मरीन ड्राईव्हवर भीषण कार अपघात, बड्या उद्योगपतीच्या 18 वर्षीय मुलाचा मृत्यू

मरीन ड्राईव्हवर भीषण कार अपघात, बड्या उद्योगपतीच्या 18 वर्षीय मुलाचा मृत्यू

कार चालवणाऱ्या तरुणाला गंभीर दुखापत झाली असून शेजारी बसलेला त्याचा मित्र अपघातात बळी पडला (Mumbai Marine Drive Car Accident Kills Son of Businessman)

अनिश बेंद्रे

|

May 13, 2020 | 9:39 AM

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात मित्रांसोबत कारने भटकंती करणं तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. मरीन ड्राईव्हवर भागात उभ्या असेलल्या बसवर भरधाव कार धडकून झालेल्या भीषण अपघातात एका बड्या उद्योगपतीच्या मुलाचा मृत्यू झाला. (Mumbai Marine Drive Car Accident Kills Son of Businessman)

कारचालक तरुणाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काल (मंगळवार 12 मे) संध्याकाळी कार चौपाटीकडे जात असताना मरीन ड्राईव्ह उड्डाणपुलापासून सुमारे 100 मीटर अंतरावर हा अपघात झाला. कारमध्ये तिघे जण असल्याची माहिती आहे. तिसरा मित्र वेदांत पाटोदियासुद्धा जखमी आहे

अपघातात मृत्युमुखी पडलेला 18 वर्षीय आर्यमान नागपाल हा नेपियन्सी रोड भागातील रहिवासी होता, तर कार चालवणारा त्याचा 19 वर्षीय मित्र शौर्यसिंग जैन हा कफ परेडला राहतो. त्याला हरकिशन दास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त कार शौर्यसिंग जैनच्या मामाची होती.

हेही वाचा : मॉडेल पूनम पांडेला मरीन ड्राईव्हजवळ अटक, BMW कारही जप्त

मरीन ड्राईव्ह पोलिसांनी भरधाव आणि निष्काळजीपणाने वाहन चालवणे या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सीसीटीव्ही फूटेज शोधून अधिक तपास करत आहेत.

(Mumbai Marine Drive Car Accident Kills Son of Businessman)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें