AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील उद्यानांमधून पुस्तकांचा गंध दरवळणार, प्रायोगिक तत्त्वावर २४ उद्यानांमध्ये मोफत वाचनालये

काही संस्‍था, कॉर्पोरेट कंपन्‍यांचे प्रत‍िनिधी यांनी मुंबईतील उद्यांनामध्‍ये सामाजिक दायित्व तत्त्वावर मोफत वाचनालयाची सुव‍िधा उपलब्‍ध करण्‍याबाबत स्‍वारस्‍य दाखव‍िले. या संस्‍था पुस्‍तके, ग्रंथ आणि इतर वाचन साहित्‍य विनामूल्‍य उपलब्‍ध करण्‍यास इच्‍छूक आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने प्रारंभी प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक प्रशासकीय विभागात एक याप्रमाणे मुंबईतील २४ उद्यानांमध्ये मोफत वाचनालय सुरु करण्याचा निर्णय घेतला.

मुंबईतील उद्यानांमधून पुस्तकांचा गंध दरवळणार, प्रायोगिक तत्त्वावर २४ उद्यानांमध्ये मोफत वाचनालये
मुंबईतील 24 उद्यानांमधून प्रायोगिक तत्वावर मोफत वाचनालये सुरुवात करण्यात आलीImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 01, 2022 | 7:13 AM
Share

मुंबईः मुंबई महानगरातील ठिकठिकाणची उद्याने सुशोभित, सुंदर आणि वेगवेगळ्या सुविधांनी सुसज्ज झाल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने (Municipal administration) आता नागरिकांची पावले उद्यानांकडे (Garden) वळावीत, यासाठी नावीण्यपूर्ण उपक्रम सुरु केले आहेत. त्यामध्ये आता मोफत वाचनालयाच्या (Free library) उपक्रमाची भर पडली आहे. मुंबईतील प्रत्येक प्रशासकीय विभागात एक याप्रमाणे 24 विभाग मिळून एकूण 24 उद्यानांत मोफत वाचनालयाची सुरुवात सामाजिक दायित्वातून करण्यात येत आहे. मोबाईल, टॅबलेट, संगणक व इतर गॅजेट्समुळे आभासी विश्वात हरवत चाललेल्या युवा पिढीला वाचनाची गोडी लावण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

याबाबत माहिती देताना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी सांगितले की, मुंबईकर नागरिकांना नागरी सेवा-सुव‍िधा देताना सामाजिक दायित्व (CSR) तत्त्वातून अनेक उपक्रम राबविण्यात येत असतात. महानगरपालिकेच्या उद्यान व‍िभागानेही अलीकडच्या काळात सामाजिक दायित्वातून अनेक अभ‍िनव उपक्रम पूर्ण केले आहेत. प्रामुख्याने उद्यानांच्या रुपाने मुंबईच्‍या सुशोभिकरणास हातभार लावण्‍यात आला आहे. विव‍िध चौक, वाहतूक बेटं व रस्‍ते दुभाजक यांचे सुशोभिकरण, साडेचार लाखांपेक्षा अधिक वृक्ष लागवड अशा उपक्रमांचाही त्यात समावेश आहे.

उद्यानांकडे नागरिकांचा ओढा

कोविड विषाणू संसर्ग स्थितीत नियंत्रणात आल्यानंतर उद्यानांकडे नागरिकांचा ओढा वाढू लागला आहे. त्यामुळे विरंगुळा आणि व्यायामाच्या सेवा-सुविधांपलीकडे जाऊन संगीतमय सकाळ, राष्ट्रीय संगीत नाट्य केंद्र (NCPA) यांच्या सहकार्याने आयोजित संगीतमय संध्‍या असे वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जात आहेत. अनेक कॉर्पोरेट कंपन्‍या, दानशूर व्‍यक्‍ती व संस्‍था अशा प्रकारच्‍या उपक्रमांकरिता स्‍वारस्‍य दाखव‍ित असतात.

सामाजिक दायित्व

काही संस्‍था, कॉर्पोरेट कंपन्‍यांचे प्रत‍िनिधी यांनी मुंबईतील उद्यांनामध्‍ये सामाजिक दायित्व तत्त्वावर मोफत वाचनालयाची सुव‍िधा उपलब्‍ध करण्‍याबाबत स्‍वारस्‍य दाखव‍िले. या संस्‍था पुस्‍तके, ग्रंथ आणि इतर वाचन साहित्‍य विनामूल्‍य उपलब्‍ध करण्‍यास इच्‍छूक आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने प्रारंभी प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक प्रशासकीय विभागात एक याप्रमाणे मुंबईतील २४ उद्यानांमध्ये मोफत वाचनालय सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याचे श्रीमती भिडे यांनी नमूद केले आहे.

उद्यानामध्येच पुस्तके

सदर उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले की, उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने, पार्क अशा प्रकारच्‍या महानगरपालिकेच्या ताब्‍यात असलेल्‍या भूखंडांवर बांधलेली वास्तू (Built up Structure), गजेबो (Gazebo) उपलब्‍ध आहेत. अशा उद्याने आणि जागांमध्ये योग्य अशा ठिकाणी छोटेखानी कपाट ठेऊन त्‍यामध्‍ये वाचनांसाठी पुस्‍तके, ग्रंथ ठेवण्यात येत आहेत. उद्यानास भेट देणाऱ्या नागरिकांना सदर वाचन साहित्‍य मोफतपणे वाचणे शक्‍य होईल. वाचन झाल्यानंतर सदर साहित्य उद्यानांमधील कपाटांमध्येच परत ठेवले जाईल.

वाचनालय संस्‍कृतीस संजीवनी

आजच्या तंत्रज्ञान युगात प्रत्यक्ष वाचन साहित्याऐवजी मोबाईल, टॅबलेट, संगणक इत्यादी उपकरणांच्‍या (Screen Devices) आभासी व‍िश्‍वात युवा प‍िढी हरवत चालली आहे. त्यांच्यात वाचनाची गोडी न‍िर्माण करून त्यांना तणावमुक्‍त होता यावे, त्यासोबतच त्‍यांचे ज्ञान वृद्धिंगत व्हावे, हा यामागील उद्देश आहे. लुप्‍त होत चाललेल्‍या वाचनालय संस्‍कृतीस संजीवनी प्राप्‍त करून देण्‍याकरिता हा उपक्रम योगदान देऊ शकेल. प्रत्‍येक व‍िभागातील एक उद्यान अशा प्रकारे मुंबईतील २४ उद्यानांमध्‍ये हा उपक्रम प्रायोगिक तत्‍वावर राबविला जाणार असल्याची माहिती परदेशी यांनी दिली आहे. या उपक्रमाच्या फलश्रुतीचा अभ्यास करुन इतर उद्यानांकरीता हे धोरण राबव‍िता येईल व व‍िभागवार उद्यानांची यादी उद्यान अध‍ीक्षक स्‍तरावर तयार करण्‍यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

संबंधित बातम्या

Mumbai Metro: मुंबई मेट्रो 7,मेट्रो 2 ए चा पहिला टप्पा मुंबईकरांच्या सेवेत, उद्धव ठाकरे गुढीपाडव्याला लोकार्पण करणार

Maharashtra covid 19 restrictions : निर्बंध उठवायला उशिर का झाला? दिल्लीच्या होकाराची वाट पाहिली?-आशिष शेलार

Rajesh Tope | शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ठाकरे सरकारची मोठी घोषणा, 5 हजार रुपयांपर्यंतच्या वैद्यकीय चाचण्यांचा खर्च सरकार उचलणार : राजेश टोपे

प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.