले होते. तिथे बॅनरवर हा उल्लेख कण्यात आला. ‘हिंदुहृदयसम्राट’ या उल्लेखावरून आता नवा वाद सुरु झाला आहे. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनीही टीका केली. तसंच माजी विभागप्रमुख दत्ता दळवी यांनीही शिंदेंवर टीका केली. या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
चव्हाणांना भाजपात घेण्याची रिस्क का? किती फायदा? फडणवीस म्हणाले....
चव्हाणांना भाजपात घेण्याची रिस्क का? किती फायदा? फडणवीस म्हणाले.....
मोदींची गॅरंटी म्हणजे काय... फडणवीसांनी एका वाक्यात सांगितला अर्थ
मोदींची गॅरंटी म्हणजे काय... फडणवीसांनी एका वाक्यात सांगितला अर्थ.
मनसेला महायुतीत घेणार का? मिले सूर मेरा...फडणवीस यांनी काय दिले संकेत?
मनसेला महायुतीत घेणार का? मिले सूर मेरा...फडणवीस यांनी काय दिले संकेत?.
पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा, पाटील भावूक; काय होत्या त्यावेळी भावना
पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा, पाटील भावूक; काय होत्या त्यावेळी भावना.
काका-पुतण्यांमध्ये आधीपासूनच संघर्ष होता? जयंत पाटील यांचा मोठा खुलासा
काका-पुतण्यांमध्ये आधीपासूनच संघर्ष होता? जयंत पाटील यांचा मोठा खुलासा.
'अजितदादाचं भाजपसोबत जायचं ठरलं तेव्हा...' पाटलांनी सांगितलं काय घडलं?
'अजितदादाचं भाजपसोबत जायचं ठरलं तेव्हा...' पाटलांनी सांगितलं काय घडलं?.
Sanjay Raut कुणाचे लाडके? पवार की उद्धव ठाकरे? राऊत काय म्हणाले बघा...
Sanjay Raut कुणाचे लाडके? पवार की उद्धव ठाकरे? राऊत काय म्हणाले बघा....
उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर संजय राऊत यांची भूमिका काय असणार?
उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर संजय राऊत यांची भूमिका काय असणार?.
संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, उद्धव ठाकरे यांना भाजपची ऑफर?
संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, उद्धव ठाकरे यांना भाजपची ऑफर?.
मोदींच्या सातबाऱ्यावर रामाचं नाव? मोदी गॅरंटीवर सवाल अन् भडकले राऊत
मोदींच्या सातबाऱ्यावर रामाचं नाव? मोदी गॅरंटीवर सवाल अन् भडकले राऊत.