AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईची लाईफलाईन बदलणार, 12 रेल्वे प्रकल्पांची घोषणा, जाणून घ्या कोणकोणते आहेत प्रकल्प

mumbai railway projects: मुंबई लोकलची गर्दी कमी होऊन गाड्यांची संख्या वाढणार आहे. मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे. मुंबईसाठी सुरु असणाऱ्या 12 रेल्वे प्रकल्पांची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्सवरुन दिली आहे.

मुंबईची लाईफलाईन बदलणार, 12 रेल्वे प्रकल्पांची घोषणा, जाणून घ्या कोणकोणते आहेत प्रकल्प
mumbai local
| Updated on: Sep 01, 2024 | 10:14 AM
Share

मुंबईकरांसाठी मोठी बातमी रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. यामुळे मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाणाऱ्या लोकल सेवेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा होणार आहे. मुंबईकरांचा प्रवास सुखद होणार आहे. मुंबई लोकलची गर्दी कमी होऊन गाड्यांची संख्या वाढणार आहे. मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे. मुंबईसाठी सुरु असणाऱ्या 12 रेल्वे प्रकल्पांची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्सवरुन दिली आहे. एकूण 16 हजार 240 कोटी रुपयांचे हे प्रकल्प आहेत. मुंबईला दिलेल्या या प्रकल्पांबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहे.

कोणते आहेत 12 प्रकल्प

  1. सीएसटीएम ते कुर्ला पाचवी आणि सहावी रेल्वे लाईन करण्यात येणार आहे.
  2. मुंबई सेंट्रल ते बोरीवली सहावी रेल्व लाईन होणार आहे. ३० किलोमीटरचा हा प्रकल्प आहे.
  3. हर्बल लाईन गोरेगाव ते बोरीवलीपर्यंत वाढवण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण केले जात आहे.
  4. बोरवली ते विरार पाचवी आणि सहावी लाईन करण्यात येणार आहे.
  5. विरार ते डाहून रोड तिसरी आणि चौथी लाईन करण्यात येणार आहे. ६४ किलोमीटरचा हा प्रकल्प आहे.
  6. पनवेलपासून कर्जतरपर्यंत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई लोकल रायगड जिल्ह्यास जोडली जाणार आहे.
  7. ऐरोली-कळवा एलिव्हेटेड लिंकचा प्रकल्प आहे. ३.३ किमी लांबीचा प्रकल्प आहे. वाशी-बेलापूर आणि कल्याण दरम्यान अखंड रेल्वे कनेक्शन यामुळे होणार आहे.
  8. कल्याण आणि आसनगाव रेल्वे स्थानकांदरम्यानचा चौथा रेल्वे मार्ग होणार आहे. ३२ किलोमीटरचा हा प्रकल्प आहे.
  9. कल्याण-बदलापूर दरम्यान तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग होणार आहे. १४ किलोमीटरचा हा प्रकल्प आहे.
  10. कल्याण-कसारा तिसरी रेल्वे लाईन होणार आहे. यामुळे कल्याण-कसारा उपनगरी आणि मेल एक्सप्रेस मार्गावरील गर्दी कमी होईल.
  11. वसई येथे इंजिन बदलावे लागते. त्यामुळे नायगाव-जुई डबल कॉर्ड लाईन बांधण्यात येत आहे. त्याचा फायदा कोकण रेल्वे, दक्षिण रेल्वे होणार आहे.
  12. निळजे ते कोपर दरम्यानच्या 5 किमीची कॉर्ड लाइन होणार आहे. वसई ते पनवेल दरम्यानचा रेल्वे प्रवास सुमारे 15 ते 20 मिनिटांनी कमी होईल.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.