AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती; राज्यपाल रमेश बैस यांनी मुख्यमंत्र्यांना काय केली सूचना?

इंदू मिल कंपाउंड येथे आकार घेत असलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक सर्वांसाठी व विशेषतः देशातील युवकांसाठी प्रेरणास्थळ सिद्ध होईल, असे राज्यपालांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती; राज्यपाल रमेश बैस यांनी मुख्यमंत्र्यांना काय केली सूचना?
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Apr 14, 2023 | 5:36 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र (Maharashtra) व विशेषतः मुंबई ही डॉ बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची कर्मभूमी होती. या शहरात त्यांनी अध्ययन व अध्यापन केले. पक्षाचे कार्य केले तसेच निवडणूक देखील लढवली. त्यांच्या कार्याच्या अनेक खुणा या शहरात आहे. ही स्थळे सर्वांना पाहता यावी याकरिता मुंबई दर्शन बससेवेप्रमाणे ‘डॉ आंबेडकर सर्किट दर्शन’ अशी बससेवा सुरु करण्यात यावी, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली. तसेच इंदू मिल कंपाउंड येथे आकार घेत असलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक सर्वांसाठी व विशेषतः देशातील युवकांसाठी प्रेरणास्थळ सिद्ध होईल, असे राज्यपालांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिस्थळावर पुष्पांजली अर्पण केली. महामानवास अभिवादन केलं. यावेळी सामुदायिक त्रिशरण बुद्ध वंदना करण्यात आली. राज्यपालांच्या हस्ते चैत्यभूमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. चैत्यभूमीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी राज्यपालांनी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेवरील छायाचित्रांच्या प्रदर्शनाला भेट दिली. राज्यपालांच्या हस्ते बौद्ध भिक्खूंना चिवरदान (पवित्र वस्त्र) देण्यात आले.

यावेळी महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईचे पालक मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, माजी खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर आदी उपस्थित होते.

‘इंदू मिलचे स्मारक कसे असेल?

आज भारत जगात सशक्त लोकशाही देश म्हणून उभा आहे, याचे श्रेय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेला आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच इंदू मिल येथे जगाला हेवा वाटेल असे स्मारक निर्माण होत असल्याचे सांगून स्मारकासंदर्भात प्रकाश आंबेडकर व आनंदराज आंबेडकर यांनी केलेल्या सूचना विचारात घेऊन स्मारकातील त्रुटी दूर करण्यात येतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

.. यांचे कार्य सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवावे- फडणवीस

जगाच्या इतिहासात समाज उत्थानासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवावे असे आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. आज भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली आहे, याचे कारण डॉ आंबेडकर यांनी दिलेले संविधान असल्याचे त्यांनी सांगितले. ‘द प्रॉब्लेम ऑफ इंडियन रुपी’ हे पुस्तक 100 वर्षांपूर्वी लिहून डॉ आंबेडकर यांनी देशाला काळ्या पैशाच्या समस्येतून बाहेर कसे काढता येईल, याचे विवेचन केले होते. त्यातून त्यांचे द्रष्टेपण दिसून येते, असे फडणवीस यांनी सांगितले.

Follow Us
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....