डॉ. शीतल आमटे आत्महत्येचा गुंता सुटेना, मुंबई पोलिसांना टॅबचा Eye पासवर्ड शोधण्यात अपयश

डॉ. शीतल आमटे आत्महत्येचा गुंता सुटेना, मुंबई पोलिसांना टॅबचा Eye पासवर्ड शोधण्यात अपयश
Dr. Sheetal Amte

विशेष म्हणजे या हे बदललेल्या पासवर्डबद्दल त्यांचे पती गौतम करजगी यांनादेखील कल्पना नाही. (Dr Sheetal Amte TAB eye password not open)

Namrata Patil

|

Mar 30, 2021 | 12:35 PM

चंद्रपूर : महारोगी सेवा प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्या प्रकरणाची कसून चौकशी सुरु आहे. पण चार महिने उलटूनही यात प्रगती होत नसल्याचे चित्र दिसत आहे. डॉ. शीतल आमटे यांच्या टॅबचा पासवर्ड शोधण्यात मुंबई पोलिसांच्या सायबर तज्ज्ञांना अपयश आलं आहे. हा पासवर्ड शोधण्यात अपयश असल्याने ती जबाबदारी आता पुण्यातील Central Forensic Science Laboratory कडे सोपवण्यात आली आहे. (Dr Sheetal Amte electronic gadgets eye password Mumbai Police cyber experts have failed to find)

टॅबला Eye पासवर्ड शोधण्यात पोलिसांना अपयश 

महारोगी सेवा प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी 30 नोव्हेंबर 2020 रोजी आत्महत्या केली. विषारी इंजेक्शन टोचून डॉ. शीतल यांनी जीवन संपवलं होतं. या घटनेला चार महिने पूर्ण झाले आहे. सध्या पोलिसांकडून या घटनेची चौकशी केली जात आहे.

डॉ.शीतल आमटे यांच्या टॅबचा पासवर्ड शोधण्यात मुंबई पोलिसांच्या सायबर तज्ज्ञांना अपयश आलं आहे. शीतल आमटे यांच्या टॅबला Eye पासवर्ड आहे. त्यामुळे तो शोधण्यात पोलिसांना अपयश आलं आहे. यामुळे आता ही जबाबदारी पुण्यातील central forensic science laboratory कडे सोपवण्यात आली आहे.

पुण्यातील फॉरेन्सिक लॅबकडे शोधण्याची जबाबदारी

त्यासोबतच डॉ. शीतल यांच्या लॅपटॉप आणि 2 मोबाईलचा पूर्ण डेटा अद्याप रिकव्हर झाला नसल्याचे शंका चंद्रपूर पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे डॉ. शीतल आमटे यांचे 2 मोबाईल, लॅपटॉप आणि टॅब हे सर्व Central forensic science laboratory कडे देण्यात आले. या इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या मदतीनेच डॉ. शीतल यांच्या आत्महत्येमागील कारणांवर प्रकाश पडण्याची शक्यता आहे.  (Dr Sheetal Amte electronic gadgets eye password Mumbai Police cyber experts have failed to find)

गॅझेट्सना आय पासवर्ड, पतीलासुद्धा कल्पना नाही

दरम्यान, डॉ. शीतल आमटे यांचा लॅपटॉप, मोबाईल, टॅब तसेच इतर गॅझेट्स पोलिसांनी ताब्यात घेतले होते. डॉ. शीतल यांनी त्यांच्या या गॅझेट्सचे पासवर्ड नुकतेच बदलल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या हे बदललेल्या पासवर्डबद्दल त्यांचे पती गौतम करजगी यांनादेखील कल्पना नाही. यातील काही गॅझेट्सना सॉफ्टवेअर लॉक आहे. तर काही गॅझेट्सना त्यांनी स्वत:च्या डोळ्यांचे पासवर्ड ठेवले होते.

त्यामुळे ताब्यात घेतलेला टॅब, लॅपटॉप, आणि मोबाईल उघडण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. परिणामी तपास करण्यास, त्यांच्या मृत्यूमागचे नेमके कारण शोधण्यास अडचणी येत आहेत. त्यानंतर हे सर्व गॅझेट्स नागपूरच्या फॅरेन्सिक पथकाने मुंबईतील आयटी (IT) तज्ज्ञांकडे पाठवले होते. या गॅझेट्सच्या साहाय्याने डॉ. शीतल यांच्या आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यास मादत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र मुंबई पोलिसांच्या सायबर तज्ज्ञांना अपयश आलं आहे.

आत्महत्येसाठी वापरलेले विष अत्यंत घातक

शीतल आमटे यांनी आत्महत्येसाठी वापरलेली काही इंजेक्शन्स त्यांच्या कक्षात आढळून आली आहेत. शीतल यांनी आत्महत्येसाठी नेमके कोणते विषारी रसायन वापरले याचा तपास पोलीस करत आहेत. याबाबतचा रासायनिक अहवाल आल्यानंतरच हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, डॉ. शीतल यांनी आत्महत्यासाठी वापरलेले विष हे अत्यंत घातक आणि उच्च गुणवत्तेचे असल्याची सूत्रांची माहिती आहे. हे विष त्यांनी कोठून मिळवले याचा तपास करण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे.

ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय बाबा आमटे यांची नात आणि वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी 30 नोव्हेंबरला आत्महत्या केली. त्यांनी आनंदवन येथील आपल्या राहत्या घरी विषारी इंजेक्शन टोचून आयुष्य संपवलं. आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरलं. (Dr Sheetal Amte electronic gadgets eye password Mumbai Police cyber experts have failed to find)

संबंधित बातम्या : 

Special Story | डॉ. शीतल आमटे आत्महत्या : 30 नोव्हेंबरपासून 30 डिसेंबरपर्यंत काय काय घडलं? सविस्तर घटनाक्रमाचे 10 मुद्दे

डॉ. शीतल आमटे आत्महत्या : मोबाईल, लॅपटॉपला Eye पासवर्ड; चौकशी करायची कशी?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें