AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Rain Big Alert | समुद्राला उधाण, लाटा उंच उसळणार, वारे वेगाने वाहणार, मुसळधार पावसाचे संकेत

मुंबईला पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी अनावश्यक कामांसाठी घराबाहेर पडू नये, असं आवाहन केलं जात आहे. विशेष म्हणजे मुंबईसाठी पुढचे काही तास फार महत्त्वाचे आहेत.

Mumbai Rain Big Alert | समुद्राला उधाण, लाटा उंच उसळणार, वारे वेगाने वाहणार, मुसळधार पावसाचे संकेत
| Updated on: Jul 21, 2023 | 5:21 PM
Share

मुंबई | 21 जुलै 2023 : मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा ओघ पाहता प्रशासन सतर्क झालंय. सध्या तरी रेल्वे सेवा सुरळीत आहे. पण रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. विशेष म्हणजे कुर्ला रेल्वे स्थानकावर हार्बर मार्गावर पाणी साचल्याने जवळपास तासाभरापेक्षा जास्त वेळ वडाळा ते मानखुर्द रेल्वे सेवा ठप्प होती. याशिवाय वडाळा येथून पनवेलच्या दिशेला जाणाऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हार्बर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. असं असताना मुंबईतला पाऊस थांबेल अशी चिन्हं नाहीत. कारण पुढचे काही तास खूप महत्त्वाचे आहेत.

हवामान विभागाने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय. विशेष म्हणजे पुढचे काही तास महत्त्वाचे आहेत. कारण पुढच्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. समुद्रात उधाण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अंधेरीचा सबवे आज दुपारी पाणी साचल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. याशिवाय सखल भागांमध्ये पाणी साचल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याचा धोका निर्माण झालाय. हवामान विभागाकडून याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

समुद्राला उधाण, वारे 40 ते 45 प्रतिसाताच्या वेगाने धावणार

मुंबईत पुढच्या काही तासांसाठी महत्त्वाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढच्या काही तासांमध्ये 45 ते 55 किमी प्रतितासाच्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच समुद्रालादेखील उधाण येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, समुद्राच्या लाटा 4.21 मीटरच्या उंचीने उसळण्याची शक्यता आहे.

मुंबईतील सायन परिसरात मुसळधार पाऊस बरसल्यामुळे रस्ता जलमय झालाय. त्यामुळे वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झालाय. दादर-हिंदमाता परिसरात पाणी भरायला सुरुवात झालीय. पावसाचा जोर अधिक असल्यामुळे वाहनचालकांची कसरत होते. तर अनेक ठिकाणी पंपांच्या सहाय्याने पाणी बाहेर काढण्याचं काम सुरु झालं आहे.

कल्याण, डोंबिवलीत मुसळधार पाऊस

विशेष म्हणजे मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा सारख्या शहरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे. ठाणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील शहरांमध्ये आज सकाळपासून अतिशय मुसळधार पाऊस पडतोय. प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.