AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईच्या पोलीस आयुक्त हेमंत नगराळे अ‍ॅक्शन मोडमध्ये, मुंबई गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी विविध पोलीस ठाण्यात भेट

नवनियुक्त मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे चांगलेच अ‍ॅक्शन मोड पाहायला मिळत आहे. (Hemant Nagrale Visit South Mumbai Police stations)

मुंबईच्या पोलीस आयुक्त हेमंत नगराळे अ‍ॅक्शन मोडमध्ये, मुंबई गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी विविध पोलीस ठाण्यात भेट
मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे
| Updated on: Mar 30, 2021 | 1:57 PM
Share

मुंबई : सचिन वाझे प्रकरणी अखेर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या ऐवजी हेमंत नगराळे यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर नवनियुक्त मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे चांगलेच अ‍ॅक्शन मोड पाहायला मिळत आहे. (Mumbai Police Commissioner Hemant Nagrale Visit South Mumbai Police stations)

नुकतंच हेमंत नगराळे यांनी उत्तर मुंबई येथील विविध पोलिस ठाण्यांची भेट घेतली. उत्तर मुंबई गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी तसेच पोलिसांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हेमंत नगराळे यांनी ही भेट घेतली. यावेळी त्यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ 12 च्या नूतनीकरणाचे उद्घाटन केले.

उत्तर मुंबई गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी हेमंत नगराळे अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज विविध पोलीस ठाण्यांना भेट दिली. यावेळी त्यांनी पोलिसांच्या सर्व प्रकारच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळेस हेमंत नगराळे यांच्यासोबत पोलीस उपआयुक्त डी. एस. स्वामी, पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटीलही उपस्थित होते.

मुंबईत ऑपरेशन ऑल आऊट 

तर दुसरीकडे धुलिवंदन, शब ए बारात आणि शिवजयंतीच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी रविवारी रात्री ऑपरेशन ऑल आऊट हाती घेतले होते. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, विश्वास नांगरे पाटील, सह पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन ऑल आऊट राबवले गेले. यादरम्यान मुंबईत 255 ठिकाणी कोम्बिंग ऑपेरेशन करुन 1267 रेकॉर्डवरील आरोपींची चौकशी केली. तर फरार असलेल्या 31 आरोपींना पोलिसांनी गजाआड केले. या दरम्यान पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या 38 जणांवर कारवाई करण्यात आली.  (Mumbai Police Commissioner Hemant Nagrale Visit South Mumbai various Police stations)

संबंधित बातम्या : 

वर्षभर कोरोनाविरुद्ध लढलो, आता पुन्हा लढाईचे दिवस- पोलीस महासंचालक

डॉ. शीतल आमटे आत्महत्येचा गुंता सुटेना, मुंबई पोलिसांना टॅबचा Eye पासवर्ड शोधण्यात अपयश

माणसाच्या जीवापेक्षा काहीही मोठं नाही, लॉकडाऊनच्या प्रश्नावर राजेश टोपेंची ‘सीधी बात’

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.