Ritu Tawde 80s AI Photo Trend : 80च्या दशकात कशा दिसायच्या मुंबईच्या महापौर रितू तावडे? फोटो केला पोस्ट
Ritu Tawde AI Photo : सोशल मीडियावर सध्या 80s फोटो बनवण्याचा एआय ट्रेंड चांगलाच व्हायरल झाला आहे. चॅटजीपीटीच्या मदतीने सध्याच्या फोटोला जुन्या काळातील लूक देण्याचा प्रयोग अनेक युजर्स करत आहेत. आता या ट्रेंडची भुरळ राजकीय नेत्यांनाही पडली आहे.

सोशल मीडियावर सध्या 80s मधील फोटो बनवायचा ट्रेंड तुफान व्हायरल झाला आहे. एआयच्या माध्यमातून फोटो बनवले जात आहेत, ज्यामध्ये काही प्रॉम्प्टचा वापर केला तर तुम्ही अगदी हुबेहूब जुन्या काळातील दिसायला लागता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आताच्या काळातील फोटोची आवश्यकता असेल. त्या फोटोला तुम्ही चॅटजीपीटीच्या माध्यमातून फोटो प्रॉम्प्ट देऊन तुमचे फोटो विविध लूक्समध्ये बदलू शकता. दरम्यान, अनेक युजर्सनी या ट्रेंडमध्ये फोटो बनवायला सुरुवात केल्यापासून आता राजकीय नेत्यांनाही या ट्रेंडने भूरळ घातली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही आता या ट्रेंडमधून बनवलेला त्यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोतील लूकमध्ये त्या अगदी एका बॉलिवूड अभिनेत्रीप्रमाणे दिसत आहेत. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कॅप्शन अन् कमेंट्सने वेधलं लक्ष
या फोटोला त्यांनी ‘Lost in the ’80s vibe…’ असं कॅप्शन दिलं आहे. इन्स्ट्राग्रामवर पोस्ट केलेल्या त्याच्या या फोटोवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काही नेटकऱ्यांनी महापौरांना तुम्ही बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीसारख्या दिसत आहात असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या एकाने “मॅडम तुम्ही फुल्ल रेट्रो व्हाइबमध्ये दिसत आहात”, असं म्हटलं आहे. तर एकाने “महापालिकेची कामं करा”, असं म्हणत हसण्याचा इमोजी पोस्ट केला आहे. तर एकाने ते काहीही “असो मॅडम भारी दिसतायत” असं लिहिलं आहे.
View this post on Instagram
फोटो ट्रेंड इतका का व्हायरल?
दरम्यान, हा फोटो ट्रेंड इतक्या प्रचंड वेगाने का व्हायरल होतोय याचा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर त्याचं उत्तर द्यायचं झाल्यास हा ट्रेंड तुम्हाला वेगळ्या दुनियेत घेऊन जाणारा आहे. त्यामुळे या ट्रेंडची लोकांना भूरळ पडली आहे. तुम्ही पूर्णपणे यामध्ये 80च्या दशकात जीवन जगले आहेत की काय, असा प्रश्न तुम्हालाही पडल्याशिवाय राहणार नाही, इतके झक्कास फोटो या ट्रेंडमध्ये तयार होत आहेत. त्यामुळे प्रत्येकजण स्वतःचा फोटो बनवून सोशल मीडियावर शेअर करताना दिसून येत आहे.
