Gulabrao Patil : हे महायुतीचं धोरण आहे का? अजितदादांच्या ‘त्या’ निर्णयावर भाजप आणि शिंदे गटाचा जोरदार हल्ला
Gulabrao Patil Criticized : खानदेशातील राजकीय वातावरण सध्या ढवळून निघाले आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीने पक्ष विस्ताराचे वारू उधळल्याने खानदेशात अनेक जण नाराज झाले आहेत. त्यातच मंत्री गुलाबराव पाटील यांनी तर आघाडी उघडली आहे.

खानदेशात अनेक जण पक्ष बदलांची कदमताल करत आहे. विविध पक्षांच्या तालमींतून बाहेर पडलेले काही जण आता राजकीय आकाश शोधत आहे. त्यांना अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मदतीचा हात दिला आहे. खानदेशातील आजी-माजी मंत्र्यांच्या पक्ष प्रवेशामुळे अनेक जण नाराज झाले आहेत. त्यातच मंत्री आणि शिंदे सेनेची बुलंद तोफ गुलाबराव पाटील यांनी आघाडी उघडली आहे.
गुलाबराव देवकर आता ओके झाले काय?
मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर तुफान हल्लाबोल केला आहे. ज्या अजित दादांवर देवकर यांनी नेहमी टीका केल्या, अजित दादांना काळे झेंडे दाखविले, त्याच गुलाबराव देवकरांना अजित दादांनी त्यांच्या पक्षात घेतले आहे. गुलाबराव देवकर जे आम्हाला गद्दार म्हणत होते, खोके म्हणत म्हणत होते..ते मग काय आता ओके झाले काय? असा खडा सवाल त्यांनी केला.




भ्रष्टाचारामुळे काढला पळ
आपण केलेल्या भ्रष्टाचाराचा पांघरून घालण्यासाठी हे लोक त्या पक्षात गेलेले आहेत, अशी टीका त्यांनी केली. देवकर यांच्या जेव्हा 100 गोष्टी बाहेर येतील तेव्हा अजित दादा सुद्धा म्हणतील की गुलाबराव पाटील खरं म्हणत होते. देवकर यांना पक्षात घेण्याआधी अजित दादा यांनी काम एकदा एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करायला हवी होती, की खरच महायुतीचे हे धोरण आहे का…म्हणून, अशी टीका पाटील यांनी केली.
त्यांच्या चौकश्या सुरू…
प्रत्येकाला मुभा आहे , त्यानुसार आम्ही आमच्या पक्षासाठी आमच्या मनाप्रमाणे काम करू, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. देवकर यांनी जिल्हा बँकेतून घेतलेले कर्ज , मजूर फेडरेशन मधील घोटाळा याबाबत चौकश्या सुरू असताना त्यांना पक्षात घेतले कसे? संबंधित खाते हे यांच्याकडे असल्याने ते दाबण्यासाठी देवकर तिकडे गेले असा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला आहे .
गुलाबराव पाटील ही देवकरांची घाण साफ होऊ देणार नाही. लोकांसमोर आणेल असा इशारा सुद्धा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. गुलाबराव देवकर यांनी काल राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे, त्यावरून मंत्री गुलाबराव पाटील अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.