मुंबई हादरली! टीव्ही बघण्यासाठी गेलेल्या 5 वर्षीय मुलीवर बलात्कार, मेडिकलच्या विद्यार्थ्याला अटक

आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एका पाच वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Mumbai Five year-old girl raped)

मुंबई हादरली! टीव्ही बघण्यासाठी गेलेल्या 5 वर्षीय मुलीवर बलात्कार, मेडिकलच्या विद्यार्थ्याला अटक
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 30, 2021 | 6:55 AM

मुंबई : राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एका पाच वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मेडिकलला  शिकणाऱ्या एका 23 वर्षीय विद्यार्थ्याने तिच्यावर बलात्कार केला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. (Mumbai Jogeshwari Five year-old girl raped by medical student)

मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या नराधमाकडून बलात्कार

मुंबईतील जोगेश्वरी भागात बेहराम बाग नावाचा परिसर आहे. या ठिकाणी एका पाच वर्षीय मुलीवर 23 वर्षीय मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या नराधमाने बलात्कार केला. गुरुवारी (29 एप्रिल) संध्याकाळी ही घटना घडली. या घटनेमुळे आजूबाजूचा परिसर हादरला आहे. सुनील सुखराम गुप्ता असे आरोपीचे नाव आहे. तो पीडित मुलीच्या घर मालकाचा मुलगा आहे.

नेमकं काय घडलं? 

या पीडित मुलीचे कुटुंब आरोपीच्या घरातील पोटमाळ्यावर भाड्याने राहते. काल संध्याकाळी नेहमीप्रमाणे ती आरोपीच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी गेली. त्यावेळी नराधम आरोपीने दरवाजा बंद करुन तिच्यावर बलात्कार केला. यानंतर काही वेळाने ती मुलगी घरी आली असता रडत होती. तिच्या आईने तिला विचारले असता, तिने हा सर्व घडलेला प्रकार सांगितला.

आरोपीला अटक

यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबाने याबाबत ओशीवरा पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर ओशीवरा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी सुनीलला लगेचच बेड्या ठोकण्यात आला.

कठोर शिक्षा व्हावी, अशी स्थानिकांकडून मागणी 

दरम्यान या सर्व घडलेल्या घटनेमुळे मुंबईसह संपूर्ण परिसर हादरला आहे. या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.  (Mumbai Jogeshwari Five year-old girl raped by medical student)

संबंधित बातम्या : 

मुंबईत अत्यवस्थ रुग्णांची संख्या वाढली, एक हजार ऑक्सिजन बेड, आयसीयू आणि व्हेंटिलेटर वाढवणार

पतीला सोडलं प्रियकराचा हाथ धरला, भांडणानंतर पुन्हा घराची वाट, नंतर प्रियकराने जे केलं ते धक्कादायक !

11 वर्षांची पोटची पोर अपशकुनी असल्याची अंधश्रद्धा, आई-वडिलांच्या छळाने जळगावात बालिकेचा मृत्यू

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.