AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Central Railway Update : ओव्हरहेड वायर वर बांबू पडला, मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मनस्ताप देणारी बातमी, VIDEO

Central Railway Update : मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आज मनस्तापाला सामोर जावं लागतय. सकाळी ऐन कामावर जायच्यावेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मागच्या काही दिवसात पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक वारंवार विस्कळीत झाली आहे. आजही मध्य रेल्वेच्या प्रवाशांची यातून सुटका नाहीय.

Central Railway Update : ओव्हरहेड वायर वर बांबू पडला, मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मनस्ताप देणारी बातमी, VIDEO
Central Railway disrupt
| Updated on: Jul 24, 2024 | 8:49 AM
Share

लोकल सेवा ही मुंबईची जीवन वाहिनी आहे. दररोज लाखो लोक मुंबई लोकलने प्रवास करतात. रोजच्या प्रवाशांचा आकडा 70 लाखाच्या पुढे आहे. मुंबईच्या एका टोकावरुन कर्जत-कसारा या दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी लोकल सेवा उत्तम पर्याय आहे. कमी वेळात आणि कमी खर्चात पोहोचता येतं, म्हणून मुंबईकरांची पहिली पसंती लोकल सेवेला आहे. रस्ते मार्गापेक्षा रेल्वे मार्गाने प्रवास अधिक जलद होतो. पण मुंबईत लोकल प्रवास हा सहज, सोपा नाहीय. लोकल प्रवाशांच्या अनेक समस्या आहेत. पाऊस, ओव्हर हेड वायरच तुटणं, सिग्नल यंत्रणेत बिघाड याचा मोठा फटका लोकल प्रवाशांना सहन करावा लागतो.

मागच्या काही दिवसांपासून मुंबईत सतत पाऊस सुरु आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची सेवा वारंवार कोलमडली आहे. पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे लोकल विलंबाने धावतात. त्याचा फटका मुंबईकरांना सहन करावा लागतो. मागच्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिट विलंबाने धावत असल्याच्या अनेक बातम्या आल्या आहेत. लोकलला नियोजित वेळेपक्षा काही मिनिट जरी उशिर झाला, तरी रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी उसळते. मग, अशा खच्चून भरलेल्या गर्दीतून मुंबईकरांना प्रवास करावा लागतो. आज मध्य रेल्वे कशामुळे विस्कळीत

आज बुधवारी पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जलद मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड वायर वरती बांबू पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. माटुंगा स्टेशनच्या जवळ कन्ट्रक्शन साईटचा बांबू ओव्हरहेड वायर वर  पडला. अनेक प्रवाशांनी ट्रॅकवर उतरुन पायी चालत जाणं पसंत केलय. सकाळी ऐन कामावर पोहोचण्याच्यावळी अशा घटना घडत असल्याने प्रवाशांमध्ये संतप्त भावना आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.