विरोधकांच्या मनासारखे होणार नाही, हॉटेल, रेस्टोरंट, मॉलबाबत विचार करुन निर्णय घेऊ : अस्लम शेख

मुंबईतील निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. आता रेस्टोरंट, हॉटेलची वेळ वाढवण्यावर चर्चा झाली. सध्या 4 वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे. रात्री 10 वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्याबाबत चर्चा झाली. येत्या 1 ते 2 दिवसात यावर निर्णय होईल.

विरोधकांच्या मनासारखे होणार नाही, हॉटेल, रेस्टोरंट, मॉलबाबत विचार करुन निर्णय घेऊ : अस्लम शेख
Aslam Shaikh

मुंबई : मुंबईतील निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. आता रेस्टोरंट, हॉटेलची वेळ वाढवण्यावर चर्चा झाली. सध्या 4 वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे. रात्री 10 वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्याबाबत चर्चा झाली. येत्या 1 ते 2 दिवसात यावर निर्णय होईल. आजच्या कॅबिनेट बैठकीतही यावर चर्चा होईल, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

मॉलबाबत सुद्धा प्रश्न आहेत. इनडोअर गेम सुरू करण्यासाठी सुद्धा मागणी होत आहे. सर्वांचा बारकाईने विचार केला जाईल, असं अस्लम शेख यांनी सांगितलं.

सरकारला बरीच कामं, विरोधकांच्या दबावाला झुकणार नाही

सरकारला बरीच कामे पहावे लागतात. मुंबईची परस्थिती आधीसारखी होऊ नयेत. टप्याटप्याने सर्व सुरू करण्याचा प्रयत्न आहे. विरोधक कितीही दबाव टाकत असले, तरी आम्ही सर्वांचा विचार करत आहोत. गणेशोत्सव येत आहे, त्याबाबतसुद्धा नियमावली तयार होत आहे. मुखमंत्री स्वतः या सर्व बाबींवर काम करत आहेत, अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली.

विरोधकांच्या मनासारखे होणार नाही

विरोधकांच्या मनासारखे होणार नाही. मार्केटसुद्धा आम्ही खोलण्याच्या तयारीत आहोत. शाळा उघडण्यासाठी अनेकांची विविध मते आहेत. उद्या जर आपण सर्व खुले केले आणि पुन्हा केसेस वाढल्या तर मग काय? म्हणून आम्ही सर्व अभ्यास करून मगच खुले करू, असंही अस्लम शेख यांनी स्पष्ट केलं

सर्व कंट्रोलमध्ये येत आहे. आणखी त्यात सुधारणा झाली तर आम्ही दुकाने, मॉल, हॉटेल सुद्धा लवकरच सुरू करू, असंही ते म्हणाले. मुंबईत पालकमंत्री म्हणून जी काय मगणी होते, ते तक्रार आम्ही ऐकतो त्यानंतर आम्ही टास्क फोर्ससोबत चर्चा करतो. मुख्यमंत्री यांच्याशी सुद्धा आम्ही काय गरजेचे आहे ते सुद्धा कळवतो आणि निर्णय घेतो.

जादूच्या छडीने लस उपलब्ध होत नाही

ऑफलाईन लस सुविधा सुद्धा सुरू करत होतो. जादूच्या छडीसारखे लगेच लस उपलब्ध होणार नाही. आम्ही लसीबाबत केंद्र सरकारकडे मागणी करत आहोत.  विरोधी पक्षांना विचारायला हवं. तुम्ही दबाव टाकण्यापेक्षा लस मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असं आवाहन अस्लम शेख यांनी केलं. जेवढं फास्ट लसीकरण होईल तेवढ्या लवकर आम्ही मुंबईत सुरू करू, असं त्यांनी सांगितलं.

लस न मिळाल्याने लोकांचे हाल होत आहे. ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे. आमची तयारी आम्ही दाखवली. केंद्र सरकार लस वितरणाबाबत दुजाभाव करत आहे.

संबंधित बातम्या 

लोकल पाससाठी मुंबईकरांची रेल्वे स्थानकांवर गर्दी, प्रशासन सज्ज, पाससाठी कोणती कागदपत्रं गरजेची?, वाचा

मुंबईकरांनो, लोकलने प्रवास करायचाय?, मग हे 10 नियम वाचा आणि असा मिळवा पास…!

Published On - 12:56 pm, Wed, 11 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI