AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Children Drown : मालाडमधील मार्वे बीचवर 5 मुले बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, तीन बेपत्ता

रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने पाच मुलं मालाडमधील मार्वे बीचवर समुद्रात पोहायला गेली होती. मात्र सुट्टीचा आनंद लुटण्याऐवजी शोककळा पसरली.

Mumbai Children Drown : मालाडमधील मार्वे बीचवर 5 मुले बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, तीन बेपत्ता
मार्वे समुद्रकिनाऱ्यावर पाच मुलं बुडालीImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jul 16, 2023 | 4:14 PM
Share

मुंबई : सुट्टी असल्याने मालाडमधील मार्वे समुद्र किनाऱ्यावर अंघोळीसाठी गेलेली पाचही मुलं समुद्रात बुडाली. मुलांना बुडताना पाहून उपस्थित लोकांनी धाव घेत दोघांना वाचवले. मात्र तीन जण बुडाले. बुडालेल्या मुलांचा शोध सुरु आहे. ही सर्व मुलं 12 ते 16 वयोगटातील आहेत. तिघांचा युद्धपातळीवर शोध सुरु आहे. सध्या अग्निशमन दल आणि बीएमसीचे पथक बेपत्ता मुलांचा शोध घेत आहे. सध्या पावसाळ्यामुळे समुद्राच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने मुलं बुडू लागली. मुलांचा पत्ता लागत नसल्याने मार्वे बीचवर बेपत्ता मुलांसाठी हेलिकॉप्टरने शोधमोहीम सुरूच आहे.

युद्धपातळीवर बेपत्ता मुलांचा शोध सुरु

मिळालेल्या माहितीनुसार, मार्वे समुद्राच्या किनाऱ्यापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली. बीचवर सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नाहीत. फायर अँड रेस्क्यू टीम (FRT) शोध मोहिमेचे नेतृत्व करत आहे. बोटी, लाइफ जॅकेट आणि इतर आवश्यक उपकरणांचा वापर करून बेपत्ता मुलांचा शोध सुरु आहे. शोध आणि बचाव कार्यात मदत म्हणून अनेक एजन्सी सहभागी झाल्या आहेत. या एजन्सींमध्ये BMC चे MFB, पोलीस, तटरक्षक दल, नौदल गोताखोर, 108 रुग्णवाहिका आणि वॉर्ड कर्मचारी यांचा समावेश आहे.

जळगावमध्येही खदानीत दोन मुलं बुडाली

मुक्ताईनगर तालुक्यातही खामखेडा खदानीत 10 ते 12 वर्षाची दोन मुलं बुडाली. मात्र गावातील तरुणांना वेळीच ही बाब लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ खदानीत उडी घेत मुलांना बाहेर काढले. यानंतर मुलांना तात्काळ मुक्ताईनगर शहरातील डॉ. जगदीश पाटील यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतर मुलांचे प्राण वाचवण्यास यश आले आहे.

Follow Us
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार