मुंबईच्या धडाकेबाज पोलिसांची दणकेबाज कामगिरी, तीन दिवसात दहा कुख्यात गुंडांच्या मुसक्या आवळल्या

मुंबई पोलिसांनी तीन दिवसात दणकेबाज कामगिरी केली आहे (Mumbai Police arrest ten history-sheeters in Kandivali and Malad)

मुंबईच्या धडाकेबाज पोलिसांची दणकेबाज कामगिरी, तीन दिवसात दहा कुख्यात गुंडांच्या मुसक्या आवळल्या
मुंबई पोलीस

मुंबई : मुंबई पोलिसांनी तीन दिवसात दणकेबाज कामगिरी केली आहे. मोठमोठे मोबाईल स्टोअर आणि एटीएम फोडण्याच्या बेतात असलेल्या दहा गुंडांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. मोबाईल स्टोअरची फोडी करणारे गुंड हे मंगळवारी ( 9 फेब्रुवारी) कांदिवली पूर्व येथून पकडण्यात आले. तर एटीएम फोडीच्या बेतात असलेल्या आरोपींना आज (11 फेब्रुवारी) मालाड पूर्व येथून अटक करण्यात आली (Mumbai Police arrest ten history-sheeters in Kandivali and Malad).

पोलिसांनी आरोपींकडून दुकान आणि एटीएमची तोडफोड करण्यासाठी वापरत असलेले सर्व सामान जप्त केले आहे. मोबाईल स्टोअरची फोडी करणाऱ्या पाच आरोपींपैकी दोघांना मुंबई पोलीस हे नाशिक पोलिसांच्या हाती स्वाधीन करणार आहेत. कारण नाशिकमधील एका मोबाईल स्टोअरच्या दरोड्याप्रकरणी नाशिक पोलीस त्या दोघांच्या शोधात होते (Mumbai Police arrest ten history-sheeters in Kandivali and Malad).

एटीएमची तोडफोड करणाऱ्यांना बेड्या

मालाड पूर्वेकडील पिंपरीपाडा येथे एटीएम फोडण्यासाठी दरोडेखोरांचा एक गट जमल्याची माहिती कुरार पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने दोन पथक तयार करत कारवाई केली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पाच जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं. तर आरोपींचे तीन साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले.

याप्रकरणी पोलिसांनी सुबोध साळवी (26), सौरभ पोश्ते (23), सिद्धेश इंगळे (20), समीर खान (22) आणि समीर पार्टे (27) या आरोपींना बेड्या ठोकल्या. या पाचही जणांविरुद्ध वाकोला पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन चाकू, मिरची पावडर, स्क्रू ड्रायव्हर, तीन बाईक, नायलॉनची दोरी आणि रोख रक्कम केली. दरम्यान, त्यांच्या पळून गेलेल्या साथीदारांचा शोध सुरु आहे.

मोबाईल स्टोर फोडणाऱ्यांना कसं पकडलं?

मंगळवारी ( 9 फेब्रुवारी) पहाटे आरोपींचा एक गट एका मोबाईल स्टोअरवर दरोडा टाकणार असून ते वडारपाडा येथे भेटणार असल्याची टीप समतानगर पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तातडीने कारवाई करत घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वडारपाडा येथे पाच जणांना अटक केली. इम्रान अन्सारी, निसार शेख, झुल्फिकार शेख, शफिकुला अतिकुला अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी इम्रान अन्सारी हा रिक्षाचालक असून त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत.

या कारवाईबाबत पोलिसांनी प्रतिक्रिया दिली. “आरोपी निसार आणि शफिकुलाने नाशिकमध्ये पाच लाख रुपयांचे फोन स्टोअर लुटल्याची कबुली दिली. त्यांना इंदिरा नगर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात येणार आहे. याशिवाय चोरांकडून आम्ही 40 हजारांची रोख रक्कम जप्त केली आहे”, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा : नोकरी सोडली, घरच्या छतावर केसरची शेती, लाखो कमवले, शेतकऱ्याची पोरं लय भारी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI