AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narhari Zirwal: सत्ताधारी आमदारांनी मंत्रालयाच्या जाळीवर मारल्या उड्या…काय आहे कारण

Narhari Zirwal: गेल्या काही दिवसांपासून आदिवासी समाजासाठी नरहरी झिरवळ आंदोलन करत आहे. त्यांनी आदिवासी समाजाच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन वेळा भेट घेतली होती. मुख्यमंत्री आमचे ऐकत नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी आहे, असे नरहरी झिरवळ यांनी म्हटले होते.

Narhari Zirwal: सत्ताधारी आमदारांनी मंत्रालयाच्या जाळीवर मारल्या उड्या...काय आहे कारण
आमदारांनी मारल्या उड्या
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Oct 04, 2024 | 1:08 PM
Share

Narhari Zirwal: राज्याच्या राजकारणात धक्कादायक बातमी आली आहे. सत्ताधारी पक्षात असलेले आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी सीताराम झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या मारल्या. उड्या मारण्यापूर्वी झिरवळ यांच्यासह काही आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. ही भेट निष्फळ ठरल्यानंतर झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी जाळीवर उड्या मारल्या. मुख्यमंत्र्यांना आमचे ऐकावे लागेल ते ऐकत नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे, असे काही तासांपूर्वी नरहरी झिरवळ यांनी म्हटले होते. एसटीच्या आरक्षणास धक्का लागू नये, ही मुळ मागणी आमदारांची आहे. तसेच पेसा कायद्यांतर्गत भरती करण्याची मागणी या आमदारांची आहे. या भयंकर प्रकाराने मंत्रालय हादरले आहे.

नरहरी झिरवळे यांचे आंदोलन

गेल्या काही दिवसांपासून आदिवासी समाजासाठी नरहरी झिरवळ आंदोलन करत आहे. त्यांनी आदिवासी समाजाच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन वेळा भेट घेतली होती. मुख्यमंत्री आमचे ऐकत नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी आहे, असे नरहरी झिरवळ यांनी म्हटले होते. त्या प्लॅन बी नुसार नरहरी झिरवळ आणि इतर दोन आमदारांनी संरक्षक जाळीवर उडी मारली. त्यानंतर नरहरी झिरवळ यांची प्रकृती बिघडली. त्यांचा रक्तदाब वाढला आहे. त्यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांची टीम मंत्रालयात पोहचली आहे. दरम्यान पोलिसांनी या सर्व आमदारांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी मंत्रालयात ठिय्या आंदोलन सुरु केले.

आदिवासी आमदार, खासदारांच्या ठिय्या

आदिवासी समाजातील आमदार आणि खासदारांनी मंत्रालयात ठिय्या मांडला आहे. त्यात किरण लहामटे, हेमंत सावरा, काशीराम कोतकर यांचा समावेश आहे. आमदार आणि खासदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मंत्रालयात आले होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही, असे करिण लहामटे यांनी म्हटले.

आदिवासी आमदार ठिय्या आंदोलनाला बसले.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे आम्ही आंदोलन केले. आम्ही सुद्धा माणसे आहोत, असे नरहरी झिरवळ यांनी म्हटले. दरम्यान, सत्ताधारी आमदारांनी केलेल्या या आंदोलनानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. विधानसभेचे विरोध पक्षनेते विजय वड्डेट्टीवर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...