AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

11 वर्षांची पोटची पोर अपशकुनी असल्याची अंधश्रद्धा, आई-वडिलांच्या छळाने जळगावात बालिकेचा मृत्यू

11 वर्षीय बालिकेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी निर्दयी आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे (Jalgaon Mother Father Superstitions killed Daughter)

11 वर्षांची पोटची पोर अपशकुनी असल्याची अंधश्रद्धा, आई-वडिलांच्या छळाने जळगावात बालिकेचा मृत्यू
आई-वडिलांच्या अंधश्रद्धेमुळे बालिकेचा बळी
| Updated on: Apr 29, 2021 | 11:16 AM
Share

जळगाव : अल्पवयीन मुलगी अपशकुनी असल्याच्या अंधश्रद्धेतून आई-वडिलांनी केलेल्या छळाने तिचा जीव घेतला. जळगाव शहरात पिंपळा शिवारामध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा तिचे आई-वडील जन्मापासून अनन्वित छळ करत होते. या निर्दयी आई-वडिलांनी मुलीला अन्न-पाणी दिले नाही, तिला आंघोळ न करु दिल्याने तिला शारीरिक व्याधीही जडल्या. अखेर या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. (Jalgaon Mother Father Superstitions allegedly killed 11 years old Daughter)

मन हेलावून टाकणारी ही घटना जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंप्राळा हुडको भागात घडली आहे. 11 वर्षीय बालिकेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी निर्दयी आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

आरोपी पिता व्यवसायाने केमिस्ट आहे. त्याचा एक भाऊ डॉक्टर तर दुसरा वकील आहे. मुलीचा जन्म झाला, त्यावेळी तिच्या आजीचे निधन झाले होते. त्यानंतर 2 वर्षांनी त्याच्या मेडिकल दुकानाला आग लागली. या दोन्ही घटनांमुळे बालिका ही अपशकुनी असल्याचा समज त्याने करुन घेतला होता.

आजी-आजोबांनी नेले, आई-वडिलांनी पुन्हा आणले

तेव्हापासून तिला डांबून ठेवणे, जेवण न देणे, मारहाण करणे अशा प्रकारे तिचा छळ सुरू होता. तिची अवस्था बघवली जात नसल्याने तिच्या आजी-आजोबांनी तिला आजोळी अंमळनेर येथे आणले होते. याठिकाणी ती 2 ते 3 वर्षे राहिली. नंतर भेटण्याच्या बहाण्याने तिला आई-वडिलांनी परत घरी आणले होते. सध्या ती जळगावात पिंप्राळा-हुडकोत आई-वडिलांकडे राहत होती.

बालिकेच्या मृत्यूनंतर परस्पर दफनविधी

मृत्यूनंतर मुलीचा परस्पर दफनविधी करण्यात आला होता. या घटनेनंतर तिच्या मामाने पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिस तपासात हे सारे प्रकरण समोर आले आहे.

संबंधित बातम्या :

मद्यधुंद अवस्थेत मुलीवर कुऱ्हाडीने वार करत हत्या, बापाची पोलिसांसमोर कबुली

नात्याला काळिमा! सावत्र आईने चिमुकल्याला गरम तव्यावर उभे करून दिले चटके

(Jalgaon Mother Father Superstitions allegedly killed 11 years old Daughter)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.