AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CD आणल्या, अश्लील सिनेमा… मुंबईत महिला भाडेकरूसोबत घरमालकाचे घृणास्पद कृत्य!

Mumbai: मुंबईत एक 26 वर्षीय महिला भाडेकरूने Reddit वर पोस्ट करून आरोप केला की तिचा 40 वर्षीय घरमालक तिच्यावर अत्याचार करत आहेत. तिच्यासोबत नेमकं काय झालं चला जाणून घेऊया...

CD आणल्या, अश्लील सिनेमा... मुंबईत महिला भाडेकरूसोबत घरमालकाचे घृणास्पद कृत्य!
MumbaiImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 27, 2025 | 12:41 PM
Share

मुंबईत एक धक्कादायक प्रकरण घडले आहे. एका 26 वर्षीय महिलेने सोशल मीडियावर पोस्ट करुन तिचा घरमालक लज्जास्पद कृत्य करत असल्याचे सांगिले आहे. या महिलेने आरोप केला आहे ही घरमालक दुरुस्तीच्या बहाण्याने तिच्या घरी आला. त्यानंतर घरमालकाने तिला अश्लील डीव्हीडीचा संग्रह दाखवला. ही घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. अनेकांनी तिला कायदेशीर कारवाई करण्याचा आणि सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

दुरुस्तीच्या बहाण्याने घरी आला मकानमालक

महिलेने तिच्या Reddit अकाऊंटवर पोस्ट करत घडलेला प्रकार सांगितला आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले की, तिचा घरमालक, जो 40 वर्षांचा आहे. तो रविवारी दुरुस्तीच्या बहाण्याने तिच्या घरी आला. त्याने सांगितले की त्याला काही जुन्या हार्ड ड्राइव्ह त्याच्या टॅबलेटशी जोडायच्या आहेत. महिलेने विचार केला की कदाचित हे चित्रपट किंवा डेटाशी संबंधित काम असेल. त्यामुळे तिने त्याला मदत करण्याचा विचार केला. पण तेव्हाच त्याने एका प्लास्टिक पिशवीतून अनेक डीव्हीडी काढून दाखवायला सुरुवात केली तेव्हा ती महिला घाबरली.

वाचा: रशिया, इस्रायल आणि इराण… जिथे-जिथे युद्ध झाले कंडोमची विक्री झपाट्याने वाढली, नेमके काय आहे कनेक्शन?

अश्लील डीव्हीडीचा संग्रह दाखवला

महिलेच्या म्हणण्यानुसार, घरमालकाने सुरुवातीला म्हटले, “सॉरी, मला तुम्हाला हे सगळं दाखवायला नको होतं, आता माझं वयही नाही यासाठी.” सुरुवातीला महिलेला वाटले की डीव्हीडीमध्ये सामान्य चित्रपट असतील. पण नंतर तिला कळालं की त्यात अश्लील सामग्री आहे. तिने सांगितलं की घरमालक एक-एक करून डीव्हीडी दाखवत होता आणि शेवटी जेव्हा एका डीव्हीडीच्या कव्हरवर अश्लील पोस्टर दिसले, तेव्हा तिला खरं काय आहे ते समजलं. महिलेने लिहिलं की त्या वेळी ती थक्क झाली आणि तिने नजर फिरवली.

Reddit वर मागितली मदत

महिलेने तिच्या पोस्टमध्ये विचारलं की आता तिने काय करायला हवे. तिने स्पष्ट केलं नाही की ती पोलिसांत तक्रार दाखल करणार आहे की नाही. या घटनेवर Reddit वापरकर्त्यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिल्या. एका वापरकर्त्याने लिहिलं, “त्याला कधीही एकट्याला घरी येऊ देऊ नको, जेव्हा येईल तेव्हा कोणाला तरी सोबत ठेव.” यावर महिलेने उत्तर दिलं की घरमालक अनेकदा न सांगता घरी येतो आणि ती एकटी राहते. त्यामुळे वेळेवर कोणाला बोलवणं कठीण होतं. दरम्यान, अनेक वापरकर्त्यांनी तिला कायदेशीर सल्ला घेण्याचा आणि तात्काळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला.

Reddit Post

ही घटना आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. लोक घरमालकाच्या कृत्यावर संताप व्यक्त करत आहेत आणि महिलेच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे की अशा घटनांकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं आणि महिलेने तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल करावी.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.