सलग दुसऱ्या महिन्यात बोगदा खनन कामात महानगरपालिकेची विक्रमी कामगिरी, प्रकल्पाचे किती काम पूर्ण?

पाणीपुरवठा प्रकल्प खात्यामार्फत सुरु असलेल्या या भूमिगत जल (Water Tunnel) बोगदा प्रकल्पांच्या खनन कामात नवीन उच्चांक नोंदवण्यात आला आहे. मागील महिन्यात म्‍हणजेच डिसेंबर मधील 526 मीटर खननानंतर अमरमहाल ते परळ जलबोगदा कामामध्ये जानेवारी महिन्यात तब्बल 605 मीटर खनन काम करण्‍यात आले.

सलग दुसऱ्या महिन्यात बोगदा खनन कामात महानगरपालिकेची विक्रमी कामगिरी, प्रकल्पाचे किती काम पूर्ण?
बोगद्याचे काम जोमाने सुरू
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 7:20 PM

मुंबई : महानगरपालिकेच्या (BMC) वतीने बांधण्यात येत असलेल्या अमरमहाल ते ट्रॉम्बे आणि अमरमहाल ते परळ जलबोगदा (Tunnel) प्रकल्प अंतर्गत सलग दुसऱ्या महिन्यात बोगदा खनन कामांमध्ये विक्रमी कामगिरीची नोंद झाली आहे. पाणीपुरवठा प्रकल्प खात्यामार्फत सुरु असलेल्या या भूमिगत जल (Water Tunnel) बोगदा प्रकल्पांच्या खनन कामात नवीन उच्चांक नोंदवण्यात आला आहे. मागील महिन्यात म्‍हणजेच डिसेंबर मधील 526 मीटर खननानंतर अमरमहाल ते परळ जलबोगदा कामामध्ये जानेवारी महिन्यात तब्बल 605 मीटर खनन काम करण्‍यात आले. यामुळे फक्‍त 115 दिवसांच्‍या अल्‍पावधीत 1.7 कि.मी. इतके अंतर पार पाडता आले आहे. एवढेच नव्हे तर अमरमहाल ते ट्रॉम्बे या दुसऱया बोगद्याच्या कामामध्ये जानेवारी महिन्यात तब्बल 653 मीटर खनन करतेवेळी एकाच दिवसात 40 मीटरपेक्षा अधिक खनन करण्याची कामगिरी एकाच आठवड्यात दोन वेळा करण्याची किमया महानगरपालिकेने साध्य केली आहे. तसेच या मार्गिकेवर 3,10 कि.मी. म्‍हणजेच 58 टक्के काम पूर्ण झाले आहे. पाणीपुरवठा प्रकल्प खात्याने ही कामगिरी केल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी कौशल्याची सर्वत्र वाखाणणी केली जात आहे.

पश्चिम विभागातील पाणीपुरवठा सुधारण्यास मदत

पूर्व उपनगरांमध्ये पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी पाणीपुरवठा प्रकल्प खात्यामार्फत हे दोन भूमिगत जलबोगदे बांधण्यात येत आहेत. अमरमहाल ते परळ हा सुमारे 9.68 किलोमीटर लांबीचा भूमिगत जलबोगदा एफ/उत्तर आणि एफ/दक्षिण विभागांमध्ये तसेच ई आणि एल विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा सुधारण्यास मदत करणार आहे. तर अमरमहाल ते ट्रॉम्बे उच्च पातळी जलाशयापर्यंत जाणारा दुसरा बोगदा हा सुमारे 5.52 किलोमीटर लांबीचा असून त्याद्वारे एम/पूर्व व एम/पश्चिम विभागातील पाणीपुरवठा सुधारण्यास मदत होणार आहे.

काम कधीपर्यंत पूर्ण होणार?

हे दोन्ही बोगदे जमिनीखाली सुमारे 100 ते 110 मीटर खोलीवर बांधण्यात येत असून त्यांचा व्यास 3.2 मीटर इतका आहे. या दोन्ही बोगद्यांमधून येणाऱया भूमिगत जलवाहिन्या ह्या भूपृष्ठावरील मुख्य जलवाहिनी आणि सेवा जलाशय यांना जोडल्या जाणार आहेत. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही जलबोगद्यांची कामे वेगाने सुरु असून कोविड विषाणू संसर्ग परिस्थिती असतांना देखील या दोन्ही बोगद्यांच्या कामांमध्ये प्रशासनाने खंड पडू दिलेला नाही. त्यामुळे हे दोन्ही भूमिगत जलबोगदे ठरलेल्या मुदतीत म्हणजे अनुक्रमे सन 2026 आणि 2024 मध्ये पूर्णत्वास जातील. एवढेच नव्हे तर चेंबूर ते वडाळा या अंतराचा अंशतः बोगदा 2025 मध्ये सुरू होऊ शकेल.

‘ट्रॅफिकमुळे तीन टक्के घटस्फोट होतात’, अमृता फडणवीसांचा दावा; सत्ताधाऱ्यांचं जोरदार प्रत्युत्तर, महिला वकिलांचं मत काय?

Hindustani bhau : रुको जरा सबर करो, हिंदुस्तानी भाऊचा कोठडी मुक्काम वाढला, पोलिसांच्या हाती काय माहिती?

Antilia Bomb Scare: अँटिलिया बॉम्ब प्लांटचा मुख्य सूत्रधार परमबीर सिंगच, नवाब मलिक यांचा दावा

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.