मुंबईत कोरोना फोफावतोय, लॉकडाऊनबाबत पालकमंत्र्यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

लोकांनी ऐकलं नाही तर जगाने स्वीकारलेला लॉकडाऊनचा पर्याय आपल्यालासुद्धा स्वीकारावा लागेल, असे अस्लम शेख म्हणाले. (mumbai aslam shaikh corona lockdown)

मुंबईत कोरोना फोफावतोय, लॉकडाऊनबाबत पालकमंत्र्यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
अस्लम शेख आणि कोरोना विषाणूचा सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 06, 2021 | 6:09 PM

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राजधानी मुंबईत तर ही परिस्थिती जास्तच गंभीर आहे. मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर येथे आगामी काळात परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आगामी काळात मुंबईत लॉकडाऊन लागू होणार असल्याचेही सांगितले जात आहे. याचे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत. “लोकांचा जीव वाचवणं ही आपली पहिली प्राथमिकता आहे. आपण अजूनही लॉकडाऊन लागू केलेला नाही. मात्र, लोकांनी ऐकलं नाही तर जगाने स्वीकारलेला लॉकडाऊनचा पर्याय आपल्यालासुद्धा स्वीकारावा लागेल, असे अस्लम शेख म्हणाले. (Mumbai guardian minister Aslam Shaikh said if people not following corona rule will implement lockdown)

“जगात जिथे जिथे लॉकडाउन लावण्यात आला आहे या सर्व ठिकाणी लोकांनी लॉकडाऊनला विरोध केला. मात्र लोकांचा जीव वाचवणं ही आपली पहिली प्राथमिकता आहे. आपण अजूनही लॉकडाऊन लागू केलेला नाही. सध्या सर्व बसेस, ट्रेन सुरु आहेत. मात्र, लोकांनी ऐकलं नाही तर जगाने जो लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारला आहे; तो स्वीकारावा लागेल,” असे शेख म्हणाले.

सध्यातरी नियम समजाऊन सांगत आहोत

राज्यात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू असल्यामुळे नागरिकांमध्ये राज्य सरकारने लागू केलेल्या काही नियमांबाबत संदिग्धता आहे. त्यामुळे अजूनही काही ठिकाणी लोकांची गर्दी दिसत आहे. याच विषयावर बोलताना सध्याचे नियम नवे असल्यामुळे लोकांना समजत नसावेत असे शेख म्हणाले. “कोरोनाला थोपवण्यासाठी आपण नियमावली केली आहे. ती लोकांना कदाचित समजली नसेल. पहिला दिवस होता त्यामुळे लोकांना नियम समजले नसतील. आजचा दुसरा दिवस आहे. पोलीस आणि पालिका प्रशासन लोकांना सध्या राज्य सरकारने लागू केलेले नियम समजाऊन सांगत आहेत. सध्यातरी पोलीस आणि पालिका लोकांना नियम पाळण्याचे फक्त आवाहन करत आहेत,” असे अस्लम शेख म्हणाले.

हा अंतिम प्रयोग, नंतर लॉकडाऊन

राज्य सरकारने कोरोनाला थोपवण्यासाठी अनेक प्रतिबंधात्मक नियम लावले. मात्र, नागरिकांकडून या नियमांचे पालन केले जात नाही. परिमाणी मुंबईत अनेक ठिकाणी कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावर नाराजी व्यक्त करत अस्लम शेख यांनी मुंबईतील नागरिकांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. “सध्या लागू असलेले नियम हा अंतिम प्रयोग आहे. त्यानंतरही जर कोरोनाच्या स्थितीत बदल झाला नाही झाला तर जगात ज्या पद्धतीने लॉकडाऊन लावण्यात आला तशाच प्रकारे लॉकडाऊन लावावा लागेल. सध्यातरी फक्त लोकांना समजाऊन सांगायचं आणि लॉकडाऊन न करणे यावर आमचा भर आहे. सध्या आम्ही आरोग्यसेवा जास्तीत जास्त सुधारण्यावर भर देत आहोत,” असाही अस्लम शेख म्हणाले

इतर बातम्या :

Corona Vaccine: महाराष्ट्रात सुपरफास्ट लसीकरण; दिवसाला चार लाख लोकांना लस

सध्याचा काळ चॅलेंजिंग, प्रशासकिय कामात राजकीय हस्तक्षेप होणार नाही; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची ग्वाही

अंबानींच्या घराखाली बॉम्बची गाडी ठेवली कुणी हे महत्त्वाचं, विषयाला फाटा नको : राज ठाकरे

(Mumbai guardian minister Aslam Shaikh said if people not following corona rule will implement lockdown)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.