‘वकिलांचं हे वागणं चुकीचं’, मास्क काढल्यानं मुंबई उच्च न्यायालयाचा सुनावणी घेण्यास नकार

मुंबई उच्च न्यायालयात या नियमांचं उल्लंघन करत वकिलाने मास्क न घातल्याने न्यायमूर्तींनी सुनावणी घेण्यासच नकार दिल्याची घटना घडलीय.

'वकिलांचं हे वागणं चुकीचं', मास्क काढल्यानं मुंबई उच्च न्यायालयाचा सुनावणी घेण्यास नकार
मुंबई उच्च न्यायालय
Follow us
| Updated on: Feb 27, 2021 | 11:54 PM

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी खबरदारी घेतली जातेय. न्यायालयांमध्ये देखील याबाबत काटोकोर नियम घालून देण्यात आलेत. मात्र, मुंबई उच्च न्यायालयात या नियमांचं उल्लंघन करत वकिलाने मास्क न घातल्याने न्यायमूर्तींनी सुनावणी घेण्यासच नकार दिल्याची घटना घडलीय. न्यायमूर्ती पृथ्वीराज के. चव्हाण यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. तसेच संबंधित वकिल लढत असलेलं प्रकरणही या खंडपीठासमोरून काढण्यात आलं. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोरोना नियमांवरील कठोर भूमिकेची जोरदार चर्चा होत आहे (Mumbai High Court removes matter from board after lawyer removes his mask in court).

मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत रितसर आदेशच काढला आहे. यात न्यायालयाचं काम सुरु असताना आणि न्यायालय आवारातही पूर्णवेळ मास्क घालणं बंधनकारक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. तसेच इतरही कोरोना संसर्ग नियंत्रणासाठीच्या नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याचं म्हटलंय. काही दिवसांपूर्वी न्यायमूर्ती चव्हाण यांच्या कोर्टात सुनावणी सुरू होती. यावेळीही एका वरिष्ठ वकिलांनी सुनावणीसाठी आपला मास्क काढल्याची घटना घडली. हे पाहून न्यायमूर्ती चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली होती.

‘वकिलांनी मास्क न घालणं हे कोरोना नियमांचं उल्लंघन’

मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं, “मास्क न घालणं हे वकिलांचं वागणं म्हणजे कोरोना विषाणूबाबत गाईडलाईन्सचं उल्लंघन आहे. हे चुकीचं आहे. आपण या प्रकरणाची सुनावणी करू शकत नाही. हे प्रकरण या कोर्टात सुनावणीसाठी नको. या कोर्टात कोविड19 बाबत ज्या गाईडलाईन्स आहेत त्याचं पालन केलं जावं.”

देशात इतरही ठिकाणीही न्यायालयांची कठोर भूमिका

ओरिसा उच्च न्यायालयाने सोमवारी (15 फेब्रुवारी) सुनावणी दरम्यान एका वकिलाने आपल्या गळ्यात नेक बँड न घातल्याने त्याला 500 रुपयांचा दंड ठोठावला होता. मद्रास उच्च न्यायालयाने 3 फेब्रुवारी रोजी आपल्या कारमध्ये बसून सुनावलीला हजर राहणाऱ्या एका वकिलाबाबत नाराजी व्यक्त केली होती.

हेही वाचा :

वैद्यकीय शिक्षण विभागातील नोकरभरतीला स्थगिती, तुमची बाजू मांडा, कोर्टाचे सरकारला आदेश

ठाणे TMT जाहिरात घोटाळ्याबाबत गुन्हा दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी; आजच अर्ज करा आणि मिळवा नोकरी

व्हिडीओ पाहा :

Mumbai High Court removes matter from board after lawyer removes his mask in court

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.