Coastal Road Accident : कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना भिडली, इतके जण जखमी

Mumbai Coastal Road Accident : मुंबईतील कोस्टल रोडवर भीषण अपघात झाला आहे. चार ते पाच वाहनांची एकमेकांना धडक लागल्याने हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात नऊ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

Coastal Road Accident : कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना भिडली, इतके जण जखमी
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: May 04, 2025 | 2:21 PM

मुंबईतील कोस्टल रोडवर भीषण अपघात झाला आहे. चार ते पाच वाहनांची एकमेकांना धडक लागल्याने हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात नऊ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोस्टल रोडवर अपघातांची मालिका सुरूच आहे. कोस्टल रोडवर सुसाट वाहनांवर आणि निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी करण्यात येत आहे. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

4 ते 5 वाहनं धडकली

मुंबई कोस्टल रोडवर भीषण अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. कार, टॅक्सी आणि इतर वाहनांचा यात समावेश होता. या वाहनांची अचानक एकमेकांना जोरदार धडक दिली. ही वाहनं एकमेकांवर आदळल्या. या सर्व वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर एकूण 9 प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

नेमकी चूक कुणाची?

कोस्टल रोडवर वाहनं अति वेगाने येतात. एखाद्या वेळी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघातात होतात. या अपघातात इरटिगा चालकाची चूक असल्याचे काही जण सांगतात. त्याने अचानक ब्रेक मारल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. तर दुसरीकडे काही जण टॅक्सी चालकाची चूक असल्याचे सांगत आहेत. या अपघातात 9 प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, त्यांना नजीकच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी ॲम्ब्युलन्स पण दाखल झाली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. पुढील तपास आता पोलीस करत आहेत.

अपघाताची मालिका सुरूच

कोस्टल रोडवर गेल्या काही दिवसांपासून अपघाताची मालिका सुरूच आहे. दोन महिन्यांपूर्वी या रोडवर रात्री कारचा भीषण अपघात झाला होता. त्यात कार दोनदा पलटी झाली होती. त्यात 19 वर्षीय तरुणी ठार झाली होती. तर तरुण गंभीर जखमी झाला होता. आता पुन्हा या रस्त्यावर अपघात झाला आहे. त्यामुळे या मार्गावर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.