धारावीकरांसाठी विशेष लसीकरण मोहिम, 10 हजार नागरिकांना मोफत लस

मुंबईच्या धारावीतील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत कोरोना लसीकरण मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.

धारावीकरांसाठी विशेष लसीकरण मोहिम, 10 हजार नागरिकांना मोफत लस
Dharavi vaccination
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 4:12 PM

मुंबई : मुंबईच्या धारावीतील नागरिकांसाठी खासदार राहुल शेवाळे आणि श्री राधा फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत कोरोना लसीकरण मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. या मोहिमेत आयसीआयसीआय लोम्बार्ड आणि सुराना हॉस्पिटलच्या सहाय्याने दोन दिवसांत सुमारे दहा हजार धारावीकरांना मोफत कोरोना लस दिली जाणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार सदा सरवणकर, नगरसेवक वसंत नकाशे, विधानसभा समन्वयक विठ्ठल पवार यांच्यासह अन्य मानव्यर उपस्थित होते. (Free vaccination campaign in Dharavi, Rahul Shewale’s initiative to vaccinate 10,000 people)

कोरोनाच्या पहिल्या लाटेत धारावी हा मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. मात्र, राज्य सरकार, मुंबई मनपा, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि स्थानिक जनता यांच्या एकत्रित प्रयत्नांनी धारावीने यशस्वीरित्या कोरोनावर मात केली. त्यानंतर प्लाझ्मा दानातही धारावीकरांनी पुढाकार घेतला होता. आता कोरोना लसीकरणा बाबतीतही आघाडी घेण्याच्या उद्देशाने धारवीकरांसाठी या मेगा लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री राधा फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आली.

राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीने धारावीमध्ये मोफत कोरोना लसीकरण केले जात आहे. मात्र, दाट लोकसंख्येच्या धारावीतील लसीकरण प्रक्रियेला आणखी गती मिळावी आणि सरकारी यंत्रणांवरील भार काही प्रमाणात कमी व्हावा, या हेतूने आयसीआयसीआय लोम्बार्डच्या सहाय्याने मेगा लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या काळात अशाच रीतीने मोठ्या प्रमाणात धारवीकरांचे लसीकरण करण्याचा आमचा मानस आहे, असं राहुल शेवाळे म्हणाले.

मुंबईत आज आणि उद्या लसीकरण बंद

कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर आज (शनिवार, 10 जुलै) लसीकरण बंद राहणार आहे. तसेच रविवारी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी लसीकरण कार्यक्रम नियमित सुट्टी म्हणून बंद राहील.

लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेऊन मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लशींचा साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

इतर बातम्या

Mumbai Local Updates: कोरोना लसीकरण झालेल्या नागरिकांना लोकल ट्रेनने प्रवास करता येणार?

ब्रिटनने मास्कसह सगळे निर्बंध हटवले, राऊत म्हणाले, ‘त्यांचा निर्णय आत्मघातकी आणि जगासाठी धोकादायक’

(Free vaccination campaign in Dharavi, Rahul Shewale’s initiative to vaccinate 10,000 people)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.