मुंबईत कोरोना लसीकरणाला वारंवार ब्रेक, तिसरी लाट कशी रोखणार?

| Updated on: Jul 11, 2021 | 2:24 PM

कोरोना रोखण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण होणं गरजेचं आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी देखील लसीकरण महत्वाचं आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणं आहे.

मुंबईत कोरोना लसीकरणाला वारंवार ब्रेक, तिसरी लाट कशी रोखणार?
BMC Corona Vaccine
Follow us on

मुंबई : मुंबईत कोरोना लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर दोन दिवस लसीकरण केंद्र बंद आहेत. केंद्र सरकारकडून पालिकेला पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत असं प्रशासनाच म्हणणं आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट मुंबई महापालिका कशी रोखणार? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. (Mumbai Corona Vaccination has been closed how to stop the third wave of corona BMC Additional Commissioner Suresh Kakani)

मुंबईत कोरोना लसीकरणाला ब्रेक

मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून लसीकरण बंद आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या आधी जास्तीत जास्त लसीकरण होणं गरजेचं आहे. मात्र असे असतानाही मुंबईत कोरोना लसीकरणाला ब्रेक लागत आहे. त्यामुळे मुंबई महापालिका कोरोनाची तिसरी लाट कशी रोखणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कोरोनाची तिसरी लाट कशी रोखणार?

मुंबईत कोरोना लसींचा अपुरा पुरवठा होत आहे. त्यामुळे वारंवार लसीकरण बंद होत आहे. कोरोना रोखण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण होणं गरजेचं आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी देखील लसीकरण महत्वाचं आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणं आहे.

पण केंद्र सरकारकडून पालिकेला पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत अस प्रशासनाच म्हणणं आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाची तिसरी लाट कशी थोपवता येईल? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

?मुंबईत आतापर्यंत झालेले लसीकरण

?आरोग्य कर्मचारी  – 3 लाख 18 हजार 279

? फ्रंटलाईन वर्कर – 3 लाख 77 हजार 672

? जेष्ठ नागरिक – 14 लाख 77 हजार 872

? ४५ ते ५९ वयोगट –  17 लाख 65 हजार 598

? १८ ते ४४ वयोगट – 20 लाख 56 हजार 114

? स्तनदा माता – 3548

? मानसिक रुग्ण – 296

? परदेशी शिक्षण घेणारे विद्यार्थी, कामगार, ऑलम्पिक खेळाडू – 8646

? एकूण लसीकरण – 60 लाख 9 हजार 25

(Mumbai Corona Vaccination has been closed how to stop the third wave of corona BMC Additional Commissioner Suresh Kakani)

संबंधित बातम्या : 

ओळखपत्रधारक पत्रकार, लसीचे 2 डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या, रेल्वे प्रवासी सल्लागार समितीची मागणी

कोरोनाच्या लस संपल्या, मुंबईत शनिवारी, रविवारी शासकीय, महापालिका केंद्रांवर लसीकरण बंद

धारावीकरांसाठी विशेष लसीकरण मोहिम, 10 हजार नागरिकांना मोफत लस