AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपकडे नैतिकता औषधालाही शिल्लक नाही, यांच्या नैतिकतेचं ऑडिट गरजेचं; संजय राऊतांनी डिवचलं

Sanjat Raut on CM Ekanth Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar : भाजपकडे नैतिकता औषधालाही शिल्लक नाही. भाजपच्या नैतिकतेचं ऑडिट होणं गरजेचं आहे, असं म्हणत ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला डिवचलं आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय.

भाजपकडे नैतिकता औषधालाही शिल्लक नाही, यांच्या नैतिकतेचं ऑडिट गरजेचं; संजय राऊतांनी डिवचलं
| Updated on: Dec 09, 2023 | 11:18 AM
Share

गणेश थोरात, प्रतिनिधी-टीव्ही 9 मराठी,  मुंबई | 09 डिसेंबर 2023 : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या नैतिकतेवर भाष्य केलं आहे. भाजपकडे नैतिकता औषधालाही शिल्लक नाही. भाजपच्या नैतिकतेचं ऑडिट गरजेचं आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. नवाब मलिक यांच्या अजित पवार गटात घेतलं जाऊ नये, अशी भाजपची भूमिका आहे. तसं पत्रही देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना लिहिलं आहे. या पत्रात सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा…, असा उल्लेख केला. यावर संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.

भाजपवर निशाणा

भारतीय जनता पक्ष हा नैतिकतेचे फुगे फुगवत आहे ना छाती फुटेपर्यंत… त्यांच्याकडे नैतिकता थोडी तरी शिल्लक आहे का? म्हणून आज आम्ही म्हटलं आहे की, यांच्या नैतिकतेचं ऑडिट केलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं ऑडिट होतं. काय खरे काय खोटं कुठे काय… भारतीय जनता पक्षाचा नैतिकतेचे ऑडिट होणं गरजेचं आहे, असं राऊत म्हणालेत.

“प्रफुल्ल पटेलांना वेगळा न्याय का?”

ज्या मंत्र्यावर दाऊद इब्राहिम आणि त्याचा खास माणूस असलेल्या इक्बाल मिर्ची यांच्याशी संबंध असणारी व्यक्ती सरकारमध्ये मंत्री कशी राहू शकते, असा प्रश्न महाविकास आघाडी सरकारला भाजपने विचारला होता. तर मग प्रफुल्ल पटेल आज कुठे आणि कुणासोबत आहेत? नवाब यांना तुम्ही टार्गेट करता मग प्रफुल्ल पटेल तुम्हाला चालतात? तुम्ही कायदा सुव्यवस्थेवर बोलता ना… नैतिकतेवर तुम्ही बोलता ना… तुम्ही देशभक्तीवर बोलता. मग तर मग देशभक्तीची व्याख्या नवाब मलिक आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी वेगळी आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

फडणवीसांवर टीकास्त्र

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मोदी- शहांना एक पत्र लिहून “पटेलांना भेटणे देश हिताचे नाही. भाजपच्या नैतिकतेत ते बसत नाही. साहेब, पटेलांना लांब ठेवा” असे सांगण्याचे धाडस दाखवावे. तरच मलिकांच्या बाबतीतील त्यांच्या नैतिकतेच्या उचक्या खऱ्या , नाहीतर पैशाचे सोंग व भाजपचे नैतिकतेचे ढोंग सारखेच . त्यांच्या नैतिकतेचे ऑडिट करावेच लागेल, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून केला आहे.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.