मुंबई मेट्रो अखेर आजपासून रुळावर… वाचनप्रेमींनाही दिलासा!

मुंबई मेट्रो अखेर आजपासून रुळावर... वाचनप्रेमींनाही दिलासा!

लॉकडाऊनमुळे तब्बल 7 महिने बंद असलेली मुंबई मेट्रो अखेर आजपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने प्रवाशांसाठी काही नियमावली जाहीर केली आहे. त्या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असेल.

सागर जोशी

|

Oct 19, 2020 | 8:23 AM

मुंबई: कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या 7 महिन्यांपासून बंद असलेली मुंबई मेट्रो अखेर आजपासून पुन्हा रुळावर आली आहे. घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोसेवा आजपासून सुरु करण्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय. सकाळी 8.30 ते रात्री 8.30 या दरम्यानच मेट्रो धावणार आहे. सध्या लोकल सेवा सुरु असली तरी त्यात फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाचं प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. पण मेट्रो सेवा सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळं मुंबईकरांना काहीअंशी तरी दिलासा मिळाला आहे. (After 7 months Mumbai Metro starts from today)

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या मेट्रोच्या 50 टक्केच फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत. गरज भासली तर त्यात वाढ करण्यात येणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यानुसार दररोज मेट्रोच्या २०० फेऱ्या होणार आहेत. एका स्थानकावर मेट्रो थांबण्याची वेळ वाढवण्यात आली आहे. त्यानुसार आता मेट्रो 30 ते 60 सेकंदांपर्यंत स्थानकात थांबेल.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोची खबरदारी

– मेट्रोचा प्रवास करताना सरकारने घालून दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं बंधनकारक आहे. – मेट्रो प्रवासादरम्यान प्रत्येक प्रवाशाला आपल्या मोबाईलमध्ये ‘आरोग्यसेतू’ अॅप डाऊनलोड करणं अनिवार्य आहे. – स्थानकात सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर गरजेचा आहे. – संसर्ग टाळण्यासाठी दर दोन तासांनी स्थानकांवरील प्रवाशांशी संपर्क येणारी सर्व ठिकाणं निर्जंतुक केली जाणार आहेत. – तसेच प्रत्येक फेरीनंतर मेट्रोच्या डब्यांचेही निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. – मेट्रोमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक प्रवाशाचे थर्मल स्क्रिनिंग केले जाईल. – मानवी संपर्क टाळण्यासाठी आता प्लास्टिक टोकन ऐवजी कागदी तिकीट आणि मोबाईल तिकीटाचा पर्याय देण्यात आला आहे.

आजपासून काय सुरु?

 • मुंबई मेट्रो
 • ग्रंथालय
 • गार्डन, पार्क्स
 • व्यावासायिक प्रदर्शने (बिझनेस टू बिझनेस एक्झिबिशन्स)
 • स्थानिक आठवडा बाजार, गुरांचा बाजारालाही परवानगी
 • केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिलेल्यांना आंतरराष्ट्रीय प्रवासाची मुभा
 • पीएचडी, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं शिक्षण घेणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आणि तंत्रशिक्षण, लॅबोरटरीशी संबंधितांना 15 ऑक्टोबरपासून शिक्षण संस्थेत उपस्थितत राहण्यात मुभा
 • ऑनलाईन आणि दूरस्थ शिक्षणाला परवानगी देण्यात आली आहे (Mumbai Metro And Library)
 • शाळेतील 50 टक्के शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 15 ऑक्टोबरपासून शाळेत बोलावण्यास परवानगी
 • उच्च शिक्षण संस्थांचं ऑनलाइन प्रशिक्षण सुरुच राहील

काय बंद?

 • शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस 31 ऑक्टोबरपर्यंत बंद बंद
 • सिनेमा हॉल, स्वीमिंग पूल, मनोरंजन पार्कस, थिएटर सभागृहे 31 ऑक्टोबरपर्यंत बंद
 • सामाजिक, राजकीय कार्यक्रम, खेळाच्या स्पर्धा तसेच मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी

संबंधित बातम्या:

मुंबई मेट्रो उद्यापासून धावणार, ग्रंथालयेही सुरु, शाळा-कॉलेज 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच!

नवी मुंबई मेट्रोला चीनचे डबे, प्रकल्प पूर्ण करण्याबाबत ‘सिडको’ला चिंता

After 7 months Mumbai Metro starts from today

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें