मुंबई पोलीस आता घोड्यावरुन गस्त घालणार

पोलीस आता गस्त घालण्यासाठी घोड्यावरुन फिरणार (Police patrolling on horse) आहेत. हे एकून तुम्हाला धक्क बसला असेल पण यापुढे चौपाटी, रॅली, उत्सव याकाळात पोलीस तुम्हाला घोडेस्वार करताना दिसले तर आश्चर्य मानू नका.

  • Updated On - 8:13 am, Wed, 22 January 20 Edited By:
मुंबई पोलीस आता घोड्यावरुन गस्त घालणार


मुंबई : पोलीस आता गस्त घालण्यासाठी घोड्यावरुन फिरणार (Police patrolling on horse) आहेत. हे एकून तुम्हाला धक्क बसला असेल पण यापुढे चौपाटी, रॅली, उत्सव याकाळात पोलीस तुम्हाला घोडेस्वार करताना दिसले तर आश्चर्य मानू नका. 24 तास मुंबईत सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस दलात आता अश्वधारी पोलिसदल लवकरच रुजू होणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Police patrolling on horse) यांनी केली.

गृहमंत्री अनिल देशमुख पक्षाच्या ब्रीदवाक्याप्रमाणे प्रचंड आशावादी आहेत की ही संकल्पना मुंबईत खूप छान राबवता येईल. यासाठी त्यानी अश्वधारी पोलिसांच्या पेहरवावरही खास लक्ष देत डिझायनरकडून याचा पेहरावही शिवून घेण्याचे आदेश दिले आहेत. ज्यातला पोलीस आणि अश्व अतिशय रुबाबदार वाटतो.

या अश्वदलात एक पोलीस उपनिरीक्षक, एक सह्ययक पोलीस उपनिरीक्षक, चार पोलीस हवालदार, 32 पोलीस शिपाई असा पोलीस दलाचा फौजफाटा असणार आहे. तसेच अश्वांच म्हणाल तर देशी-विदेशी 13 घोडे यात तूर्तास समावण्यात आलेत बाकी मागवून घेण्यात येणार आहेत. यामध्ये सात विदेशी घोडे, तर वीर, तुफान, शेरा, चेतक, बादल, बिजली या 6 देशी घोड्याचाही समावेश आहे.

घोड्यावरुन गस्त घालणारे पोलीस दल फक्त लंडनमध्ये आहे. मुंबईतही माउंडेड पोलीस युनिट 1932 पर्यंत होते.1932 नंतर तत्कालीन वाढत्या वाहनांच्या वर्दळीमुळे 1932 साली हे युनिट बंद करण्यात आलं. 1932 च्या वर्दळीची तुलना 2020 मध्ये न केलेलीच बरी.

मुंबईत अस अश्वदल सुरू करण ही धोकादायक संकल्पना असल्याचं पेटाच म्हणणं आहे. त्यामुळे ही संकल्पना म्हणजे शेख चिल्ली सारखी वालग्ना असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

या अश्वदलासाठी मरोळ पोलीस मुख्यलयाच्या शेजारी एक तबेला बांधण्यात येणार आहे. ज्यात 30 अश्वांची सोय होऊ शकणार आहे. ज्यात अश्वांसाठी रायडिंग स्कुल, अश्वांसाठी स्विमिंग पूल, सँड बाथ, रायडर रूम, ट्रेनर रूम आदींचा समावेश असेल. आता हे सर्व केवळ कागदावरच राहतं की सत्यात उतरत हे पाहणं औत्सुक्याचे आहे.