ओळखपत्रधारक पत्रकार, लसीचे 2 डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या, रेल्वे प्रवासी सल्लागार समितीची मागणी

मध्य रेल्वेचे विशेष सल्लागार सदस्य अभिजीत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत लोकल सेवा सुरू करावी, अशी मागणी केली आहे.

ओळखपत्रधारक पत्रकार, लसीचे 2 डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या, रेल्वे प्रवासी सल्लागार समितीची मागणी
Mumbai local train
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 10:06 PM

नवी मुंबई : मुंबई आणि उपनगरातील लोकल ट्रेन सर्वसामांन्यांसाठी कधी सुरू होणार? हा प्रश्न सर्वांच्या मनात येत आहे. करोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईतील परिस्थिती हळूहळू पुन्हा पूर्वपदावर येताना दिसत आहे. मुंबईतील दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील घटत आहे. मुंबईत सध्या जे निर्बंध लागू आहेत त्यात शिथिलता देण्याबाबतही पालिकेने सावधपणे पावलं टाकायचे ठरवले आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी याबाबत माहिती दिली. (Railway Passengers Advisory Committee demands to allow Journalists and double 2 dose vaccinators to travel by Mumbai local train)

अशातच मध्य रेल्वेचे विशेष सल्लागार सदस्य अभिजीत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत लोकल सेवा सुरू करावी, अशी मागणी केली आहे. अभिजीत पाटील हे प्रादेशिक रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे विशेष सदस्य आहेत. त्यांनी त्यांच्या पत्रात लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना आणि ज्या नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशा प्रवाशांसाठी मुंबईल लोकलने प्रवास करायची अनुमती द्यावी, असा उल्लेख पत्रात केला आहे. रेल्वे आणि रेल्वे प्रवासी यांच्या मूलभूत गरजा याकडे ही कमिटी लक्ष देत असते आणि याबाबत रेल्वे प्रशासनाला सूचना दिल्या जातात.

कोरोना लसीकरण झालेल्या नागरिकांना लोकल ट्रेनने प्रवास करता येणार?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मुंबईत लागू झालेले निर्बंध अद्याप कायम आहेत. कोरोनाची दुसरी लाट (Coronavirus) नियंत्रणात येऊनही हे निर्बंध शिथील करण्यात आले नव्हते. त्यामुळे आता मुंबईकर हे निर्बंध कधी उठणार, असा सवाल विचारू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून लवकरच महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. येत्या 15 तारखेला यासंदर्भात बैठक होणार आहे. तेव्हा मुंबईकरांना निर्बंधामधून सूट देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकते.

लसीकरण झालेल्या मुंबईकरांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा द्यायची का, यावरही बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे. मुंबईत पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या निम्यापेक्षा जास्त आहे. तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ज्यांनी दोन डोस घेतलेले आहेत त्यांना भविष्यात काही सवलती देण्याचा विचार होऊ शकतो. दुकाने, शासकीय, निमशासकीय किंवा खाजगी कार्यालयात उपस्थिती वाढविण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. याचा निर्णय आठ दिवसांत होईल. मात्र, यामध्ये लोकल ट्रेनचा समावेश होण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण आजूबाजूच्या शहरांमधील स्थितीचा विचार करावा लागेल. याचा निर्णय राज्य स्तरावर होईल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

मुंबईत कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबरमध्ये येईल हे गृहीत धरून पालिकेनं सर्व तयारी केली आहे. ऑक्सिजन, बेड, औषधे, डॉक्टर यांची जुळवाजुळव सुरू आहे. जुन्या जम्बो कोवीड सेंटरची डागडुजी झालेली आहे. मालाडचे नवे जम्बो कोवीड सेंटर पालिकेच्या ताब्यात आलेले आहे. इतर तीन जम्बो सेंटर महिन्याअखेरीस तयार होतील. दुसऱ्या लाटेपेक्षा तिस-या लाटेची तीव्रता कमी असेल असा अंदाज असला तरी आम्ही मात्र रूग्ण वाढतील हे गृहित धरून सर्व तयारी करत आहोत, असे मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सांगण्यात आले.

12 लाख मुंबईकरांना कोरोना लसीचे दोन्ही डोस

आतापर्यंत 12 लाख मुंबईकरांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तर 46,81,780 जणांना कोरोना लसीचा एकच डोस मिळाला आहे. आतापर्यंत एकूण 59 लाख 29 हजार नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे.

संबंधित बातम्या:

ब्रिटनने मास्कसह सगळे निर्बंध हटवले, राऊत म्हणाले, ‘त्यांचा निर्णय आत्मघातकी आणि जगासाठी धोकादायक’

कोरोनाच्या लस संपल्या, मुंबईत शनिवारी, रविवारी शासकीय, महापालिका केंद्रांवर लसीकरण बंद

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा वाढ, अ‍ॅक्टिव्ह केसेसही वाढल्या

(Railway Passengers Advisory Committee demands to allow Journalists and double 2 dose vaccinators to travel by Mumbai local train)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.