Maharashtra Breaking News Live : राष्ट्रवादी कुणाची? आजची सुनावणी संपली

| Updated on: Nov 30, 2023 | 7:23 AM

Maharashtra Breaking News Live Updates : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील.... राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी.... तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील आज घडणाऱ्या घडामोडी, महत्वाच्या बातम्या... वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live : राष्ट्रवादी कुणाची? आजची सुनावणी संपली

मुंबई | 29 नोव्हेंबर 2023 : पुणे शहराकडे येणाऱ्या भारत गौरव यात्रा रेल्वेमध्ये प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. ४० प्रवाशांना विषबाधा झाल्यानंतर त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. भारत गौरव यात्रा रेल्वेत हा प्रकार घडला असताना नाशिक जिल्ह्यातील मनमाडचा रेल्वे ओव्हर ब्रिजचा कठडा कोसळला. राज्यातील काही भागांत आजही पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता आहे. राष्ट्रवादी कोणाची? यावर निवडणुक आयोगात बुधवारपासून सुनावणी होणार आहे. शिवसेना कोणाची? यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे सलग पाच दिवस सुनावणी होणार आहे.  राजकीय, प्रत्येक जिल्ह्यातील बातम्यांसह मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आमचा हा ब्लॉग दिवसभर फॉलो करा…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 29 Nov 2023 09:02 PM (IST)

  छगन भुजबळांचे येवल्यात कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

  नाशिक : मंत्री छगन भुजबळांचे येवल्यात कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं.  कार्यकर्त्यांकडून भुजबळांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  कोण आला रे कोण आला येवल्याचा वाघ आला, भुजबळ साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशी घोषणाबाजी करण्यात आली.

 • 29 Nov 2023 07:53 PM (IST)

  मुंबईत गॅस सिलिंडरचा स्फोट, पाच घरे जमीनदोस्त; सहा जण जखमी

  मुंबईतील चेंबूर परिसरात बुधवारी सकाळी एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने पाच घरांचं नुकसान झालं . या घटनेत सहा जण जखमी झाले असून 11 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गोल्फ क्लबजवळील जुन्या बॅरेक्समध्ये सकाळी 7.50 च्या सुमारास ही घटना घडली.

 • 29 Nov 2023 07:45 PM (IST)

  8 ते 15 डिसेंबर दरम्यान राहुल गांधींचा विदेश दौरा

  राहुल गांधी 8 ते 15 डिसेंबर दरम्यान दक्षिण आशियातील चार देशांच्या परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. थायलंड, मलेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम येथे जाणार आहे. यादरम्यान राहुल गांधी विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. तसेच ब्रुनेईच्या राजालाही भेटू शकतात.

 • 29 Nov 2023 07:20 PM (IST)

  हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होणार

  सरकारचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. हिवाळी अधिवेशन 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

 • 29 Nov 2023 07:15 PM (IST)

  जापानमध्ये अमेरिकन लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले

  जपानमध्ये अमेरिकन लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन लष्कराच्या ऑस्प्रे हेलिकॉप्टरच्या अपघातानंतर जापान तटरक्षक दलाने हेलिकॉप्टरचा अवशेष आणि एका व्यक्तीला घटनास्थळावरून बाहेर काढले आहे. हे हेलिकॉप्टर दक्षिण जपानमधील समुद्रात कोसळले होते.

 • 29 Nov 2023 06:53 PM (IST)

  Ncp | राष्ट्रवादी कुणाची यावर पुढील सुनावणी 4 डिसेंबरला

  नवी दिल्ली | राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह कुणाचं यावरची केंद्रीय निवडणूक आयोगातील आज 29 नोव्हेंबरची सुनावणी संपली आहे. आता राष्ट्रवादीबाबत पुढीर सुनावणी ही 4 डिसेंबर रोजी पार पडणार आहे.

 • 29 Nov 2023 06:39 PM (IST)

  दत्ता दळवी यांच्या वाहनांची 4 अज्ञातांकडून तोडफोड

  मुंबई | मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाच्या दत्ता दळवी यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी दळवी यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. दळवींच्या इमारत परिसरात त्यांची वाहनं पार्क करण्यात आली होती. येथे येऊन 4 अज्ञातांनी वाहनाची तोडफोड केली.

 • 29 Nov 2023 06:29 PM (IST)

  त्र्यंबकेश्वर येथील द्राक्ष बागायतदारांच्या नुकसानीची पाहणी

  नाशिक | राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. हातातोंडाशी आलेलं पीक पावसाने हिरावून घेतलं. या नुकसानानंतर शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळतोय. अशातच शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांच्यासह तळवडे त्र्यंबकेश्वर येथील द्राक्ष बागायतदारांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळेस बागायतदारांशी संवाद साधण्यात आला. सरकारकडून तात्काळ मदत मिळण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास या नेत्यांनी शेतकऱ्यांना दिला.

 • 29 Nov 2023 06:22 PM (IST)

  ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर चौकशीचा बडगा

  पुणे | पुणे पोलिसांकडून ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे. आतापर्यंत ससून रुग्णालयातील 16 नंबर वॉर्डमधील 13 जणांची चौकशी करण्यात आली आहे. कैद्यांच्या वॉर्डमध्ये 3 शिफ्ट मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आलीय. रुग्णालयातील 16 नंबर वार्डमध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांसह नर्स आणि वॉर्ड बॉय यांची चौकशी केली गेलीय. ललित पाटील हा देखील याच 16 नंबर वॉर्डमध्ये होता.

 • 29 Nov 2023 05:59 PM (IST)

  मराठा विद्यार्थ्यांचे आंदोलन

  पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला. सारथी संस्थेने पीएचडीसाठी फेलोशिप देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. केवळ २०० विद्यार्थ्यांना फेलोशिप देणार. मग इतर १२०० विद्यार्थ्यांच काय असा सवाल विद्यार्थ्यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालून प्रश्न सोडवण्याची केली विद्यार्थ्यांनी मागणी केली.

 • 29 Nov 2023 05:45 PM (IST)

  तर नागपूरच्या अधिवेशनात धडक

  14 डिसेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास नागपूरच्या अधिवेशनात धडक मारणार आहे. सरकारला तिथे घाम फोडणार असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रविकांत तुपकर यांची बैठक झाली. आठ दिवसांत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या सोबत बैठक घेणार आहे. सरकार मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे तुपकर यांनी सांगितले.

 • 29 Nov 2023 05:36 PM (IST)

  वेगळं आरक्षण म्हणजे काय हे सरकारने स्पष्ट करावे -मनोज जरांगे

  वेगळं आरक्षण म्हणजे काय हे सरकारने स्पष्ट करावे, असा जाब मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे. मराठा-कुणबी यांचे लाखोंनी पुरावे सापडले आहे. त्यामुळे आमच्या हक्काचे आरक्षण द्यावे. आम्हाला 50 टक्क्यांच्या आत आरक्षण हवे असे त्यांनी पुन्हा सांगितले. जर सरकारने दगाफटका केला तर त्यांना जड जाईल, असा इशारा पण जरांगे पाटील यांनी दिला.

 • 29 Nov 2023 05:30 PM (IST)

  मराठा विरुद्ध ओबीसी भांडण लावण्याचा प्रयत्न- प्रकाश आंबेडकर

  मराठा आरक्षणाचा मुद्दा हा अंतर्गत असून निजाम मराठा विरुद्ध रयत मराठा,असा हा संघर्ष सुरू असल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तर राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अदृश्य ताकद मराठा विरुद्ध ओबीसी भांडण लावण्याचे काम करत असल्याचे मतही आंबेडकरी यांनी व्यक्त केले आहे,ते सांगलीमध्ये बोलत होते.

 • 29 Nov 2023 05:22 PM (IST)

  अपूर्व हिरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

  ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरेंच्या पाठोपाठ त्यांचे मोठे बंधू अपूर्व हिरे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपूर्व हिरे यांनी नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवत १० लाखांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अपूर्व हिरे विधान परिषदेचे माजी आमदार असून सध्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात आहे. संस्थेत नोकरीला लावून देतो, असे सांगून पैसे घेत फसवणूक केल्याप्रकरणी हिरे यांच्यासह तीन कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्वय हिरे यांच्या पाठोपाठ अपूर्व हिरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 • 29 Nov 2023 05:14 PM (IST)

  भुजबळ आणि सरकारची भूमिका एकच

  मराठा आरक्षणा संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आहे. सरकार त्यासाठी प्रयत्नशील आहे भुजबळ आणि सरकारची भूमिका ही एकचआहे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण आम्ही देऊ, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मराठा समाजाला आरक्षण दिले. पण सुप्रीम कोर्टात ते टिकले नाही, त्यावेळी कोणाचे सरकार होते ही त्यांनी नाव न घेता टीका केली.

 • 29 Nov 2023 05:04 PM (IST)

  शेतकऱ्यांना नुकसान भरपाई

  गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येईल, यासाठी महसूल, कृषी विभागाने तातडीने कालबध्द रितीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत असे निर्देश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासंदर्भात प्रशासनाने युद्ध स्तरावर काम करावे अशा सूचना दिल्या.

 • 29 Nov 2023 05:00 PM (IST)

  ललित पाटील प्रकरणात सुषमा अंधारे यांना निनावी पत्र

  पुणे : राज्यात घडणाऱ्या घटनेमुळे ललित पाटील गायब करायचे आहे का? असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. सुषमा अंधारे यांना एक निनावी पत्र आले आहे. हे पत्र सकल हिंदू समाज या नावाने आलं आहे. या पत्रात कोणताही कायदेशीर पुरावा नाही असे अंधारे यांनी सांगितले. सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाच राज्यचा निवडणुकीत व्यस्त आहे. त्यामुळे ते पत्र मी गृहमंत्र्यांना पाठवत नाही असेही त्या म्हणाल्या.

 • 29 Nov 2023 04:35 PM (IST)

  अमरावतीमध्ये मराठी पाट्यांसाठी दुकानदारांना नोटीस

  अमरावती : महाराष्ट्रातील सर्व दुकानांना मराठी पाट्या बंधनकारक आहे. पुढील दोन महिन्यात सर्व दुकानदारांनी दुकानाच्या नावाच्या मराठी पाट्या लावल्या पाहिजे असा महत्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यानंतर अमरावतीमध्ये दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या इंग्रजीतील पाट्या बदलून मराठीमध्ये पाट्या लावल्या पाहिजे यासाठी अमरावती महानगरपालिकेने दुकानदारांना नोटीस पाठविण्यास सुरवात केली आहे.

 • 29 Nov 2023 04:21 PM (IST)

  ज्या माणसाची उंची आहे, त्याची कदर केली जाते, जरांगे पाटील यांची पुन्हा भुजबळ यांच्यावर टीका

  छ. संभाजीनगर : आम्हाला नावे ठेवण्यात आली. समाज खेकड्या सारखा आहे असं म्हणाले. मात्र, आम्ही एकजूट होवून सिद्ध करून दाखविले की आम्ही एक आहोत. राजकारण काय आहे ते माहित नाही. मात्र, सध्या आरक्षणासाठी समाज एकवटला आहे. ज्या माणसाची उंची आहे. त्याची कदर केली जाते. या माणसाला काय महत्त्व द्यावे, हा काय माणूस आहे का. पंधरा वर्षांपासून तोच माणूस मराठ्यांचा विरोध करतो, आरक्षणाला विरोध करतो, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.

 • 29 Nov 2023 04:07 PM (IST)

  मालवण येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

  मालवण : ४ डिसेंबरला होणाऱ्या नौसेना दिनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्गात येत आहेत. सिंधुदुर्गात उतरल्यानंतर पंतप्रधान सर्वात प्रथम राजकोटला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. त्यांनतर ते तारकर्लीला नौसेना दिनाच्या कार्यक्रमाला जाणार आहेत. राजकोट किल्ल्याला सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नौदलाकडून सुशोभित करण्यात येत आहे. किल्ल्याची नव्याने बांधणी केली जात आहे. इथेच महाराजांचा ३५ फुटी पुतळा उभारण्यात येत आहे.

 • 29 Nov 2023 02:51 PM (IST)

  अल्पसंख्यांक समाजासाठी ५०० कोटींचा निधी - सत्तार

  कॅबिनेट बैठकीत अल्पसंख्यांक समाजासाठी ५०० कोटींचा निधी दिल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. याआधी ३० कोटी रुपये दिले जात होते असं ही ते म्हणाले.

 • 29 Nov 2023 02:42 PM (IST)

  आयोगावर दबाव नसेल तर चिन्हाचा निकाल आमच्या बाजुने लागेल - अनिल देशमुख

  मुंबई : निवडणूक आयोगावर दबाव नसेल तर चिन्हाचा निकाल आमच्या बाजुने लागेल असं वक्तव्य अनिल देशमुख यांनी केले आहे.

 • 29 Nov 2023 02:33 PM (IST)

  माजी महापौर दत्ता दळवी यांना 12 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

  ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना १२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. विक्रोळीतील राहत्या घरातून त्यांना भांडुप पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.  दत्ता दळवी यांचा जामीन नाकारण्यात आला. ठाकरे गटाकडून न्यायालयाच्या बाहेर निदर्शने करण्यात आली.

 • 29 Nov 2023 02:30 PM (IST)

  जातीनिहाय जणगणना झाली पाहिजे - जयंत पाटील

  मुंबई : अधिवेशनापूर्वी ६ तारखेला मविआची बैठक घेऊ. निधीचं वाटप समान पद्धतीने होत नाहीये. सरकारकडून शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. जातीनिहाय जणगणना झाली पाहिजे. असं जयंत पाटील यांनी म्हटले आहे,

 • 29 Nov 2023 02:23 PM (IST)

  सोलापुरात पाण्यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

  सोलापुरातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील 72 गावातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. मागील 30 वर्षांपासून रखडलेल्या एकरुख उपसा सिंचन योजनेचे उजनी धरणातील हक्काचे पाणी मिळावे या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण करत आहेत. कुंभारी गावात शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरु आहे.

 • 29 Nov 2023 02:21 PM (IST)

  कर्जतमध्ये अजित पवार गटाची निर्धार सभा

  कर्जतमध्ये अजित पवार गटाची आज निर्धार सभा आहे. या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिकेत तटकरे, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, रूपाली चाकणकर उपस्थित राहणार आहेत. कर्जत मधील पोलीस मैदानात ही सभा असणार आहे. आठ हजार आसन व्यवस्था मैदानात करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर पहिल्यांदाच कर्जतमध्ये अजित पवार गटाची सभा ठेवण्यात आली आहे.

 • 29 Nov 2023 02:16 PM (IST)

  मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक

  धुळे : मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक झाली आहे. महाराणा प्रताप चौकात मनसेच्या वतीने इंग्रजी पाट्यांच्या विरोधात आंदोलन केले. शासनाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्यांचा निषेध करण्यात आला. व्यापाऱ्यांना तात्काळ इंग्रजी पाट्या हटवण्याचा इशारा.

 • 29 Nov 2023 12:55 PM (IST)

  यवतमाळ जिल्ह्यात 30 हजार हेक्टरवर शेती पिकाचे नुकसान

  यवतमाळ जिल्ह्यात 3 दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसाने 10 मंडळ मध्ये अतिवृष्टी झाली असून अंदाजे 30 हजार हेक्टरवर शेती पिकाचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सर्व मंडळ मध्ये पंचनामे 2 दिवसात करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत.

 • 29 Nov 2023 12:50 PM (IST)

  सोलापूरमध्ये अवकाळी पावसाने ज्वारी, हरभरा आणि कांदा पिकाचं नुकसान

  सोलापूरमध्ये अवकाळी पावसाने ज्वारी, हरभरा आणि कांदा पिकाचं नुकसान झालं आहे. दक्षिण सोलापूरमधील दोड्डी, कुंभारी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे.  राज्यभरात एकूण 161 जनावरे दगावली आहेत.

 • 29 Nov 2023 12:45 PM (IST)

  एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करायला हवा- संजय राऊत

  माजी महापौर आणि उपनेते दत्ता दळवी यांना आज सकाळी घरात घुसून अटक केली. दत्ता दळवी यांचा गुन्हा काय आहे? राज्यातील या जनतेच्या लोकभावना त्यांनी मांडल्या, महाराष्ट्रातील गद्दार हृदय सम्राट आहेत. ते स्वतःला हिंदुरुदय सम्राट म्हणून घेत आहेत, त्याच्यावर तमाम हिंदूंचा आणि जनतेचा आक्षेप आहे. गद्दार हृदय सम्राट यांनी स्वतःला हिंदुरुदय सम्राट म्हणून घेणं हे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. त्याबद्दल खरं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करायला हवा असल्याचं संजय राऊत म्हणाले.

 • 29 Nov 2023 12:30 PM (IST)

  बीडमध्ये झालेल्या जाळपोळ मागे शक्तिशाली व्यक्तीचा हात- रोहित पवार

  बीडमध्ये झालेल्या जाळपोळ नंतर मी बीड ला स्वतः गेलो होतो त्याठिकाणी झालेल्या जाळपोळ मागे एका शक्तिशाली व्यक्तीचा हात होता. या मागे सत्तेत असण्याऱ्या व्यक्तीचा हात होता सात तास जाळपोळ चालू होती पोलीस शांत होते ,अशा परिस्तिथीमध्ये मराठा आणि ओबीसी समाजा मध्ये वाद वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न तिथे झाल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

 • 29 Nov 2023 12:15 PM (IST)

  देहू संस्थानच्या विश्वस्थानी देहूच्या हक्काच्या गायरानासाठी बेमुदत उपोषणाची हाक

  देहू मधील दीडशे एकर गायराना पैकी 50 एकर गायरान हे पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी देण्याच्या हालचाली सरकारकडून सुरु आहेत. देहूकरांचा याला विरोध असून हे गायरान देहूकरांच्या हक्काचं असल्याचं म्हणत तिथं वारकरी भवनासह इतर वास्तू उभारण्यासाठी आणि दिंडी विसाव्यासाठी आरक्षित करावं अशी मागणी देहूच्या विश्वस्थानी केली आहे. जोपर्यंत सरकार आमच्या बेमुदत उपोषणाची दखल घेत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण करण्यावर ठाम असल्याची भूमिका देहू संस्थांच्या विश्वस्थानी मांडली आहे

 • 29 Nov 2023 11:56 AM (IST)

  Maharashtra News : ठाकरे गटाच्या दत्ता दळवी यांना मुलूंड कोर्टात हजर केलं जाणार

  ठाकरे गटाच्या दत्ता दळवी यांना मुलूंड कोर्टात हजर केलं जाणार आहे. मुख्यमंत्री शिंदेंबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल दळवीनां भांडूप पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. भांडूपमधिल ठाकरे गटाच्या मेळाव्यात दळवींनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते.

 • 29 Nov 2023 11:51 AM (IST)

  Maharashtra News : भुजबळांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडावं- विखे पाटील

  भुजबळांनी मंत्रीपदाचा राजिनामा देऊन बाहेर पडावं, भुजबळांना त्यांचे राजकीय पुनर्वसन करायचे आहे का असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. तर, भुजबळ पदाला चिटकून बसून गरळ ओकणारे मंत्री असल्याचं जरांगे पाटील म्हणाले.

 • 29 Nov 2023 11:36 AM (IST)

  Maharashtra News : आमदार अपात्रता प्रकरणी शिंदे गटाच्या आमदारांची उलट तपासणी

  आमदार अपात्रता प्रकरणी शिंदे गटाच्या आमदारांची लवकरच उलट तपासणी होणार आहे. पाच आमदार आणि एका खासदाराची साक्ष नोंदवली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शिंदे गटाकडून साक्ष, पुरावे, प्रतिज्ञापत्र अध्यक्षांकडे सुपूर्त करण्यात आले आहे.

 • 29 Nov 2023 11:25 AM (IST)

  Maharashtra News : नागपूरात मुसळधार पावसामुळे धान पिकांचं नुकसान

  नागपूरात झालेल्या अवकाळी पावसामुळे धान पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मौदा आणि रामटेकमध्ये कापणीला आलेलं पिक खराब झालं आहे. अवकाळी पावसामुळे वातावरणातही मोठा बदल झाला आहे.  तापमाणाचा पारा खाली घसरला आहे.

 • 29 Nov 2023 11:13 AM (IST)

  Maharashtra News : राज्य सरकारने रविकांत तुपकर यांना चर्चेसाठी वेळ दिला

  राज्य सरकारने रविकांत तुपकर यांना चर्चेसाठी वेळ दिला आहे. त्यांना संध्याकाळी 4 वाजता चर्चेसाठी सह्यांद्रीवर बोलावण्यात आले आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादकांच्या मागणीसाठी रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत.

 • 29 Nov 2023 11:10 AM (IST)

  Winter Assembly 2023 : हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासूनच सुरू होण्याची शक्यता

  नागपूरात होणारे हिवाळी अधिवेशन हे 7 डिसेंबरपासूनच सुरू होण्याची शक्यता आहे. आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

 • 29 Nov 2023 10:52 AM (IST)

  चेंबूर परिसरात गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट, चौघे जखमी

  चेंबूर परिसरात गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट होऊ चौघेजण जखमी झाले आहेत. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने घर कोसळले. यातील चार जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 • 29 Nov 2023 10:49 AM (IST)

  संभाजीनगर - जालना रोडवर धनगर समाजाचा रस्ता रोको

  छ. संभाजीनगर ते जालना या मार्गावर धनगर समाजातर्फे रस्ता रोको करण्यात येत आहे. हजारो धनगर बांधव जालना महामार्गावर दाखल झाले आहेत.

  धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी महत्वाची मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. याच मागणीसाठी पारंपरिक वेशभूषेत अनेक धनगर बांधव रस्ता रोकोत सहभागी झाले आहेत.

 • 29 Nov 2023 10:34 AM (IST)

  दत्ता दळवींनी वापरलेला शब्द धर्मवीर चित्रपटात वापरलेला आहे - संजय राऊत

  दत्ता दळवींनी वापरलेला शब्द धर्मवीर चित्रपटात वापरलेला आहे. धर्मवीर चित्रपटात वापरण्यात आलेला शब्द सेन्सॉर बोर्डाने काढलेला नाही. तो शब्द चुकीचा असेल तर चित्रपट निर्मात्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

  आम्ही सगळे दत्ता दळवींच्या पाठीशी आहोत, असेही राऊत म्हणाले.

 • 29 Nov 2023 10:31 AM (IST)

  दत्ता दळवींनी जनतेच्या भावना व्यक्त केल्या - संजय राऊत

  दत्ता दळवींनी जनतेच्या भावना व्यक्त केल्या. ज्यांनी गद्दारी केली ते स्वत:ला हिंदूहृदयसम्राट म्हणून घेत आहेत.

 • 29 Nov 2023 10:18 AM (IST)

  मराठ्यांना आरक्षण मिळत असल्याने समाज आनंदी - मनोज जरांगे पाटील

  मराठ्यांना आरक्षण मिळत असल्याने समाज आनंदी आहे. मी नाही म्हटलं तरी समाज माझ्यावर फुलं उधळत आहे. समाज आनंदी असल्याने ते माझं असं स्वागत करत आहेत, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

  ६०-७० वर्षं आम्ही आरक्षणाची वाट पाहिली. आता राज्यात नोंदी सापडायला सुरूवात झाली आहे.

 • 29 Nov 2023 10:04 AM (IST)

  रविकांत तुपकर शेतकऱ्यांसह कर्जतमध्ये दाखल

  रविकांत तुपकर शेतकऱ्यांसह कर्जतमध्ये दाखल झाले आहे. सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे, पण बैठकीची वेळच दिली नाही. थोड्याच वेळात तुपकर हे मुंबईच्या दिशेने निघणार आहेत.

 • 29 Nov 2023 09:59 AM (IST)

  मराठवाड्यात पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज

  छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. अवकाळी पावसामुळे 47 हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे 598 गावं बाधित झाली असून बागायती क्षेत्राचं सर्वाधिक जास्त नुकसान झालं आहे.

 • 29 Nov 2023 09:55 AM (IST)

  पावसाळा संपल्यानंतरही नाशिक शहरात डेंग्यूचा कहर सुरूच

  पावसाळा संपल्यानंतरही नाशिक शहरात डेंग्यूचा कहर सुरूच आहे. नोव्हेंबर महिन्यात 232 डेंग्यूबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील 120 रुग्ण एकाच आठवड्यात आढळले. जानेवारीपासून आतापर्यंत 987 जणांना डेंग्यूची लागण झाली. खासगी रुग्णालयात देखील रुग्णसंख्या जास्त असण्याची शक्यता आहे.

 • 29 Nov 2023 09:45 AM (IST)

  जानेवारी महिन्यात नाशिकमध्ये ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन

  जानेवारी महिन्यात नाशिकमध्ये ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन होणार आहे. नव्या वर्षात 22 किंवा 23 जानेवारी ही तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे. 1994 मध्ये नाशिकमध्ये अधिवेशन घेतल्यानंतर राज्यात शिवसेनेची सत्ता आली होती. त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे. त्र्यंबक रोडवरील ज्या हॉटेलमध्ये भाजपचा मेळावा झाला होता, त्याच ठिकाणी ठाकरे गटाचं अधिवेशन होणार आहे.

 • 29 Nov 2023 09:30 AM (IST)

  विनायक राऊत करणार नाशिकमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

  नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट यांमुळे शेतीचं खूप नुकसान झालं आहे. ठाकरे गटाचे नेते आणि सचिव विनायक राऊत हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. विनायक राऊत हे इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक या ठिकाणी पाहणी करणार आहेत. विनायक राऊत यांच्यासह उपनेते नितीन बानगुडे-पाटील, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर हेसुद्धा पाहणी करणार आहेत.

 • 29 Nov 2023 09:20 AM (IST)

  ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक

  ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल अपशब्द वापल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. विक्रोळी इथल्या राहत्या घरातून त्यांना अटक करण्यात आली आहे.

 • 29 Nov 2023 09:19 AM (IST)

  भिडे वाड्यातील रहिवाशी आणि व्यावसायिकांची सुप्रीम कोर्टात धाव

  भिडे वाड्यातील रहिवाशी आणि व्यावसायिकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाच्या जागा हस्तांतरणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. जागेचा ताबा सोडण्यासाठी वेळ मिळावा अशी मागणी त्यांनी केली. मात्र उच्च न्यायालयाने जागा सोडण्यासाठी 3 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. 3 डिसेंबरनंतर महापालिका सक्तीने जागा ताब्यात घेणार आहे. भिडे वाडा आता राष्ट्रीय स्मारक घोषित झालं आहे आणि त्याचं काम सुरू करायचं आहे. मात्र रहिवासी अजूनही ताबा सोडायला तयार नाहीत.

 • 29 Nov 2023 08:57 AM (IST)

  राज्यातील अनेक भागात आजदेखील पाऊसाची शक्यता

  राज्यातील अनेक भागात आजदेखील पाऊस येऊ शकतो,  असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.  मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात आज दिवसभर विजांसह पावसाची शक्यता आहे.  नाशिक, नगर, पुणे , छत्रपती संभाजीनगर सह बीड जिल्ह्याला हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.  तर राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला गेला आहे.

 • 29 Nov 2023 08:45 AM (IST)

  21 वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून हत्या

  पुण्यात 21 वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली आहे.  प्रेमप्रकरणातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.  समलैंगिक संबंधातून ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे.  वाघोली येथील एका महाविद्यालयामध्ये तो शिकत होता आणि वाढीबोलाही येथे एका होस्टेलमध्ये राहत होता. महेश डोके असे हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.

 • 29 Nov 2023 08:30 AM (IST)

  फुकट्या प्रवाशांवर पुणे मेट्रो कारवाई करणार

  फुकट्या प्रवाशांवर पुणे मेट्रो कारवाई करणार आहे.  विना तिकीट मेट्रो ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मेट्रोकडून दंडात्मक कारवाई होणार आहे. विना तिकीट मेट्रोने प्रवास करणाऱ्यांना 85 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.  या आधी विना तिकीट प्रवास केल्यावर प्रवाशांवर कुठलीही कारवाई मेट्रो प्रशासनाकडून करण्यात येत नव्हती. पण यापुढे विना तिकीट प्रवासी आढळल्यास त्या प्रवाशांवर पुणे मेट्रो प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे.

 • 29 Nov 2023 08:15 AM (IST)

  आगामी निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय सूचना दिल्या?

  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्र्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.  सगळ्या मंत्र्यांनी सक्रिय व्हावं. विकसित भारत संकल्प यात्रा शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर राबवावा.  केंद्रीय कृषी मंत्र्याकडे ग्रामीण भागातली जबाबदारी तर माहिती आणि प्रसारण मंत्र्याकडे शहरी भागाची जबाबदारी देण्यात आली आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या मंत्र्यांना केंद्रीय योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 • 29 Nov 2023 07:59 AM (IST)

  Maharashtra News : राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु आजपासून पुण्यात

  राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु आजपासून तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात राष्ट्रपती विविध लष्करी संस्था, कृषी विद्यापीठाला भेट देणार आहे. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार राहणार उपस्थित राहणार आहे.

 • 29 Nov 2023 07:48 AM (IST)

  Maharashtra News : रेल्वे ओव्हर ब्रिजचा कठडा कोसळला

  नाशिक जिल्ह्यातील मनमाडचा रेल्वे ओव्हर ब्रिजचा कठडा कोसळला. या अपघातात सुदैवाने जिवित हानी झाली नाही. या पुलाचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग खचल्यामुळे इंदूर - पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. शहाराचा दोन्ही भागाला जोडणारा हा पूल होता.

 • 29 Nov 2023 07:35 AM (IST)

  Maharashtra News : राष्ट्रवादी कोणाची? आज सुनावणी

  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांची की शरद पवार यांची यावर बुधवारी केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. अजित पवार गटाने दिलेली शपथपत्र खोटी असल्याचा दावा शरद पवार गटाने केला होता.

 • 29 Nov 2023 07:21 AM (IST)

  Maharashtra News : शिवसेना कोणाची? आजपासून सुनावणी

  शिवसेना कोणाची यावर आजपासून सलग पाच दिवस सुनावणी होणार आहे. दरम्यान ठाकरे गटाने दिलेली कागदपत्रे खोटी असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला आहे.

Published On - Nov 29,2023 7:30 AM

Follow us
चव्हाणांना भाजपात घेण्याची रिस्क का? किती फायदा? फडणवीस म्हणाले....
चव्हाणांना भाजपात घेण्याची रिस्क का? किती फायदा? फडणवीस म्हणाले.....
मोदींची गॅरंटी म्हणजे काय... फडणवीसांनी एका वाक्यात सांगितला अर्थ
मोदींची गॅरंटी म्हणजे काय... फडणवीसांनी एका वाक्यात सांगितला अर्थ.
मनसेला महायुतीत घेणार का? मिले सूर मेरा...फडणवीस यांनी काय दिले संकेत?
मनसेला महायुतीत घेणार का? मिले सूर मेरा...फडणवीस यांनी काय दिले संकेत?.
पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा, पाटील भावूक; काय होत्या त्यावेळी भावना
पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा, पाटील भावूक; काय होत्या त्यावेळी भावना.
काका-पुतण्यांमध्ये आधीपासूनच संघर्ष होता? जयंत पाटील यांचा मोठा खुलासा
काका-पुतण्यांमध्ये आधीपासूनच संघर्ष होता? जयंत पाटील यांचा मोठा खुलासा.
'अजितदादाचं भाजपसोबत जायचं ठरलं तेव्हा...' पाटलांनी सांगितलं काय घडलं?
'अजितदादाचं भाजपसोबत जायचं ठरलं तेव्हा...' पाटलांनी सांगितलं काय घडलं?.
Sanjay Raut कुणाचे लाडके? पवार की उद्धव ठाकरे? राऊत काय म्हणाले बघा...
Sanjay Raut कुणाचे लाडके? पवार की उद्धव ठाकरे? राऊत काय म्हणाले बघा....
उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर संजय राऊत यांची भूमिका काय असणार?
उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर संजय राऊत यांची भूमिका काय असणार?.
संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, उद्धव ठाकरे यांना भाजपची ऑफर?
संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, उद्धव ठाकरे यांना भाजपची ऑफर?.
मोदींच्या सातबाऱ्यावर रामाचं नाव? मोदी गॅरंटीवर सवाल अन् भडकले राऊत
मोदींच्या सातबाऱ्यावर रामाचं नाव? मोदी गॅरंटीवर सवाल अन् भडकले राऊत.